Skip to main content

आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 11/11/2014 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
वीकांताला आनंद डाव हरला आणि १.५ वि.०.५ असा गुणांनी मागे पडला. कालचा विश्रांतीचा दिवस आज काय घेऊन येतोय बघूयात. आनंदसाठी जिंकणे अनिवार्यच आहे कारण पांढरी मोहोरी आहेत आणि पराभवाचे घाव ताजे आहेत!! आतापर्यंत आनंद ज्याज्यावेळी डाव हरला आहे त्या त्यावेळी त्यापुढचा डाव लगेच जिंकलाय अपवाद मागची जगज्जेतेपदाची स्पर्धा! यावेळी तो अपवाद होता हे सिद्ध करु शकेल का आनंद? कामाचा दिवस असल्याने मला सलग येणे शक्य नाही रसिकांनी डाव पुढे चालू ठेवावा. आनंदने डी४ प्याद्याने डाव सुरु केलाय. पहिल्या ५ मिनिटातच १५ खेळ्या झाल्यात. आनंदचे सी प्यादे बघता बघता सातव्या पट्टित पोचले आणे आणि सी स्तंभ मोकळा झालाय.

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या वाचनालयास, 'स्त्रीया परक्या'

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 11/11/2014 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीयांनी धार्मीक संस्कृतीच जतन करावं मात्र इतर क्षेत्रांएवढच शिक्षण क्षेत्र स्त्रीयांपासून कसे दूर ठेवले जाईल याचा प्रत्येक प्रयत्न प्रत्येक धर्मातील धर्ममार्तंड करत असतात किंवा केलेला असतो. सध्या बातम्यात येत आहे ती अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे वाचनालय ज्या मुख्य वाचनालयात सर्वाधिक पुस्तकांची उपलब्धता आहे त्या मौलाना आझाद वाचनालयात मस्जिदी प्रमाणेच प्रवेश बंद आहे. हा प्रवेश बंद असणे हि गोष्ट नवीन नाही.

विसावा भाग २ (अंतिम)

लेखक मालविका यांनी मंगळवार, 11/11/2014 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
Schluchsee हे गाव एका विस्तीर्ण तलावाकाठी वसलं आहे.अप्रतिम निसर्ग सौंदर्य हि युरोपियन देशांना मिळालेली मोठी देणगी आहे.आणि अर्थातच येथील लोक तिचा पुरेपूर उपयोग करतात पण त्याचबरोबर त्या निसर्गाची जपणूक देखील करतात.अत्यंत आखीव रेखीव नगररचना असूनदेखील निसर्ग सुद्धा पावलोपावली साथ देत असतो.जर काही ठिकाणी नवीन बांधकाम करण्यासाठी झाडं तोडावी लागत असतील तरी दुसरी कडे त्याची भरपाई होते.त्यामुळे इतर आधुनिक सुविधांबरोबरच निसर्ग देखील इथे उपभोगायला मिळतो. हे गाव ज्या तलावाकाठी वसलं आहे तो खूप विस्तीर्ण आहे.गोड्या पाण्याच हे तळ अगदी स्वच्छ आहे.त्यात बोटिंगची,मासेमारी वगैरे सुविधा आहेत.छोट्या बोटी दिवसाच्य

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ६

लेखक मार्गी यांनी सोमवार, 10/11/2014 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ५ सर्व वाचकांना धन्यवाद! आपत्तीचे वेगवेगळे पैलू ९ ऑक्टोबरची सकाळ. काल रात्री झालेली चर्चा अजूनही ताजी आहे. दादाजींनी कालच्या मीटिंगमध्ये हेसुद्धा सांगितलं होतं की आज सकाळी एका ठिकाणी जायचं आहे.

९ नोव्हेंबर १९८९ - शेवटाच्या सुरवातीची पंचविशी!

लेखक विकास यांनी सोमवार, 10/11/2014 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
​९ नोव्हेंबर १९८९ जगाच्या नजरेत ऐतिहासिक दिवस. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे १९६१ साली पूर्व जर्मनीच्या साम्यवादी सरकारने बांधलेली बर्लीन वॉल ही त्या दिवशी कोसळली. नव्हे जनतेने पाडली. हाताची पाचही बोटांची उंची सारखी असावी असा हट्ट करणार्‍या खुळचट साम्यवादाची जाहीरपणे अखेर होण्याची ती सुरवात होती. जाहीरपणे म्हणायचे कारण इतकेच की त्या आधीच १९७८ साली (म्हणजे माओच्या मरणानंतर दोन वर्षाच्या आत) चायनीज प्रेसिडंट डेंग झिआओपेंग यांनी मुक्तअर्थव्यवस्था चायनिज स्टाईल, हळूहळू चालू केली.

रहिमन धागा प्रेम का... ( प्रेमाचा धागा...)

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 10/11/2014 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय । टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय l अत्यंत नाजुक अश्या प्रेमाचा धाग्याला सदैव जपून ठेवावे लागते. एकदा हा धागा तुटला, तर कधी-कधी पुन्हा गाठ मारणे ही शक्य होत नाही. आपली मीरा पतंग उडवीत होती, अचानक पतंगाची दोर तुटली. पतंग हवेत उंच उडाला. थेट स्वर्गात पोहचला. तिथे सोमरसा सोबत अप्सरांचे नृत्य पाहत स्वर्ग सुख भोगू लागला. इथे मीरा जमिनी वर पतंगाच्या विरहात अंतर्बाह्य बुडलेली होती. तिच्या मनात एकाच विचार, पुन्हा पतंग कधी भेटणार. पण धरती आणि आकाशाचे मिलन जवळपास अशक्यच असते.

ती....

लेखक सविता००१ यांनी सोमवार, 10/11/2014 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा यापूर्वी अनाहिता मध्ये प्रकाशित झाली आहे. तिथल्या मैत्रिणींच्या आग्रहाखातर इथे टाकत आहे. पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्यावे.' ती.. एका वेगळ्या व्यथितांची प्रतिनिधी. सगळ्या जगाने सहज धुडकावली तिला ! काय दोष तिचा ? सगळ्यांसाठी खपली फक्त. अपेक्षा ठेवल्या नाहीत. तिच्या नशिबी असं का? मलाच का माया लावली इतकी तिने? असा काय ऋणानुबंध होता या मावशीचा अन माझा? हे उत्तर तर आजही मिळत नाही मला. काही काही कळत नाही मला......... **--** "सविता, चला आता घरी, शुभंकरोती म्हणायचय ना? आजोबा बोलावतायत" मी अगदी तीन वर्षांची असल्यापासून आजीचा हाच उद्योग.

ताजमहाल .....!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 10/11/2014 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
ताजमहाल ....! साल 2000. माझं दहावीचं वर्ष.भरपूर अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे, पुढे सायन्स ला एडमिशन घ्यायचे मग इंजिनीअरिंग करायचे असे आपले बाकीच्या चार चौघिंसारखे माझेही प्लान्स. अर्थात 'चारचौघी ' असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते, हे मान्य असुनही बाकी सगळ्यांकड़े जे आहे ते सगळं माझ्याकडेही असावे अशी अपेक्षा. आणि वयाच्या १५ -१६ व्या वर्शी मित्र मैत्रिणिंचे तर आयुष्यात खुप महत्व. मग काय ते करतील ती पूर्व दिशा ! दहावी ची परीक्षा तोंडावर आली होती आणि रात्रि जागुन जागुन केलेल्या अभ्यासाच्या खुणा पण तोंडावर दिसत होत्या पिम्पल्स च्या स्वरूपात.

जडण-घडण १३

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 10/11/2014 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझी रोजची कामं सुरू होतीच. फ्री लान्सींग बरं चाललं होतं. कंपन्यांना आवश्यकतेनुसार मजकूर द्यावा लागायचा. पण कधी तरी एखाद्या शुभेच्छापत्रांच्या दुकानात शब्द ओळखीचे दिसावेत, उत्सुकतेने कार्ड हातात घ्यावं आणि आपणच लिहिलेला तो मजकूर फार सुसंगत नसलेल्या चित्रासह दिसावा, अशी स्थिती झाली की मन खट्टू व्हायचं. कधी कधी तर मजकूर छापल्यानंतर तो तपासलाही गेलेला नसे. चुकीच्या ठिकाणी तोडलेली वाक्यं, व्याकरणाच्या चुका बघून वाईट वाटायचं. या कामासाठी मी वेगळे पैसे नाही घेणार, असं सांगूनही प्रत्येक वेळी ही तसदी घेतली जायचीच, असंही नव्हतं.