सावली
काल संध्याकाळी मुंबईला येणा-या गाडीत बसल्यापासून सुनंदाला एकदम शांत वाटत होतं. उन्हातान्हात भटकून झाडाच्या सावलीत आल्यावर वाटावं तसंच काहीसं! थकल्याभागल्या अवस्थेत डोळे मिटून निवांत पडावं, कशाचाही विचार करू नये अशी काहीशी तिची अवस्था झाली होती. अर्थात मागे वळून पाहण्याइतकं काही तिचं आयुष्य लांबलचक नव्हतं – अवघी सतरा वर्षाची तर होती ती. हं, आता लग्न लावून द्यायचं म्हणून मामाने दडपून तिचं वय दोन वर्षांनी वाढवून सांगितलं . पण मामाच्या घरातून बाहेर पडायची लग्न ही एकच संधी होती सुनंदाला, आणि तिने ती घेतली होती.
मिसळपाव

