पुस्तक परिचय In service of the republic: The art and science of economic policy
In service of the republic: The art and science of economic policy, Penguin, 2022, Pages 500. लेखक – डॉ विजय केळकर आणि डॉ अजय शाह
या वर्षाच्या सुरुवातीला मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि हल्लीच वाचून पूर्ण झालं. पुस्तकाच्या आधी लेखकांची थोडक्यात माहिती सांगतो. विजय केळकर आणि अजय शाह दोघेही सुरुवातीचे अभियांत्रिकीचे विद्यार्थी जे नंतर अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रात आले. विजय केळकर यांनी केंद्र सरकारमध्ये अर्थ मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. श्री गिरीश कुबेर यांनी त्यांच्यावरील एक लेख लोकसत्ता दैनिकात नुकताच लिहिला होता.
रॉयल्टी आणि डिव्हीडण्ड
रॉयल्टी आणि डिव्हीडण्ड
=============
--राजीव उपाध्ये
कर्वेरोडवर मेट्रो झाल्यानंतर पुलाखाली लावलेले अनेक साहित्यिकांचे फोटो दृष्टीस पडतात आणि काही लेखकूंची अनुपस्थिती ठळक जाणवते. कधी कधी मला प्रश्न पडतो माझे आईवडिल ’लेखकू’ असते तर काय झालं असतं?
थोडी फार प्रसिद्धी मिळाली असती, ठराविक सामाजिक वर्तूळात ऊठबस झाली असती. पण माझ्या आई-वडीलांचे सामाजिक वर्तूळ माझ्या सामाजिक वर्तूळापेक्षा खुपच मोठे होते. नको ती अक्कल शिकविणारे कमी होते, मर्यादांचा आदर ठेवणारे, आनंदात सहभागी होणारे खुप होते. १ल्या लोकसभेतील एकुलत्या एक महिला खासदार इंदिराबाई मायदेव आमच्या घरी अनेकवेळा येऊन गेल्या आहेत.
तोरई (दोडके) + कोथिंबिर सूप
आज सकाळी सौ. दोडक्याची भाजी बनवत होती. मी विनंती केल्यावर सौ.ने मुगाची डाळ भाजीत टाकली. डाळ टाकण्यामुळे दोडके कमी लागले. तीन दोडके, जवळपास 250 ग्राम, उरले.लैंगिक वर्तन
लैंगिक वर्तन
========
पूर्वी अधून-मधून वृत्तपत्रातून झळकणार्या काही बातम्या आता नित्याच्या झाल्या आहेत - त्यात "तरूण जोडप्याचे सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन" ही बातमी वारंवार झळकते.
वेगवेगळ्या कारणांनी होणार्या भावनिक कोंडीमुळे अनावर झालेल्या लैंगिक उर्जेच्या निचर्याला "अश्लील" संबोधल्याने समाज निरंतर चुकीच्या कल्पना गोंजारत राहतो.
मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे सोडवताना काहीतरी भोज्जा (संदर्भबिंदू) पकडणे आवश्यक ठरते.
स्वतःला जगवत ठेवण्याचे प्रयोग (ऐसी अक्षरे ३५)
पुस्तक -#स्वतःला_जगवत_ठेवण्याचे_प्रयोग
लेखिका -#ऐश्वर्या_रेवडकर
स्वतःचे अवकाश शोधणाऱ्या स्वच्छंदी मुली लग्न संस्थेतील कच्चे दुवे ,पुरुषत्वाचा दुराभिमान, पितृसत्ताक वर्चस्व, स्त्री-आदरातील सामाजिक दांभिकता या मुद्द्यांपर्यंत तटस्थपणे नक्कीच पोहोचतात.तेव्हा त्या विचारांना फेमिनिझम म्हणत आपण हेटाळतो .पगृहकृत्यदक्ष(?) कवियित्रींसाठी मार्गदर्शन. !!
कवियित्रींना साधारण गृहीणीसारखे पण वावरावे लागते व कविता लिहुन रसिकांना ही खुष ठेवावे लागते.
हे फार कसरतीचेच काम आहे.
मी खाली काही Techniques देत आहे जे वापरल्यावर कवियित्रींना ग़ृहीणीच्या रुपात वावरताना सुध्दा कविता लिहिण्यात काहीच अडचण येणार नाही.
नेहेमीच्या रोजच्याच वेळात घरकाम करता करता बर्याच प्रसंगातुन स्वत:मधील कवियित्रीला कसे जिवंत ठेवायचे हे समजायला त्यामुळे त्यांना नक्कीच मदत होईल.
मी खाली काही काव्यप्रकार कवियित्रींनी केव्हा आणि कसे वापरायचे हे सविस्तरपणे सांगितले आहे.
खरेतर खालील उपाय वाचुन इतर गृहीणी सुध्दा कविता लिहु शकतील.
काही समस्या असल्यास व्यासपीठावर मार्गदर्शन करणेत येईल.
--
खजुराहो-बनारस सोलो ट्रिप
तसा मी अप्रवासी फार कुठे गेलो नाही.पण नुकताच खजुराहो- वाराणसी अशी दहा दिवसांची स्वैर व सोलो टूर करुन आलो. अंशत: नियोजित पण बरीच स्वैर. IRCTC वरुन trial and error बेसीस वर तात्काळ ट्रेन बुकिंग केले. 25 नोव्हे ला सकाळी सोलो बॅग पाठीवर घेउन ट्रेन PUNE GCT SPECIAL ने भोपाळ ला गेलो. तिथे रात्री 12 ला पोचलो. रात्री IRCTC च्या एका दुर्लक्शित ठिकाणी फलाटा बाहेर असलेल्या एका रिटायरिंग रुम इमारतीत अनेकांना विचारत पोचलो. तिथे सामसूम होती. ऒफिस नाही. मग तिथे एका ठिकाणी एका बाईने एक जळमट व धूळीने माखलेली खोली दिली. तोपर्यंत चौकशी करण्यात माझे सर्व भोपाळ स्टेशन फिरुन झाले होते.
मिसळपाव