सकाळची वेळ. बंडू शाळेत जाताना माझे लाड केल्याशिवाय पुढे जातच नाही. मालकही रोज पाठीवर थाप मारणारच, दिमतीला गडी ठेवलाय.मी माझ्या बापासारखाच शर्यतीचा बैल आहे.या मालकाला माझ्या बापाने भरपूर बक्षिसे मिळवून दिली म्हणे.
पण बरेच दिवस झाले नेहमीसारखा खुराक मिळत नाहीये. मालक कायतरी बोलत होते. बैलगाडा शर्यत ,कोर्टाचा निर्णय, औताला जुंपूया.
संध्याकाळची वेळ.मालक मला शेतात घेऊन आलेत. मस्त वारा वाहतोय. अरेच्चा!!हे काय?चारी पाय बांबूला बांधून मला खाली पाडले. अचानक खाट खाट आवाज आले. सण्णकन डोक्यात कळ गेली आणि डोळ्यापुढे अंधारी आली. मोठ्याने ओरडायचे होते, पण तोंडातून शब्दच फुटले नाहीत.