Skip to main content

अक्कलदाढ - एक काढणे

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी गुरुवार, 31/07/2014 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यात वर असलेली तळटीपः यातली अक्कलदाढ काढणे, सुरवातीला शिकाऊ आणि पकाऊ आणि मग योग्य डॉक्टरांकडे जाणे इत्यादी भाग वगळता लेख फुगवायला अनेक काल्पनिक गोष्टी घातल्या आहेत हे आधीच अतीचाणाक्ष वाचकांनी ध्यानात घ्यावे ही विनंती. तसेच महिला वर्ग, शेतकरी किंवा कामगार वर्ग, प्राणीपक्षीप्रेमी संघटना इत्यादींचा कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा हेतू नाही हे ही लक्षात घ्यावे. डिड आय लीव्ह आउट एनिबडी? हा विनोदी लेख आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. तर आता वाचा... अक्कलदाढ - एक काढणे तर, झालं असं की वुडहाऊसचं 'लाफिंग गॅस' वाचणे सुरु आहे.

स्टर फ्राइड चायनिज चिकन

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 30/07/2014 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
.
साहित्य- ५०० ग्राम बोनलेस चिकन ब्रेस्ट पिसेस हिरवी, पिवळी, लाल भोपळी मिरची १/२ वाटी प्रत्येकी- चौकोनी तुकडे.

"कळसुबाई" एका वेगळ्या वाटेने

लेखक जय२७८१ यांनी बुधवार, 30/07/2014 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
१० वी च्या मे महिन्याच्या रजेतच मी झाडावरून पडून पाय मोडून घेतला. आता या घटनेला १९ वर्षे होऊन गेली. या दरम्यान माझ्या पायावर तीन शस्त्रक्रिया हि झाल्या तरीही माझे क्रिकेट, कबड्डी , बाईक टूर असे अनेक उद्योग आजतागायत चालू आहेत पण आता "कळसुबाई" म्हणजे ............अबब........ "कळसुबाई" महाराष्ट्रातील सर्वोच्य शिखर समुद्रसपाटी पासून ५४०० फुट म्हणजे माझ्यासाठी हे दिव्यच होते पण आमच्या १८ डॉल्फिन ट्रेककिंग आणि बाईकिंग ग्रुप ( 18 Dolphins trekking & biking group ) साथीला असल्याने मी कळसुबाई नक्की सर करीन असा मला विश्वास होता. बऱ्याच मिटिंग नंतर १२ / १३ जुलै २०१४ हा मुहूर्त ठरला.

घोडा का अड(क)ला?

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 30/07/2014 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
लेवॉन अरोनिअन आणि आनंद यांच्यातल्या डावांचं स्टॅटिस्टिक्स अरोनिअनच्या बाजूने आहे (६-२) पण आनंदने त्याला हरवलेले जे डाव आहेत ते दोन्ही अफलातून आहेत. २०१३ सालच्या विक अ‍ॅन झी स्पर्धेतल्या डावाबद्दल मी उंटांची चालच तिरकी! हे रसग्रहण लिहिले होते. तो डाव भन्नाटच होता म्हणजे त्यातली काँबिनेशन्स अशी काही तुफान जमवली होती आनंदने की काही विचारता सोय नाही. मॅग्नुस कार्लसन सुद्धा अवाक झाला होता तो डाव बघून! या वर्षीच्या कँडिडेट स्पर्धेत आनंद जिंकला आणि कार्लसनचा आव्हानवीर म्हणून आता तो नोवेंबरमध्ये खेळेल.

माझे सरकार

लेखक आतिवास यांनी बुधवार, 30/07/2014 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
नवं सरकार सत्तेवर येतं तेव्हा लोकांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात – मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असो. लोकांच्या आशा-आकांक्षांशी नाळ जोडलेली असणं हे खरं तर सरकारला लोकाभिमुख कारभारासाठी आवश्यक आहे याबाबत मतभेद असू नयेत. असा प्रयत्न होत असतो; त्याला मर्यादा असतात आणि तरीही काही प्रमाणात त्याचा उपयोगही असतो. नुकतीच पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या सरकारने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लोकसहभाग वाढवण्याचा एक प्रयत्न सुरु केला आहे.

ट्रेकिंगला जाण्या आधि - शासनाचा नवा नियम - काहि शंका

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 30/07/2014 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र शासनाने साहसी खेळ आयोजित करणार्‍या संस्था व व्यक्तींसाठी एक मार्गदर्शक नियमावली बनवली आहे. हि नियमावली येथे वाचता येईल या संदर्भातली म.टा. मधली बातमी या संदर्भात मला पडलेले प्रश्र्ण ह्या नियमाची नक्की व्यप्ती काय? समजा मि.पा.

तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... तुम्ही असा... आस्तिक?... नास्तिक? ...???

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 30/07/2014 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
"देव आहे की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही. हे जग "देव आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "देव नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे... जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते.

भिमाशंकर - "शिडी घाट" - काही शंका

लेखक मेघनाद यांनी मंगळवार, 29/07/2014 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि माझा मित्र परिवार भिमाशंकर भ्रमंतीला जाणार आहोत, आम्हाला सर्वाना गणेश घाटातून चढाई करण्याचा ५-६ वर्षाचा अनुभव आहे. परंतु सध्या ६-७ वर्षांचा खंड पडला आहे चढाई करण्यात. ह्या वेळेस पहिल्यांदाच गणेश घाट सोडून "शिडी घाटाने" जाण्याचा मनसुबा आहे, परंतु शिडी घाट मार्गाचा कोणालाही अनुभव नाहीये. आता पर्यंत बर्याच जणांकडून वेगवेगळी माहिती मिळाली आहे, तसेच जालावर देखील बर्याच चित्रफिती आणि छायाचित्रे बघून झाली आहेत. त्यावरून तरी शिडी घाट मार्ग जर कठीणच आहे अस जाणवतंय. मुख्य म्हणजे मध्ये जो "रॉक पॅच" लागतो त्याबद्दल सर्वांच्या मनात थोडी दहशत, उत्सुकता आणि खुमखुमी देखील आहे (असायलाच हवी ना?).

पाउस

लेखक vikramaditya यांनी मंगळवार, 29/07/2014 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ झाली आणि काळोखाबरोबर पावसाची रिपरिप वाढली. समोरच्या समुद्र किना-यावर तरुणाईच्या हुल्लडबाजीने जोर पकडला होता. नाना हळु उठले आणि त्यांनी खिडकी लावुन घेतली. जपाची माळ घेवुन बसलेल्या माईंकडे त्यांचे लक्ष गेले. काठी च्या मदतीने ते उठले आणि थरथरत्या हातांनी त्यांनी औषधाचा बॉक्स उघडला. बारीक पांढ-या गोळ्या त्यांनी माईंच्या हातात ठेवल्या. काही न बोलता माईंनी त्या गिळल्या. घडाळ्याचा काटा जस जसा ७ च्या दिशेने सरकु लागला तसे नाना बेचैन झाले. एवढ्यात शेजारच्या काकु उगीचच वर्तमानपत्र घेण्याच्या निमित्ताने डोकावुन गेल्या. काळ इथेच थांबला तर बरे असे वाटुन नानांच्या छातीतील धडधड वाढली.

कस्टमर केअर - एक गंडवणे

लेखक धन्या यांनी मंगळवार, 29/07/2014 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
काल ऑफीसमधून घरी जाताना कसा कोण जाणे माझा मोबाईल हरवला. कदाचित ऑफीसमध्ये राहीला असेल असे वाटून कॉल केला. रींग जात होती. म्हटलं ऑफीसलाच राहीला असावा. सकाळी उठल्यावर पहिले काम रिंग देण्याचे केले. फोन स्विच्ड ऑफ. दुपारी बॅटरी अर्धी झाली होती. म्हटले बॅटरी संपली असेल. ऑफीसला आलो. फोन नाही. अगदी फ्लोअर रीसेप्शनला विचारुन पाहिले. उत्तर "हमको मालूम नही सर." फोन हरवला आहे ही वस्तूस्थीती मनाने स्विकारली. आता पुढचे काम सिम ब्लॉक करणे. कस्टमर केअरला फोन लावला. संयम बाळगून त्यांचे एक दाबा, दोन दाबा ऐकून मला हवा असलेला पर्याय निवडला.