Skip to main content

आयुष्य कडेवर घेतो

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 29/07/2011 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य कडेवर घेतो झुंजूमुंजू पहाटेला, आभा चढे आभाळाला काळोखाच्या भेगातुनी, सूर्य डोकावतो गारठल्या पंखामधी, आशा जागवतो सुन्यासुन्या शिवाराला, निजलेल्या आवाजाला चेव येण्याला कोंबडा, दारी बांग देतो सुस्तावल्या आळसाला दूर पांगवतो अन्नासाठी चिलंपीलं, खोप्यामधी किलबिल लेकराची साद येता, पान्हा जन्म घेतो चोचीमधी ममतेला, चिंब भिजवतो अभयता पेरताना, रुजलेली फुलताना फळलेली पाहताना, जेव्हा आनंदतो तेव्हा मीच आयुष्याला, कडेवरी घेतो                                

हातामधी घे तू जरा

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 29/07/2011 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
हातामधी घे तू जरा
हातामधी घे तू जरा गरमागरम तेल खालून वरून अंगाला माझ्या चोळ ||धृ|| कामाला मी निघतो डबा घेवून सकाळी तवाच सुरू होते ग माझी पहीली पाळी उभं राहून लेथमशीन मी चालवतो हातोड्यानं लोखंडावर दणके मी देतो कष्टाचं काम आहे हे सारं; नाही काही खायची भेळ ||१|| दुसर्‍या पाळीनं ग माझी लयी व्हती दैना उन्हातान्हाचा दिस हा जाता जाईना कामगाराचं जीनं हाय लयी बेकार राब राब राबवूनी घेई सुपरवायझर त्याच्यासंग चाले आमचा उंदरामांजराचा खेळ ||२|| तिसरी पाळी तर लयीच महाग आसती मी तिकडे कामात अन तू झोपून र्‍हाती तळमळ तळ

रेडियो विषयी माहिती हवी

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 29/07/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
शॉर्टवेव्ह रेडियो विषयी कुणाला माहिती आहे का? कोणता घेणे चांगले राहील? का? आकाशवाणीचे कार्यक्रम त्यावर जगभर ऐकता येतील ही भाबडी आशा आहे. या शिवाय आंतरजालावर आकाशवाणीचे कार्यक्रम कुठे ऐकता येतील?

आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे...

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शुक्रवार, 29/07/2011 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे... आटपाट नगरातील ही सत्यकहाणी. गावातील कोर्टात एक जज मॅडम होत्या. त्यांचा नवरा गेल्यामुळे त्या एकट्याच होत्या. साधारण ४० एक वय असावं. कोर्टाशेजारीच पोलिस स्टेशनची इमारत. तिथल्या चुलबुल पाम्डेवर त्यांचं मन फिदा झालं आणि त्या दोघानी लग्न केलं. लग्न केलं आणि गोंधळ झाला. कारण चुलबुल आधी विवाहीत असून दोन मुलांचा बाप आहे. त्याचं म्हणणं, मी दोन्ही बायकाना व्यवस्थीत करीन. आणखी एक तिढा. बाई मुसलमान, तर बुवा हिंदु. बाईनी हिंदु धर्मानुसार कुंकू बांगड्या वापरायला सुरुवात केली. गावचे बार असोसिएशन खवळले.

मैत्री

लेखक प्रिया ब यांनी गुरुवार, 28/07/2011 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या जन्मापासूनच ठरलेली असतात असंख्य नाती ही तुझी मावशी, हे तुझे काका, ही आजी, ती मामी .. पण पुढे आपण होऊन एक नातं निर्माण करतो जेव्हा घराच्या चौकटीतून बाहेर पडतो अनेक जण आपल्या परिचयात येतात, बरेच जण आपल्याला भेटतात , त्यातले पुशकळसे ओळखीचे राहतात आणि काहीच जीवाभावाचे होतात हे नातं असतं 'मैत्रीचं' - निरपेक्ष, निखळ अशी सख्या नात्यां इतकीच वाटते ती हवी हवीशी न सांगता आपल्या सुख दु:खात साथ देणारे अडी अडचणीत आपल्या पाठीशी उभे राहणारे हक्काने आपल्या चुकांवर रागावणारे आपल्या यशात आनंदाने सहभागी होणारे ... ह्यात कधीच नसतो द्वेश, ना दुस्वास, ना लोभ असतं फक्त प्रेम, आपलेपणा आणि एकमेका

आई बाबा

लेखक प्रिया ब यांनी गुरुवार, 28/07/2011 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा .. शाळेत पैसे द्यायचे आहेत .. जाणार आहे दोन दिवस सहल!!" "अरे वा... देतो नक्की पर्वा .. खूप कर रे धमाल.. " "आणि मला promise केली होती ना बाहुली आणि भातुकली" "म्हणजे काय!! घेणारच आहे गं छ्कुली .." "झकास पास झाला की घेणार आहे दादाला Hero Honda CD आधी पासूनच ठरवलं ... होत आहे mature एक जुनी FD .. आणि पंचविसाव्या लग्नाच्या वाढदिवशी घेऊया तुमच्या आईला साखळी सोन्याची" "छे!!

काशीतल्या आठवणी - १

लेखक ईश आपटे यांनी गुरुवार, 28/07/2011 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
वाराणसीला जायच बरेच दिवसा पासुन मनात होते. एकदा गंगास्नान करुन सर्व पापांपासुन मुक्ती मिळाली की झाल. असो गंगास्नान तर झालच पण काशीला फिरण, जुनी जुनी मंदिर पाहण, जुनी पुस्तक पाहण, तत्वज्ञान-धर्म ह्यातील कुणा ताकदीच्या इसमाला भेटण असे बरेच उद्देश होते. पण काही कारणान पुढ पुढ जात राहिल. आणि गेलो तर किमान आठ दिवस तरी राहायच ठरवल होत. ट्रॅव्हल कंपन्यांसारख २ दिवसात स्पॉट उरकण्याच्या वृत्तीचा मला प्रचंड तिटकारा आहे. तुम्हाला त्या शहराच फिल ह्यायला हवा. जो बर्‍यापैकी दिवस तेथे राहिलात तरच येतो. भारतीय लोकांची प्रवास करण्याची मानसिकता उरकण्याची असते.

गात येथे तू उगा का थांबलेला

लेखक विदेश यांनी गुरुवार, 28/07/2011 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
गात येथे तू उगा का थांबलेला वाहवा तो करुन मारा पेंगलेला ! जाउ दे त्याला किती उंचावरीही - दोर आम्ही नीट त्याचा कापलेला तोंड भरुनी मानलेला जो सलोखा पाठ फिरताना गळा का दाबलेला ?
काव्यरस