लेखकयुयुत्सुयांनी मंगळवार, 09/08/2011 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक निवेदन
मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे. परंतु ते काही सुटसुटीत अटींच्या चौकटीत बसत असेल तरच...
- आह्वानकर्त्याना बर्याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल.
लेखकसमीरसूरयांनी मंगळवार, 09/08/2011 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
"अगं माधवी, हे काय? तू चक्क आम्रखंड आणलयंस आणि ते ही चितळेंच? तुला माहिती आहे नं काय चाललंय ते?"
"अरे असं काय करतो, माधव? आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. मग काही गोड-धोड नको का जेवणात?"
"ही काय गोड खाऊन सेलिब्रेट करण्यासारखी घटना आहे का?"
"काय???"
"नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की फक्त गोड-धोड खाऊनच आनंद सेलिब्रेट करता येतो का? आपलं एकमेकांवरचं वाढत जाणारं प्रेम काय कमी गोड आहे? त्या तरल, रोमँटीक, गुलाबी भावबंधनाच्या गोडव्यापुढे आम्रखंडाचा गोडवा किती फिका वाटतो हे तुला सांगायची गरज आहे का?"
"अरे हो पण थोडं गोड आणलं बाजारातून तर काय बिघडलं?
लेखकडॉ.श्रीराम दिवटेयांनी मंगळवार, 09/08/2011 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
नटांच्या सिक्स पॅकअॅब्जचे प्रदर्शन असू द्या किंवा नट्यांच्या पुष्ट उरोजांचे अर्धावृत्त दर्शन आजच्या चित्रपटातील हा मसाला भलताच चटकदार बनविला जातोय. याची चटक डोळ्यांना अशी लागते की कुठून कुठून लौल्यस्राव सुरु होतील याचा नेम नाही. सेन्सार मंडळच नेमके आतपर्यंत कोरडे ठणठणीत पडलेय की काय याची शंका येते. अशा उत्तान दृश्याला ते कात्री लावण्याच्या भानगडीत पडत नाहीत की त्यांच्या अनेक भानगडींतून त्यांना वेळ मिळत नाही याचा शोध घ्यावा लागेल. आजच्या चित्रपटसृष्टीला अश्लीलतेचे एवढे मोठे खग्रास ग्रहण लागलेय की ते सुटता सुटण्याची शक्यता मावळलीय.
लेखकप्रभोयांनी सोमवार, 08/08/2011 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,
काल-परवा बहुगुणी काकांनी म्हटल्याप्रमाणे एक-दोन आठवड्यांपासून कानसेन परत सूरू करावं असं मनात होतं.. दोन चार मित्रगण आणी बहुगुणी काकांशी व्यनिमनीच्या गोष्टी केल्यावर सर्वांनी होकार भरला. त्याचा पहिला भाग गणपाशेठ नी टाकला आहेच. गणपा ऑफिसातून घरी निघाल्याने तो काही १-२ तास आता धागा पाहू शकणार नाही. तर आपण पुढचा भाग चालू करूयात. मुळ गाण्याचे केवळ दुवे द्या.
डिस्क्लेमर
१. मेघवेडा, मस्त कलंदर, गणपा, बहुगुणी, रेवती,चतुरंग (शेवटचे तीन जसा वेळ मिळेल तसं) ही मालिका चालू ठेवण्यात भाग घेतील, पण आम्ही एकमेकांची गाणी सिलेक्ट केली नाहियेत.
लेखकपियुशायांनी सोमवार, 08/08/2011 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मिरी पुलाव :
हा माझा आवडता प्रकार आहे बर्याच दिवसापासून विचार करत होते कि ,एकदा वीकेण्ड्ला बनवावा ,पण साहित्याची जमवाजमव होत नव्हती.
गाजर आहे तर अननस नाही , अननस आहे तर सफरचंद नाही ,हिरवे मटार आहेत तर काजुबदाम संपलेले !
लेखकयुयुत्सुयांनी सोमवार, 08/08/2011 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल प्रसिद्ध (खाली वाचा) केलेल्या लेखाचा हा पुढचा आणि शेवटचा भाग. यात ज्यांच्या जन्मत्रिकेतील मंगळ, शनी, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटॊ १३ ऑगस्ट २०११ च्या पौर्णिमेने बाधित होतात, त्यांची यादी दिली आहे. (टीप - ब्लॉगची जाहिरात केल्याचा आरोप सातत्याने होत असल्याने यावेळेस संपूर्ण लेख इथे देत आहे)
पुढे दिलेल्या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत पौर्णिमेमुळे मंगळ सक्रिय होतो.
लेखकविजुभाऊयांनी सोमवार, 08/08/2011 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच शिकागो येथे भरणार्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १५ अधिवेशनानिमित्त काढलेला श्री दीपलक्ष्मी आंतरराष्ट्रीय ( ऑगस्ट २०११) चा अंक हातात आला.
आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो अथ तो इती वाचून काढला. अंक वाचताना एक समाधान मिळाले त्याचबरोबर थोडा अपेक्षा भंगदेखील झाला.
अंक आंतररष्ट्रीय आहे ही एक उत्सुकता होतीच . भारताबाहेरील मराठी लोक काय लिहीत असतील या बद्दल कुतुहल होते.
नाना पाटेकर , गिरीश कुबेर , अनंत सामंत सुप्रीया विनोद( सुप्रीया मतकरी) यांच्या लेखांची रेलचेल होती.
अंकातील लेख सुंदर आहेच.
लेखकनिवेदिता-ताईयांनी सोमवार, 08/08/2011 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- बेसन पिठ एक वाटी, हि. मिरच्या पाच-सहा, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य,
मिठ.कांदा एक बारीक चिरुन, जिरे - लसुण पाच सहा पाकळ्या- खोबरे एक छोटा तुकडा.थोडे लाल तिखट.
कॄती - जिरे - लसुण पाच सहा पाकळ्या- खोबरे एक छोटा तुकडा व मिरची हे सर्व मिक्सरमधुन वाटून घ्यावे.
खमंग फोडणी करावी.त्यावर वरील वाटण परतुन घ्यावे, कांदा परतावा, आता त्यात दोन वाट्या पाणी घालावे, चवीनुसार मिठ घालावे, कोथिंबीर बारीक चिरुन घालावी.