मदत हवी आहे - मुकबधिर मुलांसाठी मराठी व्याकरण
मी खरंच ब्लँक झाले आहे...
काही महिन्यांपुर्वी टेचात एक जवाबदारी घेतली होती... मुकबधिर मुलांसाठी मराठी व्याकरण शिकण्यास मदत व्हावी म्हणुन काही प्रेझेन्टेशन बनवायचे आहे.. त्यात चित्र / हलती चित्र (अॅनिमेशन) वगैरे वापरुन मुलांना "बघुन / वाचुन" समजेल अशा स्वरुपात हे काम करायचे आहे. ह्यात नाम, सर्वनाम, क्रियापदे, प्रत्यय, अव्यय इ सगळंच आलं.. मला क्रियापदे आणि प्रत्यय हे काम दिलं गेलं...
मुलं पहिली - चौथी ह्या वयोगटातली असावीत.. मी शाळेला भेट देऊ शकले नाही पण हे काम ज्याने सुरु केले त्याच्या कडुन कळालं की साधारण ४ पायर्या आहेत.. त्याला आपण पहिली ते चौथी म्हणु..
मिसळपाव