Skip to main content

ते -१

लेखक स्पा यांनी गुरुवार, 20/09/2012 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
टेकाडाचा चढ संपता संपत नसतो... धावून धावून छाती फुटायला आलेली असते , हातातला पलिता नाचवत तो वाट फुटेल तसा वर चढत असतो. डोक्यावरचा फेटा. सुटून पायात अडकत असला. तरी त्याला त्याच भान उरलेलं नसत..पुरुषभर उंचीच्या माजलेल्या गवतातून कसाबसा वाट काढत तो वर पोचतो.. भणाण वार त्याच्या कानात घुसतं, तसा तो भानावर येतो , धडाडणार काळीज काहीस शांत होतं. तो जिथून वर आला.. त्या टोकाला पाहतो .. दूर खाली.. आता अक्ख्या गढीने पेट घेतलेला असतो. आगीच्या ज्वाळा लपलप करत संपूर्ण गढीचा ग्रास गिळत असतात आतून येणारे भयंकर अभद्र आवाज. अजूनही त्याला ऐकू येत असतात .. तो गुढग्यांवर कोसळतो .

स्वामी तुम्ही तारा

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 20/09/2012 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
धरिला वृथा हट्ट वाळूस पकडतो घट्ट हाती काय उरावे, भाळतो कांचना भोगतो विवंचना खरे काय म्हणावे, गेली वेळ निघोनी मडके फुटके खालोनी, किती ते भरावे, शेवटी जळते काया भवती सगळी माया का मग रडावे, केला अहंकारे दंश वाढतो वासनेचा वंश कोणी सावरावे, विपरीत हे घडले मोहात शरीर सडले कोणी सोडवावे, वाट ही बिकट मार्ग हा धाकट पैलतीरी कोणी धाडावे, पोसतो ही काया स्वामी चरणांसी जाया जवळ तुम्ही करावे, स्वामी तुमचा दास चरणांचा तुमच्या ध्यास बोट तुम्ही धरावे,
काव्यरस

संपादक मंडळ आणि व्यवस्थापकीय संरचना - २

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 20/09/2012 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव .कॉम ला पाच वर्षे पुर्ण झाली आहेत. व्यवस्थापनाचा वाढता व्याप बघता मिसळपावच्या संपादक मंडळात पाच नवीन संपादकांची घोषणा करण्यात येत आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे १) गवि २) वल्ली ३) किसन शिंदे ४) लीमाऊजेट ५) aparna akshay सदर संपादक सहा महिण्यांसाठी किंवा पुढील घोषणेपर्यंत कार्यरत राहील.

प्राणप्रतिष्ठा

लेखक अर्निका यांनी बुधवार, 19/09/2012 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
“आबा, अत्ता गणपतीच्या जवळ का जायचं नाही?” “अत्ताच त्याला आणलंय ना घरी, जरा बसू दे त्याला!” “मग उद्या सकाळी उठल्या उठल्या जायचं ना गं आजी?” “अंघोळ करून मग ! गुरुजी येतील, ते पूजा करतील आणि मग आपण जायचं.” “पण गुरुजी आपल्या आधी त्याच्याजवळ का जाणार आहेत?” “अगं, गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायला म्हणून.” “प्राणप्रतिष्ठा म्हणजे?” हे कुतुहल ओठांशी यायच्या आतच आम्ही झोपायचो. उद्याची वाट बघत. त्या दिवशीची झोप अर्धवट असायची आणि झोपेत पडलेली स्वप्नही! बाहेरच्या खोलीतले दिवे अजूनही मालवलेले नाहीत, दबलेल्या आवाजात तिथून हसण्याचे, गप्पांचे आवाज कानावर येत आहेत.

मिसळपाव - नवी रचना

लेखक सरपंच यांनी बुधवार, 19/09/2012 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आताच मिसळपावचे उर्ध्वश्रेणीकरण पुर्ण केले आहे. महत्वाचे तेवढे काम करून मिपा वापरास सुरू केले आहे. या धाग्यावर तुम्हाला येणार्‍या अडचणी लिहीता येतील म्हणजे त्या ताबडतोब सोडवता येतील. राहीलेली कामे. - १ ) सध्या खरडवहीमध्ये नवीन खरडीची सुचना येत नाही. - नीलकांत

श्री गणेश मूर्तीच्या मागची आरास:- चक्र

लेखक मीनल यांनी सोमवार, 17/09/2012 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
जास्वंदाच्या कळ्यांचे चक्र श्री गणेशाला लाल फुल प्रिय असते. विशेषत: जास्वंदाचे फुल! आमच्या इथे अनेकांच्या घराबाहेरच्या बागेत जास्वंदाच्या फुलांची झाडे लावली आहेत. जांभळा, पिवळा, आबोली, गुलाबी, पांढरा अश्या अनेक प्रकारची जास्वंदाची फुले तिथे आलेली दिसतात. काही दाट पाकळ्यांची असतात तर काही फुले विरळ पाच पाकळ्यांची. तसेच त्यांच्या आकारात लहान मोठेपणा आढळतो. परंतु भारतात पाच लाल पाकळ्यांची, मधुनच उगवलेल्या पिवळ्या तु-यांच्या फुलांनी जशी जास्वंदाची झाडे डवरलेली दिसतात तशी इथे कुठेच दिसली नाहीत. झाडावर दिसलीच तर एकट दुकट फुले! बाजारात विकायला तर अजिबातच नाहीत.

मेसोअमेरिका(५) - तोल्तेक(Artisan)

लेखक किलमाऊस्की यांनी सोमवार, 17/09/2012 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मेसोअमेरिका(४.४) - माया (The Artist) मायन्सच्या र्‍हासानंतर मेसोअमेरीकेच्या वायव्येस उदयास आलेली अजून एक महत्त्वाची संस्कृती म्हणजे 'तोल्तेक'. नौवात्ल भाषेतील "Tollan" या शब्दावरून "तोल्तेक" हा शब्द बनला असावा. तोल्तेक या शब्दाचा अर्थ Artist. हे लोक मेक्सिकोच्या आसपास नक्की कुठून आले याची ठोस माहिती इतिहासात नसली तरी बहुतेक दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण भागात या लोकांची वस्ती असावी.