Skip to main content

खटाटोप

लेखक Yash यांनी रविवार, 07/12/2014 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
सरत चालली संध्याकाळ, कामातून निघत नाही वेळ... कसा काढावा येथून पळ, घरी वाट बघे छोटा बाळ... ही सांज भारी खट्याळ, पुढे सरकत नाही घड्याळ... पोटासाठी चालली सर्व धावपळ, झाला चैनीच्या वस्तूंचा सुकाळ... आप्तजनांशी नाही मेळ, कसा हा सर्व खेळ... गणित चुकले जीवनाचे.. नाही कसला ताळमेळ, अंधारातून चालतो आहे.. कधी होईल सकाळ..!!

नवलकोलची भाजी

लेखक अनन्न्या यांनी रविवार, 07/12/2014 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे भात कापणीनंतर कोकणात लाल माठ, मुळा, नवलकोल, गावठी मिरच्या इत्यादी भाज्या लावल्या जातात. याच सिझनला त्या मिळतात. ज्यांनी नवलकोलची भाजी पाहिली नाही, त्यांच्यासाठी हा फोटो आंतरजालावरून साभार. navalcol साहित्यः दोन जुड्या नवलकोल, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, दोन/तीन सुक्या लाल मिरच्या, तिखट, मीठ, गूळ, ओले खोबरे(ऐच्छीक). कृती: नवलकोलच्या कांद्यांवरील कोवळी पाने काढून धुऊन बारिक चिरावीत. कुकरला दोन शिट्या करून घ्याव्या.

कवितेचे रसग्रहण..... एक आनंदोत्सव

लेखक शरद यांनी रविवार, 07/12/2014 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचे रसग्रहण.. एक आनंदोत्सव संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे अपूर्व:कोsपि कोषोsयं विद्यते तव भारती ! व्ययतो वृद्धीमायाति क्षयमायाति संचयात् ! विद्या वाटल्याने वाढते व स्वत:पाशीच साठवून ठेवली तर कमी होते. पण विद्याच कां ? आनंदाचेही तसेच आहे. एखादी कविता वाचल्यावर मला जर आनंद झाला तर मला वाटते हा आनंद माझ्या मित्रांनाही मिळाला पाहिजे. कवितेतून मला आनंद कसा मिळाला ते सांगावयास कविता व तिचे रसग्रहण. मिपावर कविता-रसग्रहणाला चांगले दिवस येत आहेत असे दिसते. श्री.आदित यांनी पहिल्यांदीच लिहून चांगली सुरवात केली. असेच आणखी लेखक मिळाले तर हे दालन समृद्ध होईल.

मराठी अस्मिता … जपली बरं का !

लेखक सवंगडी यांनी शनिवार, 06/12/2014 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले राजकारणाबद्दल कोणी लेख लिहिला नाही. विधानसभा निवडणुका झाल्या,त्यानंतर भरपूर आडवणुका पण झाल्या. पण त्यावर कुणी काही लिहेना "राजकारण" हा सगळ्यांच्या आवडीचा विषय जरी असला तरी तो जरा संवेदनशील पण आहे त्यामुळे त्याकडे वळताना थोडी भीतीच वाटते. निवडणुकांनंतर तर या लोकांनी सर्कसच सुरु करून सामान्य लोकांची काही दिवस करमणूक केली खरी,पण नंतर मात्र "रोजच मरं,त्याला कोण रडं ?" अशी तऱ्हा झाली आणि मग सगळेच त्या चर्चेकडे दुर्लक्षच करू लागले. त्यात राष्ट्रवादीने आपला विदुषकाचा खेळ करून दाखवला.

अचानक जमून आलेला पाताळेश्वर कट्टा

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 06/12/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. पुण्याला येण्याचा अचानक योग जुळून आला, आणी त्यातच एक अचानक कट्टापण जमून गेला. वल्लीने सुचवलेलं 'पाताळेश्वर' हे ठिकाण एकदम अद्भुत. प्रशांत वगळता अन्य मिपाकरांशी भेट होण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. चौकटराजा, इस्पिकएक्का, वल्ली, समीर, सूड, धन्या, यसवायजी, प्रशांत .... सर्वांनी उदंड उत्साहानं गप्पा-गोष्टी केल्या.

झुंज - अंधाराच्या राक्षसांशी

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 06/12/2014 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर महिना सुरु झालेला आहे, सूर्यास्त लवकर होऊ लागला आहे, चार्टर बस मधून घरी परतताना, अस्तांचल जाताना सूर्य दमलेला, ओजहीन दिसत होता. सूर्य अस्त होताच, थंड गार वारे अंगाला झोंबू लागले. बसची खिडकी बंद केली. काळजात धस्स झाले. चित्र-विचित्र निराशेने भरलेले विचार मनात येऊ लागले. खरं म्हणाल तर मला हिवाळ्याची भीतीच वाटते. जिथे साक्षात सूर्यदेव शक्तीहीन झाले तिथे सामान्य माणसांचे काय. हिवाळा म्हणजे छोटे दिवस आणि मोठ्या रात्री. सूर्याची भीती नाहीशी झाल्याने मानवाला त्रास देणाऱ्या अंधाराच्या राक्षसांचे बळ वाढते. दुसऱ्या शब्दांत हिवाळा म्हणजे अंधाराच्या राक्षसांचे राज्य.

मॉरिशियसचा प्रवास

लेखक rajujumle यांनी शनिवार, 06/12/2014 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
मागीलवेळी आम्ही थायलंडचा परदेशातला प्रवास केला. ह्यावेळी मॉरिशियसच्या प्रवासाला जायचं ठरविलं. आता फिरायला जायचे म्हणजे मी आणि कुसुम असे दोघेचजण जात असतो. मुलं आता मोठी झालीत. कामोकामी लागलेत. सर्वांचे लग्न झालीत. पाखरासारखे दूर उडून गेलेत. आता त्यांची सोबत नसते. मग आम्ही दोघेच फिरत असतो. पूर्वी मी नोकरीत असतांना मुलं लहान होते, त्यावेळी १९८६ साली आम्ही सर्वजण नेपाळ येथे काठमांडू पर्यंत गेलो होतो. त्यावेळी मोठा प्रज्ञाशील १० वर्षाचा, संघशील ८ वर्षाचा व करूणा ६ वर्षाची होती. मी अकोला येथेच केसरी टूरच्या ब्रांच ऑफिसला मॉरिशियसचं बुकिंग केलं.

विषाणू

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 06/12/2014 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगत दूरच्या काळात, मंगळावर घडलेली ही कथा. अर्थात, त्यावेळी मराठी किंवा इतर भाषा नव्हत्या. थांबा, तुम्ही नीट समजावून घेतले नाही बहुदा! इतर भाषा नव्हत्या, म्हणजे, भाषाच नव्हत्या. माणसे होती, पण ती देखील आज आपल्याला समजणार नाहीत अशी! जेथे ही कथा घडली तेथे माणूस होता, पण त्याला ना मन होते, ना भाषा! जे काही होते, ते कालच्या काळापेक्षा खुपच वेगळे, आपल्या समजण्याच्या बाहेरचे. म्हणून, आजच्या वाचकांसाठी त्यांना समजेल अशी सादर केली आहे.

आयला लाईन चुकली राव!!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 06/12/2014 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच एक पुस्तक हाती आले.आजकाल पुस्तके घरी येत असतात, पण वाचायला वेळ मिळेलच असे नाही. मिळाला तरी सलग पुस्तक वाचुन होत नाही. रोज थोडे थोडे वाचुन लिंक लागतेच असे नाही.तरी वाचायची हौस काही जात नाही. जित्याची खोड.... तर ह्या पुस्तकाचे नाव निसर्गपूर्ण. कोणी एक लेखक नाही पण दोन संपादक. पुस्तकाची टॅगलाईनच सांगते की निसर्गाच्या विशिष्ट पैलूंचे अभ्यास आणि जतन करणार्‍या निसर्गप्रेमींचे आत्मकथन.पुस्तक हाती आले आणि एकामागुन एक प्रकरणे वाचत गेलो. प्रत्येक प्रकरणाचा लेखक त्याच्या विषयात मास्टर.