आभास हा.....
अर्पणओळ - नववर्षात व्यायामाचा संकल्प सोडलेल्या सर्वांना!
बाहेर मस्त थंडी पडलिये, पहाटे उठून आलं घातलेला वाफाळता चहा प्यावा, दिवस लवकर सुरु करावा, डोंगरामागून येणार्या सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही........ म्हणजे लहानपणापासून कधी वाटलंच नाही, पण तसं वाटावं म्हणून मी प्रयत्न भरपूर केले. आई, आज्जी बरेचदा जवळच्या देवळात काकडआरतीला जात असत. किती मस्त वाटतं वगैरे वर्णनंही करत्.....तरीही पहाटे उठणं हा माझा घास नव्हे. मुलांना पहाटे उठण्याची चांगली सवय लावावी असं आईला नेहमी वाटत असे. तिला त्यात कधी यश मात्र आलं नाही.
मिसळपाव
