सल्ला हवा आहे
नमस्कार मिपाकरांनो,
तसे जगातले सर्व ज्ञान असणारे काही थोडी लोकं मिपावर आहेत त्यात आमचा, नानाचा वगैरे नंबर लागतोच. मात्र काही काही गोष्टी ह्या चार जणांच्या सल्ल्यानीच कराव्यात असे जुने-जाणते, अनुभवी वडिलधारी सांगुन गेले आहेत. तेंव्हा एका महत्वाच्या गोष्टीत तुमचा सल्ला हवा आहे.
मी व आमचा परम मैतर नाना बरेचशे धंदे भागिदारीत करत असतो. त्यातले काही ऑनलाईन असतात तर काही ऑफलाईन. मात्र सर्व सहसा संगणकाशी संबंधीतच असतात. चार पैसे सुटले, रात्री दोन पेग सुटले की झाले असे आपले आमचे सोपे गणित असते.
मिसळपाव