Skip to main content

आल्प्सच्या वळणांवर - भाग २ - लिंडरहॉफ पॅलेस आणि रेशन पास

लेखक मधुरा देशपांडे यांनी शुक्रवार, 10/10/2014 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
आल्प्सच्या वळणांवर - भाग १ - नियोजन, पूर्वतयारी आणि प्रयाण दुसरा दिवस उजाडला. तसा पहिलाच. कारण मुख्य प्रवासाला सुरुवात होत होती. संध्याकाळपर्यंत नियोजित हॉटेलला पोचायचं एवढंच या दिवसाचं ध्येय होतं. त्यामुळे निवांत आवरून निघालो. सूर्यदेवाने सकाळीच एकदा दर्शन दिलेले दिसले आणि एक ओझे उतरले. जर्मनीतून बाहेर पडण्यापुर्वी पेट्रोल भरणे आवश्यक होते म्हणून ते काम केले.

नथ..........भाग-३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 09/10/2014 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ..........भाग-३ सौ. इंदिरा माधव भानू (खाजगीवाले) दिवाळी काबूलला साजरी काढायची हे ऐकल्यावर मला थोडे दचकायलाच झाले कारण नुकतेच आर्य व ह्यांच्यात झालेल्या संभाषणात मी तेथे काय झाले ते ऐकले होते.

"काही नाही… "

लेखक योगी_१९८५ यांनी गुरुवार, 09/10/2014 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
मनात गोंधळ घालणाऱ्या बहुतेक भावनांना आपल्या जवळील स्त्री-वर्ग, मग तो कोणत्या पण नात्याने जोडलेला असो "काही नाही " या दोन शब्दात सगळी भावना गुंडाळून टाकतो… त्या पैकी काही खालीलप्रमाणे… कधी कधी… इशश्य… कधी कधी… काही तरीच काय हो… कधी कधी… आता शांत बसा… कधी कधी…खाऊ कि मारू आता… कधी कधी…अरे बापरे!!!

"उलटे "

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 09/10/2014 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा एक कामगार होता तो "उलटे "बोलण्यात व गाणे म्हणण्यात माहिर होता लाईट {कामगार भाषेत "लायटी"} गेले कि काम थांबायचे व आम्हि त्याला गाणे म्हणायला सांगायचो.. तो असे म्हणायचा.. वर ओरिजिनल (वरिजनल) खाली उलटे परदेसी परदेसी जाना नही मुझे छोड़ के मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा वादा निभाना मुझे याद रखना कहीं भूल ना जाना ...................................... रपसेदी रपसेदी नाजा हनी झुमे डोछ के झुमे डोछ के रपसेदी रेमे राया दावा भानिना झुमे दाय खरनाहकी लुभ ना नाजा रपसेदी रपसेदी नाजा हनी झुमे डोछ के झुमे डोछ के गाण म्हणताना चाल लय सांभाळुन तल्लिन होऊन म्हणायचा..त्या मुळे मजा यायची खुप धमाल यायची..मस्त कर

मला भावलेलं गाणं

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 09/10/2014 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
घरी येता येता ती तिच्या घराच्या दारात उभी दिसली. मन प्रसन्न झाले. खांदा दरवाज्याच्या चौकटीला टेकवून उभं राहण्याची तिची ती तर्‍हा मोहक होती. ती तशी उभी राहिली की तिच्या कंबरेची उजव्या बाजूला नाजूक कमान तयार होत असे. तिचा उजवा हात कमरेवर आणि डावा हात वेणीशी चाळा करत असे. घरी आलो. चैन पडेना. पुन्हा एकदा तिच्या घरावरून चक्कर मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. ती अजून तशीच उभी होती. मला पुन्हा पाहताच सुरेख हसली आणि आत पळून गेली. मनाला इतकी खुशी इतर कुठल्याच गोष्टीने होत नसे. परत घरी जायला निघालो. आभाळ भरून आलं होतं; पावसाचे थेंब पडू लागले होते. तिच्या त्या हसण्याचा गारवा मनाला गुदगुल्या करतच होता.

तुम्ही काय करता ?

लेखक _मनश्री_ यांनी गुरुवार, 09/10/2014 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ? मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते

मर्डर ऑनलाईन

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 09/10/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
यु यु (युरोपीय युनियन) ची सायबर गुन्हे अन्वेषक संस्था (EC3), ने असे भाकीत वर्तवलं आहे की २०१४ च्या अंता पर्यंत , पहिला 'मर्डर ऑनलाईन' कदाचित झाला असेल. जगात आज सायबर तंत्राद्यान प्रचंड वेगाने मानवी जीवनाचा अविभाज्य अंग बनत आहे. आज पेसमेकर ला ब्लू टूथ वैगरे तत्सम कनेक्टीविटी देण्यात आलेली आहे, हेतू हा की ह्रिदयाची कार्यक्षमता व पेसमेकरची क्षमता, शिल्लक ब्याटरी वैगरे तपासून पाहता येतील. (ह्रिदयाला जोडलेले पेसमेकर व बाहेरील डेटा रिडर यांच्यात संदेशाची देवाण घेवाण होऊन).

त्यांची दिवाळी ..

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 09/10/2014 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिटिंग. जिल्हा अधिक्षक नवरेसाहेबांची केबिन खचाखच भरून गेली होती. ऑफिसच्या कानाकोपऱ्यातून जमा करून आणलेल्या खुर्च्या केबिनमध्ये मावत नव्हत्या अन त्यावर बसलेले वजनदार अधिकारी खुर्च्यांमध्ये मावत नव्हते. आजच्या मिटींगला जिल्ह्यातले सर्व क्षेत्रिय अधिकारी आले होते. मिटिंग तशीच महत्त्वाची होती. दिवाळी तोंडावर आलेली. ग्राहकांच्या खिशात पैसे खुळखुळत होते. व्यापाऱ्यांचे गल्ले भरून वाहत होते. दिवाळीपूर्व काही दिवस म्हणजे वसुलीचा नामी सीझन. वाहत्या गंगेचा लाभ घेऊन वर्षाची थकबाकी निल करण्यासाठी मोर्चे कसे बांधायचे याच्या सूचना नवरेसाहेब जातीने देणार होते आणि त्यासाठीच खास मिटिंगचे आयोजन केले होते.

नथ........भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 09/10/2014 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ............भाग-२ मानसी आर्य कँपबेल........ एम्बसीवरील हल्ल्याची बातमी कळल्यावर वेळासला माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला. मला चैन पडेना. घरात सर्वजण काळजी करु नकोस असे सारखे समजवत होते पण त्यामुळे मला जास्तच रडू येत होते.

अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या (लेख २)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 09/10/2014 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या दुस-या महायुद्धात सहा कोटींहून जास्त लोक मारले गेले - आजवरच्या सर्व संघर्षांमध्ये सर्वात जास्त. हे शक्य होण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा माणसांना मारण्यासाठी झालेला वापर. या भागात एकूण तीन मुलाखती आहेत. त्यावरुन तुमच्या हे लक्षात येईलच की विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात माणसं मारणं हे  अगदीच सहजसुलभ झालं होतं - तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आणि मानसशास्त्रीय दृष्टीनेही.