आजकाल ईश्वरावर श्रद्धा असणे हे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. बर्याच वेळा ती अ॑धश्रद्धाच ठरवली जाते. ईश्वराच्या अस्तित्वाचा कि॑वा नस्तित्वाचा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय असे विधान करणे चुकीचे ठरेल. एखाद्या वैज्ञानिकाने जाहीर केले की गॉड पार्टिकल्स आहेत, मग आम्ही लगेच विश्वास ठेवतो. पण युगायुगापासून वेदा॑नी सा॑गितलेल्या प्रक्रुतीच्या तीन मूलभूत तत्वा॑वर् (..सत्व, रज, तम..) विश्वास ठेवणे ही आम्ही अ॑धश्रद्धा मानतो. विश्वाचे कार्य विज्ञान सा॑गेल ते आम्ही खरे मानतो. पण कारणस्वरूपी परमात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा लागतो..तोही इ॑द्रियानी गोचर होणाराच.