75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी...
ठीक 75 वर्षांपूर्वी 9 डिसेंबरला घटना परिषदेची (Constituent Assembly) स्थापना होऊन स्वतंत्र भारतासाठीच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या कार्याचा शुभारंभ झाला होता. भारताच्या इतिहासात प्रथमच असे घडत होते. देशभर झालेल्या निवडणुकांमधून निवडून आलेल्या 299 सदस्यांची ही घटना परिषद होती.
घटना परिषदेच्या सिद्धांतांचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी घनिष्ठ संबंध राहिलेला होता. त्यामुळे तिच्या स्थापनेपूर्वीच्या महत्वाच्या घडामोडींही पाहणे आवश्यक ठरते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे 17व्या शतकाच्या प्रारंभी भारतात आगमन झाल्यापासूनच भारताचा घटनात्मक विकास सुरू झाला.
मिसळपाव