Skip to main content

प्रश्न आणि प्रश्न...

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 02/05/2012 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या महायुद्धानंतर जगात दोन शक्ति अस्तित्वात आल्या. एक अमेरीका, दुसरा रशिया. रशियाचे मांडलिक म्हणवून घेतील असे अनेक देश. रशियाचा जगातल्या अनेक देशांवर वचक. जागतिक राजकारण बोटावर खेळवण्याचं सामर्थ्य रशियामधे होतं. असं काय झालं ताजिकीस्तान, कझाकिस्तान, अझरबैजान असे रशियाचेच तुकडे कसे काय पडले. भारत हे महान राष्ट्र आहे. ज्या इंग्रजांचे जगावर राज्य होते त्या इंग्रजान्ना आमच्या लोकांनी इथून हाकलून लावले. एवढा बलाढ्य शत्रू परास्त केला मग फाळणी का वाचवू शकलो नाही. आज देशाचे एक नाही दोन नाही तीन तुकडे झालेत. भारत पाकिस्तान बांग्लादेश.

मरण, मृत्यू वगैरे वगैरे

लेखक यकु यांनी बुधवार, 02/05/2012 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
युजींसंदर्भात मित्रांशी होणार्‍या बोलण्‍यात नेहमी हा मुद्दा येतो की युजींमध्‍ये युनिक असं काय ? मला जे त्यांच्यातलं युनिक जाणवतं ते म्हणजे किंचीतही गूढ अर्थ मागे न ठेवता सोप्या शब्दांच्या मदतीने प्रश्नाला भिडणे. खूप सुरुवातीच्या काळात युजींचा पवित्रा संवाद सुलभ होता, त्या वेळचा हा संवाद.

टोमॅटोचं सार

लेखक Pearl यांनी बुधवार, 02/05/2012 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
टोमॅटोचं सार... माझं एकदम फेवरेट आहे. हे गरम गरम भाताबरोबर एकदम सह्ही लागतं. १ नंबर Smile आणि नुसतं खायलाही मस्तच लागतं. करायला पण एकदम सोपं. साहित्यः ४-५ लाल टोमॅटो, ४-५ लसूण पाकळ्या (मोठा लसूण असेल तर २ बास होतील) किसून किंवा पेस्ट करून, १ टीस्पून किसलेल आलं किंवा आलं पेस्ट (लसूण पेस्ट च्या निम्मी आलं पेस्ट घ्या), ३-४ टेबलस्पून खोवलेलं ओलं खोबरं, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून हळद, २-३ टेबलस्पून तेल, चवीनुसार तिखट, मीठ, साखर कृती: १. प्रथम टोमॅटो कुकरला लावून शिजवून घ्या.

कॅट'स इन द क्रेडल...

लेखक गवि यांनी बुधवार, 02/05/2012 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
हॅरी चॅप्लिनच्या "कॅट'स इन द क्रेडल" या मूळ इंग्लिश गाण्यावर मनसोक्त स्वातंत्र्य घेऊन मी केलेला गद्यरुप अन्याय : ................................................................................................................. एके दिवशी अचानकच माझं पोर जगात आलं..नेहमीसारखंच अन न चुकता याच जगात आलं.. इकडे माझ्या चार्टवर आखलेल्या बिझनेस फ्लाईट्स अन एअरमाईल्स.. तिकडे ते एकटं एकटं चालायलाही लागलं.. माझ्याच नकळत बोलायलाही लागलं.. वाढता बोलता पोरगं म्हणायचं .."मी बाबासारखा मोठ्ठा होणार..बाबासारखा मोठ्ठा होणार.." .. उबदार घरात बाळाची गादी..

कयाकिंग @ पानशेत (Kayaking)

लेखक मोदक यांनी बुधवार, 02/05/2012 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
सोमवार ते शुक्रवार हाफिस आणि वीकांत फिरण्यात व्यस्त असताना अचानक १ मे ची सुट्टी जाहीर झाली... महाराष्ट्र दिन, कामगार दिन (म्हणजेच बैलपोळा :-p) या गोष्टींना फाट्यावर मारायला लावणारी "Month End" नावाची एक जबरा चीज आहे याची नव्याने जाणीव झाली. पण शेवटी सुट्टी मिळालीच. :-) पानशेत बोटींग क्लब ला जायचे बरेच दिवसांपासून डोक्यात होते. तेच ठरवून सकाळी ०७ वाजता बाईक हाणायला सुरूवात केली..

सम्राट भाउंस अनावृत्त पत्र

लेखक राजघराणं यांनी बुधवार, 02/05/2012 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
राजश्रिया विराजित, अखंडित लक्ष्मी अलंकृत, सकल राजकार्य धुरंधर, प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर, सकल गुणऐश्वर्यसंपन्न, मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ,सकल विद्यालंकृत, न्यायशास्त्रसंपन्न, राष्ट्रवादी विश्वासनिधि श्री श्री श्री सम्राटभाउ मोझे यांस, साष्टांग दंडवत, पत्र लिहिणेस कारण की, गेले काही दिवस आपली सुहास्य व