Skip to main content

खेकड्यांची कलाकुसर

लेखक जागु यांनी शुक्रवार, 25/11/2011 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही समुद्रकिनार्‍यावर गेलो की ओहोटी असेल तर किनार्‍याच्या ओलसर वाळून हमखाच खेकड्यांची बिळे दिसतात. मला ही बिळे पहायला नेहमीच आवडतात कारण त्या बिळांच्या बाजूला सुंदर नक्षीकाम तयार झालेले असते. हे खेकडे अगदे छोटे असतात. मधूनच ते तुरु तुरु किनार्‍यावर चालतानाही दिसतात.

थापाच मारणारा -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 25/11/2011 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
संसार हा सुखाचा दोघात चाललेला पत्नी मुकी मनाचा संवाद साधलेला त्या कुंपणावरी का ठेवू असा भरोसा शेतास खाउनीया ज्यानेच घात केला का सापळ्यात आला उपदेशतो सभेला नादात तोच नेता मोहात लालचेला थापाच मारणारा अजुनी सभेत दिसता निवडून तोच येता मतदार भारलेला भजनात आळवीता भावात देव आहे बाजार का न सहता तो भाव वाढलेला

चिकन करी आणी स्पंज डोसा

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 25/11/2011 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य व तयारी : चिकन करी: ५०० ग्राम चिकन साफ करुन तुकडे करुन घेणे. त्याला २ टेस्पून आले+लसुण+ हिरवी मिरची+ कोथिंबीर पेस्ट, १/२ चमचा हळद, १-१/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा गरम-मसाला, १ चमचा धणे पावडर आणी २ टेस्पून दही लावून १ तास मॅरीनेट करून ठेवणे. . दिड कांदा उभा चिरून घेणे ३-४ लसुण पाकळ्या चिरून घेणे ३-४ टेस्पून सुके खोबरे ४ लवंगा

प्.पू.चैतन्य महाराज प्रवचने- समर्थ रामदासांची करुणाष्टके

लेखक विटेकर यांनी शुक्रवार, 25/11/2011 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
॥ श्रीराम समर्थ ॥ " मासानां मार्गशीर्षो s हम... असे भगवंताने भगवदगीतेत आपली विभूती सांगताना म्हटले आहे. दि. २६ नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरु होत आहे. आपणा सर्वांच्या सदभाग्याने याच काळात वारकरी संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष प. पू. चैतन्य महाराज देगलूरकर यांची अमृतवाणी ऐकायला मिळणार आहे, कृपया सर्वांनी या अपूर्व संधीचा लाभ घ्यावा. विषय - समर्थ रामदासांची करुणाष्टके स्थळ - भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे. वेळ - सकाळी ९ ते ११., शनिवार दि. २६ नोव्हे. आणि रविवार दि.

फट्याक

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 25/11/2011 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
"फट्याक" असाच आवाज असावा बहुतेक.. तिथे दिल्लीत वाजला आणि इथे पुण्यापर्यंत त्याचे पडसाद उमटू लागले. झालं हाफिसांमधून "लवकर निघा सुरक्षित पोचा" चे निमित्त सुरू झाले. हाफीस बसकडे जाऊ लागलो तर बहुदा अख्खे हाफीस बस कडे जात असावे. चहुकडे अर्धी जनता मोबाईलला अन मोबाईल हा शरीराचा अवयव असल्याप्रमाणे कानाला चिकटलेले होते. "जर आता गेलो नाही तर बहुदा बसेस सुटाच्याच नाहीत, तेव्हा मी निघतोय ती मिटींग ऑनसईट वरून अटेंड करा आणि काम चेन्नई डीसी वाल्यांना करायला सांग. उद्या ऑफीस असेल की नाही सांगता येत नाही. (!!

मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 25/11/2011 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी मराठी.नेटवर नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात, त्यातील एक लेखन स्पर्धा. मागील वर्षी घेतलेल्या लेखन स्पर्धेला व कविता स्पर्धेला सर्वांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी मराठी सर्वांचा ऋणी आहेच. या वर्षी देखील आपण एक लेखन स्पर्धा घेत आहोत लेखन स्पर्धा २०१२ यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि लेखन स्पर्धेत भाग घेऊन भाषा समृद्धीच्या प्रयत्नात आपला वाटा उचलावा ही विनंती. स्पर्धा १० डिसेंबर २०११ सकाळी १० वा.

अंत नको पाहु!

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 25/11/2011 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
सचिनचे शंभरावे शतक पुन्हा हुकले! हा सद् गृहस्थ आणखी किती वाट पाहायला लावणार आहे? क्रिकेटमधल्या या चमत्कारावर अपेक्षांचे प्रचंड ओझे आहे हे खरे, पण ते त्याच्या कर्तृत्वरील विश्वासामुळेच आहे. शंभर शतके त्यानी नाही करायची तर कोणी? असो. आता वाट पाहायची आणि आशा बाळगायची.