Skip to main content

नौस

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 23/07/2013 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
म्या सक्काळी उटायच्या आदीच आण्णा कुटतरी जातेत. आज सांजच्याला आले तवा हासत व्हते. म्हन्ले, “आन्जाक्का, उद्यापासून आम्ही पण तुमच्या शाळेत येणार बरं का!” ह्ये काय ल्हान नाईत. उगा कायबी बोल्तेत. “तुमास्नी गुर्जी घ्येणार नायती,” म्या बोल्ली. आण्णा हस्ले. म्हन्ले, “हेडमास्तर आहे मी...”. बाबौ! आता कायबी कराया येतंय. कुणाची टाप नाय भांडायची. गुर्जीबी वरडायचे न्हाईत. मज्जा. पन आण्णांचं कायतरी येगळंचं सुरु. अब्यास कर, सुद्द बोल, भांडू नको, श्या दिऊ नको, पाडे म्हन. अकशर चांगलं कहाड. गंपतीचं भजन म्हन. घरात आय, साळंत हे.

बाप.....उर्फ़ वडिल ....!!!!!

लेखक DTPS यांनी मंगळवार, 23/07/2013 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वरील माझे हे पहिलेच लिखाण, चूक भूल माफ असवि. च्याइला आई आणि मुलाच्या नात्या बद्दल सगळेच लिहितात, पण बाप आणि मुलाच्या नात्याच काय हो …। आईशी असलेला नात,ओढ जगजाहीरच कि हो, पण बापाच्या नात्याशी असलेली घट्ट विण कोण जाने….

हिन्दू धर्म म्हणजे काय ?

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 23/07/2013 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात श्री. विजुभौ च्या वारीच्या धाग्यासंदर्भात हा विषय आलेला होता पण सांगोपांग चर्चा झाली नाही. म्ह्णून तिथे टंकलेलेच इथे पुन्हा लिहित आहे. मिपाकर जरुरीप्रमाणे भर घालतील. माझ्या मते खालील बाबी हिंदू धर्माची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. १. कर्माचा सिद्धांत २. पुनर्जन्म ३. अन्तिम सत्य एकच आहे . ( GOD IS ONE and not GOD ARE ONE ) या प्रत्येक मुद्द्याचा ऊहापोह करता येईल पण तो अनेक्वेळा येथे झाला आहे. हे सारे मुद्दे परस्परपूरक आणि एकमेकांत कमालीचे गुंतलेले आहेत. या वरील तीन बाबींना केन्द्रीभूत ठेऊन उभी राहीलेली सर्वंकष जीवन पद्धती म्हणजे हिंदू जीवन पद्धती !

नि:शब्द भावना

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 23/07/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
आपण आपल्या भावना, विचार दु:ख, आनंद, आदर, राग, प्रेम हे शब्दातून व्यक्त करत असतो. प्रसंगी आपण लिहितो, बोलतो, हावभाव करतो आणि आपले विचार व्यक्त करतो, समोरच्यापर्यंत पोहोचवतो. पण काही भावना अश्या असतात की ज्या शब्दात व्यक्त होत नाहीत. याकरिता परमेश्वराने एक प्रभावी माध्यम दिले आहे आणि ते म्हणजे डोळे. डोळे; हे न बोलून बरेच काही सांगून जातात, याच डोळ्यात निर्माण होणारा ओलावा तर जाणिवेचे सगळ्यात प्रभावी माध्यम. माणूस जन्माला येतानाच मुळी सोबत रडण्याची सनई घेउन येतो आणि आपण या जगात आल्याची जाणीव सर्वांना करून देतो.

पर्णोपर्णी

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 23/07/2013 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
घुमता वात वनावनातून कुजबूज ये पानसळीतून जाता वारा जरा विरून स्तब्ध शांतता वृक्षलतातून ll १ ll धूळ उडे स्थलांतरातून हर पर्ण ये मातीत लिंपून येई जे नभ जलभारून नवसंजीवन कणाकणातून ll २ ll पर्णे गुंतती कळ्याफुलातून काही झुलती फांदी-फांदीतून कोणी सांडती गळती वाळून जीर्ण अमोलिक पुस्तकातून ll ३ ll नव्या कुणास दव गोंजारून ये नवजीवन अंकुरातून कोणी पडला देठ मोडून हेळसांड तयाची पाचोळ्यातून ll ४ ll - सार्थबोध

वांग मराठवाडी... आता परीक्षा सरकारची!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 22/07/2013 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण वर्षभरापूर्वी वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या संघर्षाबद्दल लिहिले होते. त्या नंतर बरंच काही घडून गेलं आहे. आणि अजूनही काही ना काही घडत आहे. गेल्या वर्षभरात बर्‍याच मित्रमैत्रिणींनी, हितचिंतकांनी नेहमीच या बाबतीत चौकशी केली, 'आता काय परिस्थिती आहे?' अशी विचारणा केली. म्हणून, हा स्टेटस अपडेट... मूळ लेखन, 'आंदोलन शाश्वत विकासासाठी' या मासिकाच्या जुलै'२०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाले असून, ते सुनिती सु. र. यांनी लिहिले आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीने व त्यात काही भर घालून, ते येथे देत आहे.

सुसला / Susalaa

लेखक टक्कू यांनी सोमवार, 22/07/2013 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
नव्याने कळलेला पदार्थ, सुसला :) परवा माझ्या मोठ्या काकूने घरी बनवलेल ताजं मेतकूट दिलं. वास्तविक मला मेतकूट ह्या प्रकाराबद्दल फारसं प्रेम नाही. म्हणून मी सहज म्हणाले कि अगं जास्त देऊ नकोस. ती पट्कन म्हणाली कि सुसला करुन बघ. मला हे नावच नविन होतं. माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह बघून तिने लगेच recipe सांगितली. कर्नाटक side ला बनणारा हा पदार्थ. साधी सोप्पी recipe with मेतकूट touch ताबडतोब बनवून चाखला आणि माझ्या आवडत्या पदार्थ यादीत भर पडली :) कदाचित ब-याच जणांना माहित असलेला आणि कदाचित ब-याच जणांना माहित नसलेला सुसला इथे share करत आहे. नक्की करून बघा.

झिम्मा – नाट्यचरित्र

लेखक प्रसाद प्रसाद यांनी सोमवार, 22/07/2013 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच विजया मेहता लिखित झिम्मा वाचले. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत कलात्मकतेने केले आहे जे विजयाबाईंच्या पुस्तकाला साजेसे आहे. खरेतर या मुखपृष्ठानेच माझे लक्ष वेधले आणि मी पुस्तक खरेदी केले. झिम्माची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने बाई करतात. त्या आपल्या बालपणाकडे आणि तारुण्यातल्या विजया जयवंतकडे फक्त त्रयस्थपणे पाहताच नाहीत तर स्वत:चा उल्लेखदेखिल त्रयस्थपणे करतात जे सुरुवातीला वाचताना थोडेसे विचित्र वाटते आणि नंतर सवय होते हा आकृतिबंध नंतर नाहीसा होऊन त्या नेहमीप्रमाणे चरित्र सांगतात.

गज्याचे दुकान

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 22/07/2013 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी; एका अगदी लहान गावाकडे जायचा योग आला; खेडेगाव म्हणा हवे तर. मी एका मास्तरांना भेटायला गेलो होतो तिथे एक लहान शाळा आहे असे ऐकले होते; शाळा फारच साधी आहे आणि एकूणच डबघाईला आलेली परिस्थिती आहे. शाळेला काही मदत म्हणून वह्या-पेन, पाट्या-पेन्सिली, प्लास्टिक फळे-मार्कर-डस्टर असे साहित्य घेऊन गेलो होतो. प्रवास झाला; काम झाले, पण एक गोष्ट कायमची लक्षात राहिली. गावात ज्यांच्याकडे काही कामाकरिता गेलो होतो, तिथे त्यांच्या आळीत एक दुकान पहिले; किराणाचे, ते काही केल्या डोक्यातून जाईना.

बुकीश - पुस्तकांवरचा एक टीव्ही शो

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 22/07/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , बर्‍याच दिवसांनी बोलतोय तुमच्याशी ... आजकाल मिसळपाव वर वाचन मात्रच असतो ..पण , असतो एवढं नक्की ... नवं काही केलं की ते मिसळपाव वर अधी सांगायचं ही माझी जुनी सवय ... (बघता बघता मिसळपाव शी कनेक्ट होऊन ५ वर्षे होत आली मला !!! ) त्यासाठीच आजही लिहितोय येथे गेल्या म्हणजे जुनच्या सुट्टीत एक वेगळा प्रयोग केला ... कोल्हापुरात एक लोकल टीव्ही चॅनेल आहे ..चॅनेल "बी" म्हणुन ... त्यासाठी एक टीव्ही शो केला ..बुकीश नावाचा ..