हेलिकॉप्टर
संध्याकाळी साडेपाचचा सुमार असेल. चहा घेता घेता संगणकावर काहीतरी उद्योग चालु होता. म्हणजे कॉफी बनवायचे वीजेवर चालणारे यंत्र कसे वापरावे याचा शोध तू नळीवर घेत होतो. संगणकावर चित्रपट सुरू होऊन स्वागत आणि स्वगत संपवुन तो बुवा यंत्राविषयी काही सांगणार एव्हढ्यात हेलिकॉप्टरचा घरघराट, मागोमाग पक्ष्यांचा कलकलाट. नेमके जे ऐकायला हवे ते निसटले. असा प्रकार तिनेक वेळा घडला. आता हेलिकॉप्टर म्हणजे काही नवलाई नाही हे खरे पण आवाजावरून ते बरेच जवळ वाटले. खिडकीतुन डोकावायचा प्रयत्न केला पण आकाशात काहीच नव्हते. कदाचित ते इमारतीच्य बरोबर वरून गेले असावे.
संसारी माणसाची पाककृती: संडे स्टार्टर्स
अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर!!
यापुर्वी आम्ही बॅचलर पाककृती लिहिली होती. या पाककृतीच्या नावात बॅचलर लिहिता येणार नाही अशी तंबी आम्हाला स्वयंपाक घरात जायच्या आधीच मिळाली. तसेही आम्हाला आज नव्याने कळलेला नियम म्हणजे " नीट आवरलेले स्वयंपाकघर ही नवर्याने स्वयपांक केल्याची खूण आहे"! तुम्हाला काय वाटले?? नवर्याने स्वयंपाक घर आवरले? अहो त्याने स्वयंपाक केल्यावर पुर्ण स्वयंपाकघरच ओट्यावर असते तर मग आपोआप आवरल्या जाणार नाही का??? ;) ;)
तर आमच्या अशाच क्लृप्त्यांमुळे आम्ही आमच्या साठी स्वयंपाक घरात नो एंट्रीचा बोर्ड लाऊन घेतला आहे. आहोत ना आम्ही हुशार?
बृहन्महाराष्ट्र मंडळाची प्रतीक/घोषवाक्य स्पर्धा!
प्रेषक: राधा गुर्जर, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बीएमएम) २०१३ मधील अधिवेशनाच्या मार्केटिंग कमिटीसाठी.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बीएमएम) अधिवेशन म्हटले की अमेरिकेतील मराठी माणसांचा उत्साह अगदी अवर्णनीय असतो. १९७३ पासून दर दोन वर्षांनी बीएमएमचे अधिवेशन ही आता एक परंपराच झाली आहे. यावेळचे हे २०१३ चे अधिवेशन बॉस्टनमध्ये म्हणजे अमेरिकेतील विद्येच्या माहेरघरी भरणार आहे. त्यानिमित्ताने जवळजवळ चार ते पाच हजार मराठी मंडळी अमेरिकेच्या कानाकोपर्यांतून बॉस्टनला येणार असा अंदाज आहे.
कसं जगायचं असतं ?
कसं जगायचं असतं ?
------------------------------------------------------------------------------------------------------------
कष्टातूनच फळ मिळवायचं असतं,
त्यागातूनच बळ कमवायचं असतं,
असंच जगायचं असतं.
निरागस बालकासारखं स्वच्छंद आयुष्य अनुभवायचं असतं,
आणि मग त्याच कोमल चेहेऱ्यावरील
हास्य बनण्याचा प्रयत्न करीत राहायचं असतं,
असंच जगायचं असतं.
'एका दिशेचा शोध' - पुस्तक परिचय
'एका दिशेचा शोध' हे संदीप वासलेकर यांनी लिहिलेले नवीन पुस्तक आहे. लेखक हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे एक विचारवंत आहेत. मुंबईत त्यांची ' स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप' नांवाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांशी त्यांचा सतत संवाद असतो. डोंबिवलीच्या एका छोट्या शाळेपासून सुरु झालेला त्यांचा जीवनप्रवास हा थक्क करणारा आहे.
या पुस्तकात भारताच्या उज्वल भविष्यासाठी अनेक मुद्यांवर सांगोपांग चर्चा केलेली आहे. या जगातील आपल्या देशासारखी वा त्याहूनही वाईट स्थिती असलेल्या देशांनी, त्यातून बाहेर पडून आपली सर्वांगीण प्रगति कशी करुन घेतली याविषयीची माहिती अत्यंत उदबोधक आहे.
मिक्स पराठा ...
मिक्स पराठा.
साहित्य : गव्हाच पीठ ४ वाट्या ,बेसन पीठ १/२ वाटी, उकडलेले बटाटे ४-५ , कोथिंबीर बारीक चिरलेली आवडीनुसार , १ छोटा चमचा जीरा पावडर , एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला , आल-लसूण पेस्ट १ चमचा , पुदिन्याची पान बारीक चिरून ( यात तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता ) आवडीनुसार .हिरवी मिरची पेस्ट एक चमचा ,२ मध्यम कांदे बारीक चिरून ,हळद, मीठ चवीनुसार (चाट मसाला ऑपशणल) , बटर / तूप
कृती : गव्हाच पीठ , बेसन
मिसळपाव