Skip to main content

एकटा

लेखक Yash यांनी मंगळवार, 16/12/2014 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
बघतो आहे वाट ती आता तरी येईल, आलीच अगदी वेळेवर तरी पुढे काय होईल... तिचे ते डोळे अन् ती मोहक अदा, ते रेशमी केस पाहून झालोय मी फिदा... तिच जागा आणि वेळ पाळण्याचा विक्रम मी रचला, "पेहली नझर का प्यार" वर विश्वास माझा बसला... इतकं सगळं झालं तरी बोलणं काही होत नाही, समोर जरी आली तरी लक्ष मात्र देत नाही.. सरली अशीच दोन वर्षे आता तरी बोलावं, थेट समोर जाउन आता प्रपोजच करावं... मग विचार केला की कसे तिचे मन वळवू, समोर जाऊन बोलण्यापेक्षा पत्रानेच कळवू... एक छान पत्रं मी लिहिले अन् हिमतीने नेउन दिले, न वाचताच तिने ते फाडून फेकूनही दिले... ती निघून गेली अन् डोळ्यासमोर अंधारी पसरली, पाहिलेली लाखो स्व

बळीराजाची बोगस बोंब!

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 16/12/2014 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्तेत हा अग्रलेख आहे जे वाचून शेतकर्‍यांचे तथाकथित कैवारी खवळून उठतील. पण त्यात काही तथ्य नक्कीच आहे. http://www.loksatta.com/sampadkiya-news/state-government-under-debt-sho… काही मुद्दे असे की शेतकर्‍यांच्याबद्दल बातम्या येतात तेव्हा बळीराजा हवालदिल, बळीराजा बरबाद, बळीराजा अवकाळी पावसाने हैराण वगैरे अशाच असतात. बळीराजा खुशीत, बळीराजाकडे यंदा बक्कळ पैसा अशा बातम्या औषधालाही आढळत नाहीत.

झटकून टाक ती राख...

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 16/12/2014 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
जो बोलत नाही त्याचे ऐकून घेतले जात नाही. जो बोलतो त्याचेच ऐकले जाते. जो देत राहातो त्यालाच मागितले जाते. जो देत नाही त्याला मागितले जात नाही. जो घाबरतो त्यालाच जास्त घाबरवले जाते. जो घाबरत नाही त्यालाच सगळे घाबरतात. जो हक्क गाजवतो, त्याचे कर्तव्य विसरले जाते. जो कर्तव्यच करत राहातो, त्याचे हक्क विसरले जातात. जो टीकाच करतो त्याचेवर कुणी टीका करायला धजावत नाही. जो प्रशंसाच करतो त्याचेकडून टीका ऐकण्याची सवय राहात नाही. तुम्ही फक्त हसतच राहाल तर लोक तुमचे रडणे ऐकणार नाहीत. तुम्ही फक्त रडतच राहाल तर लोक तुम्हाला कधीच हसू देणार नाहीत. तुम्ही भिडस्त राहून लोकांना तुमचा फायदा घेवू देऊ नका. तुम्ही काही

पेशावरमधील शाळेवर हल्ला - पेरले तेच उगवले

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 16/12/2014 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज पाकिस्तानात पेशावरमधील 'आर्मी पब्लिक स्कूल' या शाळेत ७-८ तेहरिक्-ए-तालिबान च्या अतिरेक्यांनी घुसून अंदाधुंद गोळीबार केला. आतापर्यंत या अतिरेकी हल्ल्यात अंदाजे १२३ मुले व ९ इतर जण मृत्युमुखी पडले असून ६ अतिरेक्यांना पाकिस्तानी लष्कराने कंठस्नान घातले आहे. अनेक विद्यार्थी जखमी झाले असून किमान ४० मुलांची प्रकृती गंभीर आहे. 'मलाला'ला काही दिवसांपूर्वीच नोबेल पारितोषिक मिळाल्याचा संताप येऊन तालिबानी अतिरेक्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. तालिबानचा जन्मदाता पाकिस्तानच आहे. जे भयंकर विष पाकिस्तानने पेरले तेच आता त्यांच्यावर उलटले आहे.

धुकं

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 16/12/2014 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यात उमटली चित्रे काही त्यास समजलो जीवन नाती. धुक्यातली नाती धुक्यात विरली जीवन यात्री उदास एकाकी.

रेड सिग्नल

लेखक अद्द्या यांनी मंगळवार, 16/12/2014 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
इथली माझी पहिलीच पोस्ट आहे . . काही चुकलं असल्यास सांभाळून घ्या . ऑफिसचं फुकटचं इंटरनेट वापरून चांगली गाणी / सिनेमा डाउनलोड करणे . आणि ते तिथेच बघत/ ऐकत बसणे या पेक्षा दुसरी मजा नाही . . त्यातही तो कुठला डब केलेला तमिळ / तेलगु सिनेमा असेल . तर मग . . आहाहाहा . काल हि हेच चाललं होतं . .आणि तेवढ्यात . फोन वाजला . कोण आहे हे न बघता मी उचलला . आणि मी काही बोलायच्या आतच . समोरून आवाज आला . " घरी येणार आहेस कि नाही आज . कि तिथेच गादी टाकून दिलाय तुमच्या मालकाने . घर आहे म्हणावं मला . " आणि फोन कट . माझा चेहरा बघून माझा HOD म्हणाला . " मा का फोन था क्या ? . मी म्हणलो . " हा .

स्वामी विवेकानंद- भाग-१ - दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन...

लेखक मारवा यांनी सोमवार, 15/12/2014 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी विवेकानंद एक बहुआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या विषयी विचार करतांना त्यांना एका साच्यात बसविता येत नाही. खर म्हणजे अस कोणत्याच माणसा विषयी होत नाही व करु नये अस वाटत. त्यांच्याविषयी कधी सहानुभुती वाटते कधी चीड निर्माण होते कधी त्यांच्यातली रसिकता भुरळ पाडते कधी आदर वाटतो कधी कौतुक. कधी आश्चर्य म्हणजे मिक्स्ड इमोशन्स म्हणतो तस मला वाटत. त्यांच समग्र साहीत्य वाचतांना त्यांचा पत्रसंग्रह मला विशेष आवडतो. कारण त्यातुन जे स्वामी विवेकानंद आहेत त्यांच्यातील नरेंद्र नावाचा तरुण कधी कधी बाहेर येतो. तो नरेंद्र मला स्वामी पेक्षा जास्त जवळचा वाटतो आवडतो.

बार-बे-क्यू नेशन, द हेवन!

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 15/12/2014 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी पत्नीच्या आग्रहाखातर सयाजी मधल्या बार-बे-क्यू नेशनला गेलो होतो. पुण्यात राहाणार्‍यांना जवळच्या जवळ, अप्रतिम फूड क्वालिटी आणि कमालीचा बहारदार अँबियन्स असलेलं हे एक मस्त रेस्टॉरंट आहे. एकतर ते दहाव्या मजल्यावर आहे आणि फक्त वरुन कव्हर्ड असल्यानं सगळीकडून अमर्याद आकाश सतत दिसत राहतं ( त्यासाठी अर्थात सकाळी जायला हवं). . (फोटो हॉटेल साइटवरुन साभार). इथे कव्हर्ड दिसल्या तरी प्रत्यक्षात साइडस ओपन आहेत. फोटो बहुदा रेस्टॉरंटच्या डाव्याबाजूचा आहे.