Skip to main content

आस्थेचे बंध

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 05/12/2012 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी रझा ऍकॅडमीने चालवलेल्या विरोध प्रदर्शनाच्या वेळेस मुंबईच्या आझाद मैदानावर जेव्हा तोडफोड झाली त्यात एक फोटो प्रामुख्याने आपल्या मनाला ठेच लावून गेला. आझाद मैदानावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला एक इसम तोडतानाचा तो फोटो होता. हा फोटो पाहून बऱ्याच जणांना राग आला असेल, व काहींना तर अगदी आताच ह्या इसमाला पकडून हाणायला पाहिजे असे वाटले असेल. हुतात्मा स्मारकाला तोडतानाचे दृश्य आठवून आपल्या मनात कोलाहल सुरू झाला असेल. कोण असेल हा इसम? कोणी भारतीय नागरिक असे कृत्य करू धजेल का? हे कृत्य करताना त्याच्या मनात काय असेल? असे करणारा आपल्या देशाचा शत्रू तर नसेल? पाकिस्तानी तर नसेल?

एगलेस चॉकलेट केक

लेखक अनन्न्या यांनी बुधवार, 05/12/2012 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मैदा १५० ग्रॅम, लोणी १०० ग्रॅम्,मिल्कमेड्साठी ( दूध पाऊण ली.+साखर पाऊण वाटी), १ चमचा बेकींग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, कोको पावडर अडीच चमचे, ५/६ चमचे साखर लागल्यास, दूध अर्धा कप, तूप. क्रुती:पाऊण ली. दूध+पाऊण वाटी साखर मंद आचेवर आटवावे. मिश्रण मिल्कमेड सारखे झाल्यावर गार करावे. मिक्सरला फिरवून एकजीव करून घ्यावे. मैदा, बेकींग पावडर, खायचा सोडा, कोको पावडर चाळणीने तीन वेळा चाळून घ्यावे. यामुळे सोडा,बेकींग पावडर नीट मिक्स होईल. तयार मिल्कमेड आणि लोणी परातीत घेऊन फेसावे.फेसताना अर्धा कप दूध मिश्रणात घालावे. आता चाळलेला मैदा मिश्रणात मिसळावा. मिश्रण एकजीव करावे. ५/६ चमचे साखर मिसळावी.

भीमाशंकर

लेखक नावात्_काय्_आहे यांनी बुधवार, 05/12/2012 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
बारा जोतिर्लिंगापेकी एक , साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात या वेळेस भटकंतीला ( it means trak la ) कुठे जायचे याच्यावर विचार झाला , नि सर्वानुमते भीमाशंकर हे ठिकाण निश्चित करण्यात आले . ट्रेकची तारीख ठरली १ Dec 2012.

पालकाची झटपट कोशिंबीर

लेखक रेवती यांनी बुधवार, 05/12/2012 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: पालक, गाजर, खजूर, कोथिंबीर,मिरची, लिंबू, साखर व मीठ. कृती: सगळ्यात आधी वाटीभर खजुराचे बीया काढून उभे तुकडे करून घ्यावेत. नंतर वाटीभर गाजराचे पातळ काप करून घ्यावेत. सुरीने जमत नसल्यास बटाट्याची साले काढण्याच्या सोलण्याने गाजराचे तुकडे करावेत. वाटीभर पालक धुवून, बारीक चिरून घ्यावा. पालकाच्या अर्धी कोथिंबीर चिरून घ्यावी. चारही चिरलेले प्रकार वेगळे ठेवावेत. एका वाटीत लिंबूरस, साखर, मीठ व अगदी पेरभर (पाहिजे असल्यास जास्त) मिरचीचा ठेचलेला तुकडा असे एकत्र करून ठेवावे.वाढून घेण्याआधी हे सर्व प्रकार हलक्या हाताने एकत्र करावेत.

ड्रॅगनच्या देशात ०३ - बायजींग : स्वर्गमंदीर, रेशीम बनवण्याचा कारखाना व ग्रीष्ममहाल

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 05/12/2012 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३...

बदकांचे फोटो . . .

लेखक हुकुमीएक्का यांनी बुधवार, 05/12/2012 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मी आणि 'चौकटराजा' साहेब पवना डॅम ला फिरायला गेलो होतो. . . तेथील हे फोटो आहेत . . . आपल्या सर्व मि. पा. करांच्या आधीच्या सुचना वाचूनच नवीन लेखन करीत आहे . . .

.
.

गाणे गात रहा

लेखक हारुन शेख यांनी मंगळवार, 04/12/2012 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
लागणार नाही सूर केंव्हा, वेड्यापरी गाशील हवे एक वचन तरी, गात तू रहाशील प्रवास होईल वाळवंटी उन्हातून उष्ण रुक्ष होतील ओठ तुझे,गळा होईल तृष्ण भेगाळल्या वाटेवर रक्ताळल्या पायी जडावल्या पावलांनी चालत तू राही अंती येशी किनार्याशी सुखावेल मन पायांखाली सायीपरी वाळूचे अंगण क्षितिजावर जमून येईल मेघांची नक्षी साद घालतील प्रेमाची आकाशातले पक्षी सोन्याच्या होडीसारखा सूर्य समुद्रावर खुणावेल येण्या तुला नव्या प्रवासावर पुसतील तुझ्या पाऊलखुणा लाटा अलगद गोंजारेल गाल वारा करुनिया नाद शीळ हवी ओठांवर तुझ्याही त्यावेळी सुरांमध्ये ओल हवी कोमल कोवळी खंत नको परतीच्या वाटेवर वेडी शेवटचे स्वप

दृष्टीआड सृष्टी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 04/12/2012 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
दृष्टीआड सृष्टी... हॉटेलात खाताना भटारखान्यात न डोकावणे उत्तम. नेट वर टंगळ चंगळ करताना एक माहिती हाती लागली.. हॉटेल ..टपरी.. ढाब्यावर आपण तंदुरी चिकन ..चिकन टिक्का .तंदुरी रोटी खाल्ली असेलच .. तंदूर मध्ये वापरला जाणारा कोळसा स्मशानात प्रेत जाळल्यावर जो कोळसा उरतो तो कोळसा हॉटेल ..टपरी..