मृगगड - उंबरखिंड - भाग २
भाग एक इथे वाचा.
त्या घराच्या बाजुलाच एक हातपंप होता. तिथे चार पाच जणींची कपडे, भांडी धुण्याची लगबग चालू होती. गावात लग्न असल्यामुळे सणाचं वातावरण होतं. मी बसलो होतो त्या घराच्या समोरच डीजेची गाडी सजवून ठेवलेली होती. जेवणं नुकतीच आटपल्याने बाजूला असलेल्या मांडवात पुरुष मंडळी सुस्तावलेली होती, गप्पा चालू होत्या. ‘मावशी बसू ना इथे?’, कपड्यांची बादली घेऊन मी बसलेलो त्या घरात जाणा-या मावशींना मी विचारलं. ‘बस की रे बाबा! बस बस’ प्रेमाचं उत्तर आलं. काही मिनिटं माझा डोळा लागला. अतिशय शांत वाटत होतं.
मिसळपाव
पूर्वी हे अभयारण्य नव्हते.