Skip to main content

माझ्या घरची बाग

लेखक neeta यांनी मंगळवार, 18/12/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
झाडांची आवड तर बहुतेकांनाच असते पण ती लावायला कधी जागा नसते, तर कधी त्यांची जोपासना करायला वेळ नसतो. मुंबईत तर ग्रिल मध्ये, बालकनी असेल तर त्यात झाडं लावून लोकं आपली आवड जोपासतात. मग जर आपण शोभेच्या झाडांबरोबर भाज्या, मसाले (मिरच्या कोथिंबीर पुदीना, पाती चहा) लावले तर आपल्याला घरच्या घरी ते मिळतील. त्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्याचा अनुभव मी घेत आहे. तुम्ही पण तो अनुभव घेऊन बघावा. त्यासाठी काही जास्त पैसे खर्च होत नाहीत. तुम्ही बाजारातून कधी पुदीना आणलात त्याच्या काड्या फेकून न देता त्या मातीत खोचून ठेवा. तुम्हाला भरपूर पुदीना मिळेल. कढीपत्ता पण कोणाकडून रोप आणून लावू शकता.

ड्रॅगनच्या देशात ०६ - शियान... एकत्रित चीनची पहिली राजधानी

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 18/12/2012 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

गुजरात विधानसभा निवडणुक-२०१२

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 17/12/2012 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिसळपाववर मागे जाहिर केल्याप्रमाणे मतमोजणीच्या आधी माझे अंदाज जाहिर करत आहे.या अंदाजांसाठी मी १९८० पासून झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि १९९९,२००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल तसेच उमेदवार लक्षात घेतले.विधानसभा मतदारसंघांचे क्षेत्र सर्वसाधारणपणे तालुका हे असते.गुजरातमधील तालुका पातळीवरील राजकारण मला कळते असा माझा अजिबात दावा नाही.तेव्हा या उमेदवारांविषयी गुगलून काही माहिती मिळते का हे बघितले.

आक्रमण

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 17/12/2012 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
सतत भेटीला येणा-यांची वर्दळ काही नजरा झुकलेल्या, काही चोरुन न्याहाळणा-या काल ते पोलिस देखील असेच काय काय विचारीत होते. तिला काहीच उमजत नव्हते, हे कोण आहेत, कशाला चवकशा करीत आहेत? नवरा तिला सारखा समजावित होता. अग तू धीराने घे.

देवबाग - तारकर्ली (महाराष्ट्राचे मॉरिशस)

लेखक नांदेडीअन यांनी सोमवार, 17/12/2012 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
दरवेळी प्रवासात असतांना प्रवासवर्णन लिहायचेच असे मनाशी पक्के ठरवत असतो, पण प्रवासातून परतल्यावर लिहावेसेच वाटत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे फेसबुक. (पूर्वी ऑर्कूट.) हो. कॅमेरा हातात पडल्यापासून लिहिणे कमी झाले आहे आणि फोटोग्राफी जोमात सुरू झाली आहे. त्यामुळे एकदा का प्रवासाच्या फोटो फेसबुकवर टाकल्या की मग लिहावेसेच वाटत नाही. पण आता लेखनसुद्धा परत सुरू करण्याचा विचार करतोय. त्यामुळे एक आत्मिक समाधान मिळते. असो, पुरे झाले माझे लेखनपुराण, विषयावर येतो. दरवर्षी आम्ही कुठेतरी फिरायला जातो आणि या वर्षातली ही दुसरी वेळ. (फेब्रुवारीमध्ये ताडोबाला जाऊन आलो.

पु.ल.देशपांडे उद्यान (सिंहगड रोड)

लेखक neeta यांनी सोमवार, 17/12/2012 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच पुण्यामध्ये सिंहगड रोड्वर ओकायामा ( पु.ल.देशपांडे उद्यान) पाहिली. महानगरपालिकेचे उद्यान असूनही इतके साफ आणि सुंदर आहे. सर्वांनी जरुर भेट द्या. काही फोटो टाकत आहे.

स्ट्रॉबेरि - बनाना स्मुदि...

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 17/12/2012 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
Smoothie उन्हाने अंगाची काहीली झाल्यावर ह्या थंडगार स्मुदिचा आस्वाद घ्या आणि मोठे/बच्चे कंपनीला खुश करा... साहित्यः १. स्ट्रॉबेरि - ८ ते १० २. पीकलेली केळि - २ ३. दहि - १/२ कप ४. साखर - २ ते ४ चमचे ५. बर्फ - ६ ते ८ तुकडे कॄती: १. स्मुदि करण्याआधि १/२ तास सर्विंग ग्लास (रिकामे) फ्रिजर मधे ठेवेणे २. ब्लेंडर मधे सर्व साहित्य एकत्र करुन मिश्रण स्मुथ होईपर्यत फिरवणे ३.