Skip to main content

साद घालतो रानवारा

लेखक दशानन यांनी सोमवार, 08/11/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
चल मित्रा, साद घालतो रानवारा कुठे अडकलास रे अतृप्त जिवा क्षणाची ना उसंत, धावपळ चोहीकडे शहराचा गोंगाट भावला का तुला कि आठवतो अजून ही स्पर्श हिरवा झुळझुळ वाहणारा तो अमृत झरा आकाशामध्ये विसावलेला तो कडा रमलास काय रे, मित्रा पहात इकडे माणसांचा कारखाना अन् वाहनांचा टांडा, विसरलास का, डोंगरमाथ्यावरची ओली हवा वाहणारी सरिता, साथ देणारा गार वारा गडकिल्ल्यांचा स्पर्श अन् आठवतो लढणारा शिवा माणसांचा गरडा बाजूस, तरी पाणावलेल्या नयनकडा कांचेच्या अद्ययावत, गडात तू राहिलास एकटा अजून रेंगाळते का चव , आठवतो का जंगलचा मेवा धुप-तुपाचा वास, नाहीतर मोकळा गाभारा पुरातन मंदिरे,त्या गुंफा, तुटकी ती शिळा हरविलास तू

हे शक्य आहे का?

लेखक प्रमोद सावंत१ यांनी सोमवार, 08/11/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
नेत्यांचे महत्व वाढले म्हणजे देशाची प्रगती झाली असे होत नाही. सामान्य लोकांना जेव्हा जगताना नैराश्य येणार नाही, त्यांच्या गरजा पूर्ण होतील. मुलांच्या नोकरीची खात्री वाटेल, वीज- पाणी- शौचालयाची सोय असेल, तेव्हा आपली प्रगती झाली असे आपण समजू शकतो. हा प्रवास जेव्हा मागासलेल्या जिल्ह्यांत ठोसपणे सुरू होईल व शहरातील झोपडपट्टीचे प्रमाण दरवर्षी किमान १०-१५ टक्क्यांनी होईल, तेव्हाच आपण योग्य मार्गावर चाललो आहोत, असे म्हणता येईल.

मुंबैच्या किनारी ओबामा नाचला.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 08/11/2010 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
'मी हाय कोली..' या सुंदर कोलीगीतावर अखेर ओबामामामाही नाचला.. मिशेलमामी मात्र मला फार आवडल्या.. त्याही मनमोकळ्या नाचल्या.. :) इथे पाहा.. जळ्ळा आमचा परशा कोली.. दोन टाईम फक्त दारू खायची ज्याला फक्त माहिती.. त्याचीच ओबामामामा इथे आल्यापासून सारखी हुशारी सुरू होती की " ओबामामामाला आमच्या कोली गीतांवर नाचवतो की नाय ते बग..! " :) परशाचीही हकिकत लिहून तैय्यार होते आहे..

राज ठाकरे हे नाही करू शकले !

लेखक यकु यांनी सोमवार, 08/11/2010 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरेंचा म.न.से. नुकताच स्थापन झाला होता आणि त्यांची मारा-ठोका छाप भाषणे गाजत होती. पुढे त्यांना अटक झाली - म्हणजे अटकेची एक मोठी मालिकाच सुरु झाली. रस्त्यावरुन जात असताना इथं, औरंगाबादला एक केवीलवाणे चित्र मला दिसले. ठाकरेंचे चार-दोन समर्थक (यापैकी एक म.न.से.कडून पदवीधर मतदार संघाची निवडणुक लढताना पडून आता शिवसेनावासी) रस्त्यावर उतरले होते आणि पोलीस त्यांना गाडीत कोंबत होते.

उजव्या सोंडेचा गणपती

लेखक शुचि यांनी सोमवार, 08/11/2010 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या देवघरात पंज्याच्या आकारमानाचा , उजव्या सोंडेचा शिळेचा सिद्धीविनायक आहे. खाली त्याचे छायाचित्र दिले आहे. डाव्या सोंडेच्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेमध्ये काय फरक असतो यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय? मी असे ऐकले आहे की उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक असते.