अस्तंगत होणार्या अंधश्रद्धा
अस्तंगत होणार्या अंधश्रद्धा
"प्लॅंचेटवर मृताच्या आत्म्याशी संवाद" हा भ्रम पूर्वी सर्वत्र बोकाळला होता.कालान्तराने त्याची निरर्थकता लोकांच्या ध्यानीं आली.ती अंधश्रद्धा नामशेष झाली.एकेकाळी रामबाण म्हणून गाजलेले अनेक औषधोपचार नंतर निरुपयोगी ठरून विस्मृतीत गेले."रेकी " या प्रकाराला अनेक श्रद्धाळू काही काळ फसले. आता ती अंधश्रद्धा अस्तंगत झाली आहे. प्राणिक हीलिंग आणि भाग्यरत्ने हे फसवणूकप्रकार सध्या त्या मार्गावर आहेत.काही वर्षांपूर्वी वास्तुदिशाभूलशास्त्र या भ्रमाची देशात सर्वत्र साथीच्या रोगासारखी लागण झाली. अनेकजण बळी पडले.वास्तुशकुनींनी पैसे कमावले.
मिसळपाव