Skip to main content

अलक

लेखक मालविका यांनी सोमवार, 25/07/2022 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
अलक अर्थात अति लघुकथा अलक 1 प्लॅन्चेटविषयी ऐकलं तेव्हा पासून करून बघण्याची इच्छा होती. पण भिती पण वाटायची. आज मात्र ठरवलं. अन्या आज घरी एकटाच होता त्यामुळे त्याच्याकडेच जमायचं ठरवलं. मी, विन्या, चारू,दिपू नि अन्या. अन्या त्यातल्या त्यात माहितगार. आम्ही काळोख करून मेणबत्ती पेटवली. त्या खाली अक्षरांचा बोर्ड आणि नाणं ठेवलं. सर्वानुमते एका माहितीच्या माणसाच्या आत्म्याला बोलावलं. पाच मिनिटं शांततेत गेली आणि नाणं थरथरलं. सगळ्यांच्या अंगावर काटा आला. धीर करून अन्याने पहिला प्रश्न विचारला. मग भीड चेपली गेली नि सगळे बोलायला लागले. प्रश्न संपले नि मेणबत्ती पण संपली. सर्वांना एकदम भारी वाटत होतं.

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-१० } चायना ऑन अलर्ट

लेखक मदनबाण यांनी रविवार, 24/07/2022 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
मला हा धागा प्रकाशित करताना फार अडचण येत आहे, कितीही प्रयत्न केला तरी धागा प्रसिद्ध करता येत नाही. तेव्हा निदान या धाग्याच्या प्रतिसादात तरी काही लिहात येते का ते पाहतो.

रविवार आणि खून का बदला खून

लेखक धर्मराजमुटके यांनी रविवार, 24/07/2022 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज रविवार.. आज कामाचा कंटाळा........... आलाय, आज तु स्वयंपाक बनव ना ! अगं कंटाळा आलाय तर नको करु स्वयंपाक. आज आपण बाहेर जेवायला जाऊया. नक्को. रविवारी मंदिराबाहेर भिकार्‍यांची गर्दी असते त्यापेक्षा जास्त हॉटेलबाहेर टेबल रिकामं होण्याची वाट बघणार्‍यांची गर्दी असते. मग आपण पार्सल मागवूया का ? नक्को. पार्सल पण फार उशीरा येतं आणि ते पदार्थ पण थंड झालेले असतात. मग काय करायचं ? तुला जेवायचं असतं तेव्हा मी तुला हॉटेलचा पर्याय देते काय ? घरी जेवण बनवते ना ? मुझे खून का बदला खून से चाहिए | हट पगली, ऑख के बदले ऑख मांगोगी तो पुरी दुनिया अंधी हो जायेगी !

ठिगळ

लेखक उपाशी बोका यांनी रविवार, 24/07/2022 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर मी तिच्या विवाहाचे प्रमाणपत्र आणायला सरकारी ऑफिसात गेलो होतो. समोर ५० च्या आसपास वयाचे गृहस्थ होते. नेहमीच्या अनुभवावरून मी चहापाण्याची चौकशी केली. तर ते मला म्हणाले, "आम्ही लग्नाच्या वेळी आणि मयताच्या वेळी पैसे घेत नाही." हे ऐकुन मी थक्कच झालो. पण तरी खात्री करण्यासाठी परत विचारले की अहो, फूल ना फुलाची पाकळी समजून काही पाहिजे तर सांगा, तर मला म्हणाले "नाही, काही नको. ते आमचं प्रिन्सिपल आहे." :) नंतर १५ मिनिटात त्यांनी माझे काम केले. अजून १ थोडासा वेगळा अनुभव. बऱ्याच वर्षांपूर्वी मी फ्लॅट विकला, तेव्हा रजिस्ट्रारच्या ऑफिसात गेलो होतो.

प्रथम नागरिकाचा दिमाखदार शपथविधी

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 23/07/2022 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
Presidential Buggy नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.

जिलचे देवदूत

लेखक पर्णिका यांनी शनिवार, 23/07/2022 04:36 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा वीकांत निवांत मिळावा, कामाच्या आठवड्याच्या व्यस्त दिनक्रमांपेक्षा सर्वार्थानेच निराळा यांसारखे सुख नाही. दोन-तीन महिन्यांतून एकदा असा योग जुळून येतोही. त्यावेळी मला मनसोक्त बागकाम करणे, विशलिस्टमधील बरेच दिवस खुणावणारे पुस्तक बे विंडोच्या आरामशीर बैठकीत बसून वाचणे, जवळपासच्या ठिकाणांना भेटी देणे, नाहीतर बरेच दिवस न केलेली ट्रेल करणे या आणि अशा बऱ्याच गोष्टी करायला आवडतात. मागच्या महिन्यांत अगदी ध्यानींमनीं नसतांना, " अरे! हा तर लंब वीकांत आहे." असा साक्षात्कार झाला. खरे तर आपण सर्वचजण सुट्ट्यांची नेहेमीच आतुरतेने वाट पाहत असतो, त्यानुसार नियोजनही करत असतो.

बहारो फूल बरसाओ - ४

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 21/07/2022 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिसला...... माझे डोळे बहुधा एल ई डी बल्ब लागल्यासारखे चमकले असणार. नक्कीच. पण हे त्याच्या बरोबर कोण आहे. तो एका बाई सोबत बोलतोय. वयाने त्याच्या एकढीच असेल. त्या मुलीच्या कडेवर एक लहान मूल आहे. तो हात पुढे करतो. ते मूल त्याच्या कडे बघून हसंत त्याच्या कडे झेपावलंय. ते मूल आता त्याच्या कडेवर आहे. मागील दुवा http://misalpav.com/node/50403 मला काय करावं सुचत नाहिय्ये. गाढ झोपेत असताना तोंडावर कोणीतरी थंडगार पाण्याचा हबका मारावा तसा धक्का बसलाय. माझ्या हातून रीटर्न गिफ्ट खाली पडतात. आणि जिन्यावरून घरंगळतात.

राष्ट्रपतींचे डबे

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 21/07/2022 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
Presidential Saloon भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद सार्वभौम भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रपतींसाठी रेल्वेचा खास डबा असावा असा विचार पुढे आला नव्हता.