Skip to main content

लॅपटॉप विकत घेणे आहे.

लेखक कानडाऊ योगेशु यांनी मंगळवार, 08/06/2010 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
मला लॅपटॉप विकत घ्यायचा आहे.बजेट साधारणपणे ३०,०००/- कुठला लॅपटॉप विकत घ्यावा.? मिपाकर ह्याबाबतीत काही मार्गदर्शन करु शकतील काय? - (ग्राहक) योगेश.

कषाय-दान

लेखक पुष्कर यांनी मंगळवार, 08/06/2010 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
(संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून, मागितलेले दान) आता खाद्यात्मके देवे, येणे खाद-यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे, कषाय-दान हे| जें पळीभर शर्करा सांडो, तया इंसुलीनची गती वाढो पात्रात परस्परे पडो, दूध म्हशीचे| मधुमेह्यांचा मेद जावो, विश्व सदुग्ध-कषाये पिवो जो जें वांछील तो ते लाहो, मानव-जात| वर्षत सकळ मंगळी, चहाबाजांची मांदियाळी भरभरून पात्रान्तरी, देत तू चहा| चला चहापत्तींचे आरव, आसामातले जणू ते गाव बोलते जें अर्णव, कषायांचे| वेलची आल्याचे चूरण, मिसळून करी जें प्राशन ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु| किं बहुना सर्वसुखी, लाईम टी करुनी पिती अथवा कोरा चहा पिती, अखंडित| आणि कषायोपजीविये, विशेषी

माझे कोकण भ्रमण..... कृपया उघडू नका.

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी मंगळवार, 08/06/2010 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
उघडू नका म्हटल्यावरही उघडलांत ना! असो. बरेच दिवसात कोकणात गेलो नाही.. आता पावसाळा सुरू झाला की जाईन म्हणतो. तोवर लेखासाठी जागा राखून ठेवत आहे. आमचे वायदेआझम कसे २०० शब्दांच्या छोट्याश्या प्रतिसाद खेटरासाठी रुमाल टाकून ठेवतात तसा मी येथे रुमाल टाकून लेखासाठी जागा राखून ठेवली आहे.

साथ!

लेखक नीधप यांनी मंगळवार, 08/06/2010 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणात भटकताना मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याच्या शिवापूर गावी पोचले. जातच राह्यले. अश्याच एका शिवापूर भेटीत डागदराकडून घराकडे परत जाणारे हे आजोबा आजी भेटले. आजोबांना आधार देत देत हळूहळू घरापर्यंत नेणार्‍या आजी, हात पाय सुजलेले आजोबा...

एक भन्नाट दुपार !

लेखक भाग्यश्री यांनी मंगळवार, 08/06/2010 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन'स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ. जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो आम्ही दोघं!

भोपाल वायू दुर्घटना...न्याय

लेखक शिल्पा ब यांनी मंगळवार, 08/06/2010 06:13 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्तात आताच http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=75758:… हि बातमी वाचली...न्यायालयाने वॉरन अंडरसन याचा उल्लेखदेखील केला नाही असे लिहिले आहे...अशीच थट्टा होणार असेल तर लोक का म्हणून कायद्याने वागायला जातील? का त्यांना देशप्रेम वाटेल? पेपर उघडला कि असंच काहीतरी वाचायला मिळतं... :-( नक्की कोणाचं, कुठे आणि काय चुकतंय हे कळायलाच मार्ग नाही..