Skip to main content

चाळीस हजारी

लेखक निनाद यांनी गुरुवार, 23/01/2014 05:36 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिला चाळीस हजारी टप्पा गाठायला आता अजून फक्त १९१ लेख हवे आहेत. २७ फेब्रुवारी या मराठी दिवसाच्या आधी मराठी विकीला चाळीस हजार लेखांच्या टप्प्यावर घेऊन जाऊया! या साठी अजून जवळपास महिन्याभराचा कालावधी आहे. विकिवर कस्काय लिहायचे बॉ? मराठीविकिवर लेखन करणे अगदी सोप्पे आहे. आपल्याला हवा तो शब्द शोधपेटीत शोधायचा तो लाल रंगात आला तर त्यावर टिचकी द्यायची की लेखनाची खिडकी उघडेल त्यात लिखाणास सुरुवात करायची. झाले! मी काय लेख लिहू? असा प्रश्न असल्यास आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याचा शोध घ्या. काही सापडले नाही तर लेख लिहून टाका.

क्ष-गफ ला पत्र... २

लेखक वडापाव यांनी बुधवार, 22/01/2014 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
क्ष-गफ ला पत्र _____________________________/\_____________________________________ मी ते पत्र ठेवलं. समोर हाताची घडी घालून मस्त पोझ देण्यात आली होती. मला घाम फुटला होता. मी थरथरत्या हातांनी दुसरं पत्र उघडलं. तशी हाताची घडी सुटली. 'एक मिनीट' 'काय झालं?' 'तू हे लेटर वाचलंस ना?' मी 'हो' म्हटल्यावर तिने ते हातात उचलून घेतलं, आणि माझ्याकडे रोखून बघायला लागली. 'त्यातल्या कंटेंट बद्दल, म्हणजे मेसेजबद्दल आपण नंतर बोलूया.. आधी माझे काही डाऊट्स क्लिअर कर.' मी आवंढा गिळला.. 'क-क-कोणते डाऊट्स?' 'शिसानविवि म्हणजे काय?' मी निश्वास सोडला.

करड्या (शतशब्दकथा)

लेखक योगी९०० यांनी बुधवार, 22/01/2014 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
"आर ए करड्या... कुठं मेलास रं !!" सकाळपासनं करड्या दिसला नाही कोठेच.. सारखा ढुशी मारायचा प्वटात. आई लई ओरडायची पण करड्याची शिंगे लागली नाहीत कधीच.. सकाळपासनं म्याबी झ्याक बिझी व्हते. नव्या वहीनीला स्वैपाकात मदत केली. जेवण झाल्यावर मात्र करड्याची लई आठवण आली. दादाच्या लग्नाअगोदर दोन दिवस आधीच आमच्याकडं करड्या आला होता. तेव्हापासनं सारखा माझ्याबरोबरच असायचा, जीव लावला त्यानं. माझा बायफ्रेंड म्हणायचे त्याला सगळे.. एकटाच गेला असेल माळावर बोंबलत चरायला.. चकणीला विचारते.. "काय गं चकणे, करड्याला घेऊन गेली व्हतीस?" "आता करड्या करड्या करतेस..

इच्छापूर्ती..! (कथा)

लेखक psajid यांनी बुधवार, 22/01/2014 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
छे ! वैताग आला आज हातात बाईक नव्हती तर ! कॉलेजला जातोय तेंव्हापासून विनाबाईक हा पहिलाच प्रवास. तुम्ही म्हणाल - मग घरी बसावं. पण नाही, अण्णांनी उभारलेला ज्ञानवृक्ष आणि त्यांच्यातील मायाळू - मनमिळाऊ प्राध्यापकांशी हितगुज नाही झालं तर चुकल्या - चुकल्यासारखं होतं. माणसांच्या वाळवंटात भरकटलेल्या कोकरागत मन कासावीस होतं. म्हणूनच हातात बाईक नसतानाही कॉलेजला आलो होतो. खूप दिवसांनी आज बस चा प्रवास अनुभवला होता. आता घरी जाताना रिक्षाने जावे म्हणून रिक्षा स्टेन्डकडे चाललो होतो. मारुती चौकातून दोनच मिनिटाच्या अंतरावर रिक्षा स्टेन्ड होते. चौकात येउन सहज डावीकडे नजर गेली.

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

लेखक मोदक यांनी बुधवार, 22/01/2014 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
काय..? कुठे..? कधी..? (पुणे) अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर..

स्मार्ट फोन ची निवडनुक

लेखक जोशी 'ले' यांनी बुधवार, 22/01/2014 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो... आज काल सगळ्यांच्याच खिशात स्मार्ट फोन विसावलाय, (विसावलाय कसला :-) ) किंवा ज्यांच्या कडे नाहि ते सुध्दा स्मार्ट फोनच घ्यायचा विचार करतायेत तसेच ज्यांच्या कडे आहे ते त्यांच्या माॅडेल ला कंटाळलेत, मार्केट मधे ईतक्या व्हरायटीज आहेत कि गोंधळुन जायला होतं, नेट वरिल रिव्हयुज पण एका मर्यादे पर्यंत मदत करतात कारण तेहि बर्याचदा पेड असतात, तर या सगळ्यांन वर आपण मिपाकर एक मेकांची मदत करु शकतो BaseMark OS II हे टुल वापरुन, कदाचीत बर्याच जनांना कंम्प्युटर साठी असलेले belark adviser आठवत असेल त्याच धर्तीवर हे टुल काम करते.

सखा सखी

लेखक kalpana joshi यांनी बुधवार, 22/01/2014 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
सखी शेजारिणी तू हसत रहा, हसत रहा हास्यात फुले गुंफीत रहा... प्रत्येक व्यक्तीला सखा, सखीची अगदी लहानपणापासून गरज असते.तान्ह्यबाळासाठी त्याची आई ही सखी असते. तिच्या मायेच्या सावलीत सुरक्षितपणे हा जीव लहानाचा मोठा होत होत स्वतःच्या पायांवर उभा राहतो. आपले आई-बाबा, भावंडे, मित्र हे आपले सखाच असतात. इंग्रजीत म्हण आहे, फ्रेंड इन नीड इज अ फ्रेण्ड इनडीड. मित्र, जो कोणतीही अपेक्षा न करता आपल्या मित्रांना अडीअडचणीच्या वेळी हवी ती मदत करतो, विठ ठल माउलीसारखा तो मित्रांसाठी धावत येतो, तो खरा सखा. जमिनीतून बाहेर येणाऱया नवांकुरांना भूमातेच्या कुशीची ऊब मिळते .

ओला रुमाल

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 22/01/2014 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
"चो, एक प्रॉब्लेम आहे, जरा मदत हवी आहे".़ कथानायक, वय ५५, सर्व काही व्यवस्थित. वयाचा टप्पा, जिथे पुढे काय चा कायमचा छळवाद. "हा प्रॉब्लेम झाला तो कोइमतुर एक्सप्रेस मधे, पूणे ते लोणावळा मधे" हम्म "मी माझा नंबर एका पॅसेंजर ला दीला आहे" बर मग? "त्याला मी ७००० देणे लागतो" ???. "अरे पत्यात हरलो" ३ पत्ती? "हो" अगदी सुरुवाती पासुन, डिटेल्स सांग. "ऑफीस च्या ़कामानिमित्त पूण्याला गेलो १५ मिनीटात काम झाले. १० लाखाची ऑर्डर्‍र मिळाली. अ‍ॅड्रीनलीन लेवल जरा जास्तच होती. ३एसी मधे बसलो. टी.सी बरोबर मांडवली पण झाली. शिवा़जी नगर आउटर गाडी थांबली होती.

बंबईसे आया मेरा दोस्त

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 21/01/2014 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
मला लहानपणापासूनच बंबईसे आया मेरा दोस्त ह्या गाण्याचे खूप अप्रूप होते. बऱ्याच वेळेला मी हे गाणे गुणगुणायचो. कळत न कळत माझ्या मनावर (नको तो) परिणाम झालाच. म्हणजे शाळेत/महाविद्यालयात जात असताना रात्र रात्र जागून अभ्यास करणे, साहजिकच सकाळी उशिरा उठणे, कसे अगदी चांगले वाटत होते! पण तरीहि, काही तरी चुकल्यासारखे वाटायचे, कारण कि आमची न शिकलेली आजी सारखी सांगायची कि “लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे”