Skip to main content

श्रद्धांजली

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 05/04/2010 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर , सप्रेम नमस्कार ! ३ एप्रिल रोजी महाराजांची पुण्यतिथी होती.परंतु ऑफिसच्या कामाने बाहेरगावी असल्याने लेख पाठवू शकलो नाही , तो आज पाठवत आहे. श्रद्धांजली..... आज ३ एप्रिल ! हृदयाच्या एका कप्प्यात कायम विराजमान असणार्‍या आमच्या महाराजांची आज पुण्यतिथी !

चित्रपट पाहणे: घरी, चित्रपटगृहात आणि आता पुन्हा घरातच

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 05/04/2010 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
'ब्लू' नावाचा सर्वात जास्त खर्च केलेला हिंदी सिनेमा चालला नाही आणि २ ते ३ महिन्यात कलर्स वाहिनीवर दाखवण्यात आला. त्यानंतर 'अजब प्रेम की गजब कहानी', अलाद्दीन वगैरे चित्रपटही फार थोड्याच दिवसांत दूरदर्शन वाहिन्यांवर दाखविण्यात आले. ह्यावरून मनात सर्वसाधारणपणे विचार येत होते की हे चित्रपट चालले नाहीत म्हणून दाखवतात का? त्यातच काल मटामध्ये हा लेख वाचला आणि हे वाचत असतानाच लहानपणापासूनचे अनुभव डोळ्यांसमोरून गेले.

चटकदार भेळ

लेखक अरुंधती यांनी रविवार, 04/04/2010 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : चुरमुरे, फरसाण (३:१ प्रमाणात असावे) बारीक शेव -खारेदाणे - तिखट बुंदी (आवडत असल्यास), कांदा बारीक चिरून, टोमॅटो बारीक चिरून, चिरलेली कोथिंबीर, चिरलेली कैरी, तिखट, चिंचेचे पाणी (चिंचेचा कोळ + गूळ + तिखट + मीठ), मिरचीचा ठेचा (थोडासा), पुदिन्याची चटणी (पर्यायी) सोबत कडक पुरी :-) एक मोठे पसरट भांडे घ्यावे. त्यात चुरमुर्‍यांत फरसाण, चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कैरी, चिंचेचे पाणी, ठेचा इ.

नाटकवेडी मुले शिरगावची नविन

लेखक शनआत्तार यांनी रविवार, 04/04/2010 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी या आधी आमच्या खेडे गावात चालणारी नाट्य चळवळ या बाबत आपणाशी बोललो आहे. आमच्या नाटकातील मुलांची कमाई आपणास मी दाखवणार आहे आज अनेक चित्रपटातून आमच्या शाळेची मुले चमकत आहेत आमच गाव म्हणजे बालकलाकारांच गाव अशी आमच्या गावाची ओळाख पुण्या मुंबई मध्ये झाली आहे. आम्ही दोन वर्षा पुर्वी पुणे व मुंबई येथे आमच्या मुलांची नाटके घेऊन गेलो होतो त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या शाळेतली मुले आज देवराई, बाधा, असला घो हवा मला, गाभ्रिचा पाऊस, प्रतिसाद एक कप चहा या चित्रपटात अभिनय करून गावाचे व शालेचे नाव मोठे केले आहे.झी पुरस्कारासाठी सचिन मोडकर याला नामांकन मिळाले होते.

चिकित्सकांची नाडिपरीक्षा...!

लेखक हैयो हैयैयो यांनी रविवार, 04/04/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
चिकित्सकांची नाडिपरीक्षा...! श्री. घाटपांडे सो|, हॅहॅहॅ! नमस्कार, कसे काय आहात?! चिकित्साकार्याविषयीची आपली निष्ठा आणि आपली चिकाटी ही शिकण्यासारखी आहे, बरे! असो. चिकित्सा कशी असावी ह्या अनुषंगाने आपला - माझा ह्यापूर्वीही एक दीर्घसंवाद झालेला आहे. आपल्या उभयतांच्या त्या चर्चेमध्ये विचारात घेतल्या गेलेल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपणांस चक्क विसर पडलेला दिसतो.

माझे जग

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 04/04/2010 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझे जग
काही दिवसांपुर्वी एखाद्या वर्षापुर्वी मी एकटी होते. नाही म्हणायला माझ्या इतर दोन भगिनी होत्या घरात. तसं आम्ही तिघेही समोरासमोरच होतो. दररोज सकाळी जाग आल्यावर आमचे बोलणी व्ह्यायची व्ह्यायची. आमच्या काही चुलत बहिणी पण वरच्या मजल्यावर होत्या. त्या आता काही दिसत नव्हत्या. आम्हाला येथे आणण्याच्यावेळी एका गाडीत आम्ही एकमेकांच्या पाठीला पाठ लावून आलेलो होतो तेव्हांचेच काय ते बोलणे त्यांच्याशी. आता फक्त खालच्या मजल्यावरील आम्ही तीन भगीनीच एकमेकांशी बोलू शकतो, पाहू शकतो. नव्याचे नउ दिवस असतात तसे आमचे रंग नविन होते.

हा हा हा हा

लेखक kanhegaonkar यांनी रविवार, 04/04/2010 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
पन्ख्याला लतकलेलि लाश, खिडकि तुन तुम्हाला पाहनारि आत्म, पलन्गाच्या खाली पडलेली धड विरहित शर, पडद्यच्या मागुन आलेला हात, ह्या सगळ्ञा गोश्टिवर लक्श नका देवु आनि चुपचाप झोपुन जा. :)) ~X(

माझी निघाली वार्‍यावरची वरात: पुढील मदत हवी आहे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 04/04/2010 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी मागच्या वर्षी मी एक घरगूती पवनचक्की बनविण्याचा प्रयत्न केला. खेळण्याची मोटर वापरून केलेली पवनचक्की एक खेळण्यातील डिसी मोटर वापरून एक पवनचक्की केली. त्यात थोड्याप्रमाणात मिली व्होल्टस मध्ये डिसी व्होल्टेज जनरेट होत होते. हे कमी प्रमाणातील व्होल्टेज पुढे बॅटरीत साठवता येईल का? त्यासाठी एखादा रेडीमेड बॅटरी चार्जर असतो तो वापरला तर चालेल काय? पुढील दिशा कशी असावी? आपल्यापैकी कुणी यात प्रयोग केला आहे का? माझा प्रयत्न हा एखाद्या शाळेत वापरण्यासाठी केलेला प्रयोग आहे.