न देखे रवी
न देखे रवी, ते देखे कवी !
कवींनी आपले कौतुक करण्यासाठी हे खरडले का ? शक्य आहे.कौतुक इतर कोण करणार हो ? कुठल्याही साहित्य संमेलनाला जा. कवी संमेलनाला तुडुंब गर्दी. पण समाजवादी पक्षात जसे नेते जास्त.. अनुयायी कमी, तसे इथे कवी जास्त, ऐकणारे कमी. असो. मी आज कवितांबद्दल लिहणार नाही.(कोणी हु s s श्श्य.. केले ?) पण ही कविता करणारी मंडळी कवितेतर लिखाण करतात तेव्हा खरी बहार येते. शांताबाई शेळके, प्रवीण दवणे,वसंत बापट वगैरे लोक जेव्हा ललित,स्फुट लेखन करतात तेव्हा खरी मजा येते. येथे गण-मात्रांचे, लांबी-उंचीचे बंधन नसाल्याने कसे ऐसपैस लिहतात. तशात गप्पांची आवड असेल तर मोकळेच सुटलेले असतात.
सरप्राईज टेस्ट आणि गोंधळलेला परिक्षक.
मधली सुट्टी संपली आणि नव्या तासाचा टोला पडला. विज्ञानाच्या बाई वर्गात शिरल्या तसा पोरांचा कलकलाट थांबला. बाईंनी पुस्तक उघडुन नवा धडा शिकवायला घेतला. आजचा धडा होता 'मुळं'. बाईंनी फळ्यावर जमतील तशी चित्रं काढत वेगवेगळ्या मुळांचे प्रकार सांगीतले. उदाहरणं ही दिली.
लेकीच्या मनात बाईंची परिक्षा घेण्याची लहर आली. उत्तर माहित असतानाही कार्टीन बाईंना प्रश्न टाकला.
"टिचर स्वीट पोटॅटो इज अ स्टेम ऑर रुट?"
कुणी रताळं 'मुळ' की 'खोड' असं विचरल्यावर पटकन बेधडक 'मुळ' उत्तर आलं असतं. पण 'स्वीट पोटॅटो' म्हटल्यावर चटकन गोंधळ उडणे स्वाभाविक आहे.
घुसमट-२
3
कोण कुणाचा शत्रू ?
मिपावरचे काही धागे वाचल्यानंतर माझ्या मनात खालील शंका उद्भवल्या आहेत. शत्रू नसलेल्या मित्रांसाठी नम्र विनंती. कृपया खुलासा व्हावा.
( ढीसक्लेमर : सदर शंका प्रामाणिक असून कोणाही धागाकर्त्याचे मन दुखावण्याचा त्यामागे हेतू नाही. )
आयड्या बायड्यांचे शत्रू असतात का ?
'मित्रं' शत्रूंचे शत्रू असतात का ?
विडंबन धाग्यांचे शत्रू असतात का ?
सुडंबन विडंबनाचे शत्रू असतात का ?
डू. आयडी 'धू' (वांधार) आयडींचे शत्रू असतात का ? (पोटप्रश्न : शत्रूंचे डू. आयडी कसे ओळखावे ?)
प्रतिसादक धागाकर्त्याचे शत्रू असतात का ?
उपप्रतिसादक प्रतिसादकांचे शत्रू असतात का ?
मालक कुणाचे शत्रू असतात का ?
फक्त धडाडीच्या गुंतवणूकदारांकारिता ! ( केबीआयएल : एक खिडकी ५ दारे )
दोस्तांनो ,
श्री.सदानंद ठाकूर ह्यांच्या एका धाग्यावर मी दिवीस लॅब ची शिफारस केली होती. ( विमेनी त्याला झकास बुच मारले , त्याचा बदला घेण्याचे प्लान सुरु आहेत ) आज दिवीस लॅब १०५० पर्यन पोहोचला आहे . १० % परतावा १ महिन्यात मिळतो आहे. ह्या मध्ये अजुन दम आहेच पण त्याबरोबर एक नवी शिफारस आपल्याला करतो.
टायटल मध्येच डिस्लेमर आहे .
एक्सिट क्र. १ : धडाडी असेल तरच पुढे वाचा अन्यथा नको.
रू .२५० ई.पि.एस. असलेली कंपनी रू. ८०० मध्ये मिळत असेल तर ?
विश्वास
सुमेधा रंगपटात आली तरी प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट चालूच होता. आज तिच्या नाटकाचा पन्नासावा प्रयोगही हाऊसफुल होता.
"एक्सिलंट ! माइंड ब्लोइंग परफॉर्मंस !!' टाळ्या वाजवतच रमेश आत आला. थकल्या चेहर्यावरचा मेकप पुसता पुसता आरशातूनच तिनं रमेशकडे पाहिलं. रमेशचा फ्रेश हसरा चेहरा पाहून तिचा सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जात असे.
रमेशचा स्वभावही असाच होता. त्याच्या सहवासात आल्यावर क्षणभरातच तो कोणालाही आपलंस करून घेत असे. रमेश म्हणजे सुमेधाचा जुना मित्र. अगदी कॉलेजमधे असल्यापासून. कॉलेजमेधे त्यांचा मोठा ग्रूप होता. रमेश त्या ग्रूपचा प्राण.
मिसळपाव
