Skip to main content

माझे कुणा म्हणावे ...

लेखक मूकवाचक यांनी गुरुवार, 31/07/2014 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
वैराण वाळवंटी, त्या पानही हलेना माझे कुणा म्हणावे, काहीच आकळेना जावे पळून कोठे, हा खेळ प्राक्तनाचा चिरदाह वेदनेचा, मज दंश साहवेना ज्याने हलाल केले, कित्येक काफिल्यांना तो भास मृगजळाचा, नजरेस पाहवेना जी रोज दाविली मी, घनतृषार्त यात्रिकांना ती वाट मरूस्थळाची, मज कुठेच पोचवेना सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना (हरिहरन यांच्या 'गुलफाम' या संग्रहातील 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' या गझलचा स्वैर भावानुवाद)

फेर्‍यात अडकलेला...

लेखक ऋतुराज चित्रे यांनी गुरुवार, 31/07/2014 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक मित्र कामावरुन परतताना माझ्या घरी आला. नेहमीच्या स्कुटरऐवजी नवीन स्प्लेंडरवरुन तो उतरला. मी विचारले स्कुटर कुठे? स्कुटर विकली व ही नवीन स्प्लेंडर घेतली. मित्राचे अभिनंदन केले व आम्ही घरात आलो. पेट्रोल महागल्यामुळे कदाचीत जास्त अ‍ॅवरेज देणारी स्प्लेंडर बाइक मित्राने घेतली असेल असे मला वाटले. मित्राला तसे विचारले तसा तो म्हणाला, नाही नाही तसे अजिबात नाही, त्याने जे काही कारण सांगितले ते ऐकून मी चक्रावूनच गेलो. मित्राची कंपनी त्याच्या घरापासून अंदाजे तीसएक कि.मी.वर आहे. हायवेने ३०-४० मिनिटात कंपनीत पोहोचतो. नव्या स्प्लेंडरमुळे चक्क २० मि.

बोले तो ...!!!

लेखक योगी९०० यांनी गुरुवार, 31/07/2014 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोकं बोलतात एक पण त्यांना आपल्याकडे काय आहे किंवा आपण किती लई भारी किंवा आपली समाजात किती वट आहे हे दाखवायचे असते. त्याची काही उदाहरणे...तुमच्याकडे अजून उदाहरणे असतील तर टाका.. 1) आख्खा जग पालथा घातला पण रत्नागिरीसारखी कोठेच जवळीक वाटली नाही. 2) कोठला मोबाईल हा? कार्बन का? छान छान..!! माझ्या i-phone पेक्षा display मोठा आहे.. 3) आत्ताच मुंबईहून आलो. वोल्वो स्लीपर कोच असून सुद्धा झोप नाही झाली राव... 4) अय्या..!! कालच्या द लिलामधल्या शेपूच्या भाजीत चीझ काय मस्त मिसळले होते नाही...चव अजूनही गेली नाही तोंडातून... 5) ह्या..!!

नेहमी असंच का होतं ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 31/07/2014 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
१) आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ? २) आपण ट्रेन पकडायला जिथे उभे असतो त्यापेक्षा समोरच्याच फलाटावर गाड्या जास्त येतात? ३) आपण एखाद्या गोष्टीसाठी जीव काढून ठेवतो तरी ती होत नाही पण तीच कोणी दुसऱ्याने केली की सहज होते? ४) आपण एखाद्या कल्पनेला जितके घाबरतो आणि लांब ठेवायचा प्रयत्न करतो तेवढीच ती कल्पना आपल्या बोकांडी बसते ? ५) जगातल्या प्रत्येक माणसाला जरी लॉटरी लागली तरी त्यातही आपला नंबर शेवटचा का असतो ? ६) एखादी संकल्पना आपल्यापुढे कोणीतरी मांड्ल्यावर आणि ती आपल्याला बेहद्द आवडल्यावर ही आपल्याला सुद्धा सुचली असती असं का वाटतं

महाराष्ट्रातील आदिवासींबद्दल माहिती हवी

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 31/07/2014 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिपीडियावर पुरेशी माहिती नसलेला आणि (सांस्कृतीक अंगाने) माहितीची मागणी असलेला एक विषय म्हणजे "महाराष्ट्रातीत आदिवासी". मला वाटते महाराष्ट्रातील शाळांमधून या विषयावर निबंध किंवा प्रॉजेक्ट करून माहिती लागत असावी म्हणून मराठी विकिपीडिया धुंडाळणे चालू होत असावे. एनी वे सर्वसाधारण पणे सर्वांनाच आदिवासी संस्कृतींबद्दल जाणून घेण्यात उत्सूकता असतेच समज गैरसमज असतात, अगदी दोन वेगवेगळ्या आदिवासींना एकमेकांच्या संस्कृती विषयक माहिती असेलच असे नाही.

(तुम्ही कोण म्हणून काय पुसता ? हिम्मत असेल तर वळा मागे?)

लेखक स्पा यांनी गुरुवार, 31/07/2014 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
"भुते आहेत की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही. हे जग " भूत आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "भूत नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे... जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते.

सरकार कुणाचे? श्रीमंतांचे की गरीबांचे?

लेखक arunjoshi123 यांनी गुरुवार, 31/07/2014 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार हे श्रीमंतांवर अन्याय करून गरीबांना फायदे पोहोचवत आहे असा एक आर्थिक युक्तिवाद आहे. म्हणजे करसवलती, दरसवलती, कल्याणकारी योजना, इत्यादीमधून वैगेरे. या मतावर मुद्देसूद अशी चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे. ----------------------- १. सर्वसाधारणपणे या चर्चेकरिता गरीब म्हणजे कोण नि श्रीमंत म्हणजे कोण हे सांगावे लागेल. साधारणतः ज्यांना सरकारी प्रत्यक्षाप्रत्यक्ष सवलतींचा, कल्याणकारी योजनांचा थेट फायदा मिळतो ते गरीब अशी व्याख्या पुरेशी ठरावी.

जडण-घडण ८

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 31/07/2014 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्या शाळेतली तीन वर्ष जवळपास संपत आली. बहुतेक जानेवारी महिना असावा. शाळेला अनुदान मिळायच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या. व्यवस्थापनाने एकावेळी एका शिक्षकाबरोबर बोलायला सुरूवात केली. अनुदान मिळवण्यासाठी संस्थेला द्यावे लागलेले पैसे, त्याच्या परतफेडीसाठी अनुदान मिळाल्यानंतर पहिली तीन वर्षं प्रत्येकाच्या पगारातून कापली जाणारी रक्कम आणि सगळ्यात वाईट म्हणजे प्रत्येकाला तारीख न लिहिता लिहून द्यावा लागणारा राजीनामा. मला इतर शिक्षकांकडून समजत होतंच. शेवटी माझीही वेळ आली. एके दिवशी मधली सुट्टी संपल्यानंतर संस्थाचालकांनी मला बोलावून घेतलं. बदली शिक्षिकेकडे वर्ग सोपवून मी निघाले.

सोनेरी फुलं आणि म्हातारा

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 31/07/2014 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्यागार गवतावर म्हातारा आडवा पहुडलेला होता. जवळच क्यारीत सोनेरी फुलं डोलत होती. म्हातारा रोज पहाटे बगीच्यात यायचा आणि सोनेरी फुलांबरोबर बोलायचा. फुलांनो कसे आहात तुम्ही? छान न!. बासुरी ऐकायला आवडेल का, चौरसिया यांची आहे. काय मस्त आहे न म्हणत मोबाइल आवाज वाढवायचा. कधी फुलांना गाणे ऐकवायचा, कधी गोष्टी सांगायचा. त्याची स्वत:शीच चाललेली अखंड बडबड ऐकून सकाळी बगीच्यात फिरायला येणारे लोक हसायचे ही. पण म्हात्याराला त्याची परवा नव्हती. तो वेगळ्याच दुनियेत हरवलेला होता. एक दिवस नेहमी प्रमाणे म्हातारा, पहाटे बगीच्यात आला. पाहतो काय, क्यारीतली फुलं कुणी उपटलेली होती. म्हाताऱ्याच्या काळजात धस्स झाल.