Skip to main content

बॅक टु द फ्युचर

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 15/01/2015 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
युनिव्हर्सल पिक्चर्स स्टुडियोचे 'बॅक टू द फ्युचर' सेरिजचे भन्नाट चित्रपट मध्य ८० च्या दशकात आले होते. कि ज्याची संकल्पना काळाची/चौथी-मितीवर बेतलेली होती. मोटाररुपी टाइम मशीनमध्ये चित्रपट आपल्याला थेट भविष्याचा वेध घेत काळाच्या पुढे घेवून धावायचा. भविष्यामधील जग कसे असेल? याची चुणूक पाहत असतानाच कथा पुन्हा एकदा त्यावेळच्या 'चालू वर्तमानात' यायची. प्रेक्षकांना मनात माहिती असायचं की, हे सारे खोटे आहे,पण ते सारे इतक्या परिणामकारक रीतीने चित्रपटात समोर यायचंकी ते नुसते पाहत न राहता त्याचाच एक भाग बनून अनुभवायचे. हे आज आठवण्याचं कारण कि त्या चित्रपटातील भविष्यकाळ, आज आपल्यासाठी वर्तमान आहे.

" महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय?..."

लेखक Sanjay Kokare यांनी गुरुवार, 15/01/2015 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
" महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय ?...." "महाराष्ट्र" हे अनेक महान संताच्या चरनांच्या धुळीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेले मराठी माणसांचे एकमहान राज्य. पण आज महाराष्ट्राकडे बघितले की महाराष्ट्र हे खरीच मराठी माणसाच राज्य आहे का? हा एकमोठा प्रश्न निर्मान होतो.

" आईले विचारल म्या "

लेखक Sanjay Kokare यांनी गुरुवार, 15/01/2015 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
आईले विचारल म्या आपलीपरिस्थिती एवढी गरीब कौन असते?, आईन सांगितल मलेआपनशेतकर्याच्या एथ जन्मलो म्हणुन हे भोगाव लागते !!! आईले विचारल म्या लोक तं आपल्याले जगाचा पोशिंदा म्हणते, आईनं सांगितले कारण त्याईच्या ईथची पोई आपल्या ईथचपिकते !!! आईलाविचारल म्या त्या नेत्याच्या अंगावरले कपडेएवढे पांढरे कसेकाय असते, आईने सांगितले कारण त्यांईच्या कपडाचा कापुस पणआपल्याच मिळते!!! आईले विचारल म्या मग माया अंगावरचे कपडे कौन मयकलेअसते, आईन सांगितले कारण तुया कपडाले कापुस कमी न् घामच जास्त असते!! आईले विचारल म्या मलेशाळेमधुन मास्तर कौन हाकलुन लावते, आईने सांगितल कारण आपल्याजवळ शाळेच्या फी न् कपड्याची सोय नसते!!! आईल
काव्यरस

" नवी क्रांती घडवायची आम्हाला "

लेखक Sanjay Kokare यांनी गुरुवार, 15/01/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
———————————————— हवी आमच्या हक्काची भाकर, नकोय तुमची भिक आम्हाला !! हवय आमच्या मेहनतीच मोल, नकोय लाखोचे दान आम्हाला !! हवय शेतीला चांगल बी बियाणे, नकोय तुमची आश्वासने आम्हाला !! हवाय पिकाला योग्य हमीभाव, नको नावापुरत पॅकेजआम्हाला !! भरायच पोट आम्हा जगातील प्रत्येकाच, कारण जगाची काळजी आहे आम्हाला !! करायच भारताच नाव मोठ, नका करुडिवचण्याचा प्रयत्न आम्हाला !! आम्ही नाही करणार आत्महत्या, कारण मुलाबाळासाठी जगायच आम्हाला !! आमचीनका करुकाळजी तुम्ही, कारण नवी क्रांती घडवायची आम्हाला !! ————————————————— ————————————————— @@ कवी @@ संजयरा. कोकरे अमरावती मो. नं.

" युवकाच्या देशात युवकांच्या समस्या "

लेखक Sanjay Kokare यांनी गुरुवार, 15/01/2015 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
" ये देश युवाओका है " हे वाक्य वेगवेगळ्या भाषातुन वेगवेगळ्या नेत्याच्या मुखातुन वेगवेगळ्या रितीने ऐकायला मिळत. आम्ही ही मान्य करतो की हा देश युवकांचा आहे, जगाचा विचार केला तर सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतातच आहे त्यामुळे भारताला युवकांचा देशम्हटल तर तेउचितच होईल. मग ज्या देशात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे तो देश या जगाच्या स्पर्धेत मागे राहतो तरी कसा ?या प्रश्नाचा विचार केला का आपण कधी.

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 15/01/2015 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.

ओडी बारय्या...

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 15/01/2015 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल इंटरनेटवर सर्फिंग करत असतांना यूट्यूबवर एक गाणं मिळालं. कानात आणि मनात रात्रभर भरून राहिलं म्हणून तुमच्याबरोबर शेयर करतोय... कर्नाटकी संत आणि कवि श्री. पुरंदरदास यांचं हे एक कानडी भजन आहे. आता मला कानडी अजिबात येत नाही. पण हे एकतर भजन आहे आणि त्यातले बरेचसे शब्द संस्कृतोद्भव आहेत त्यामुळे अर्थ समजायला फारशी अडचण येत नाही. हे भजन पूर्वी एम एस सुब्बलक्ष्मी यांनीही गायलेलं आहे पण ते कर्नाटकी शास्त्रीय संगीताच्या पद्धतीने! इथे हेच भजन पं. कैवल्यकुमार गुरव यांनी गायलं आहे ते आपल्या महाराष्ट्रीय स्टाईलने! थोडीफार पं.

@AutismMarathi followed by @DrTempleGrandin! :)

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी गुरुवार, 15/01/2015 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
(लेखमालिकेतील उरलेले लेख पोस्ट करायचे आहेत, मात्र आजची ही घटना मला शेअर करायलाच हवी, त्यामुळे लेखमालिकेला ब्रेक जरा.. ! :) ) मला फार आनंद झाला आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला. डॉ. टेंपल ग्रांडीन नाव घेतलं की कानाला हात जातो इतके आदरणीय व्यक्तीमत्व. स्वतः १९४९ मध्ये वय वर्षे २ असताना ऑटीझम(ब्रेन डॅमेज) डायग्नोसिस मिळालेल्या टेंपल ग्रांडीन - त्यांना मिळालेल्या चांगल्या शिक्षिकांमुळे त्याच्बरोबर अतिशय जिद्दीच्या, धडाडीच्या आईमुळे पुढे बोलू लागल्या, शिक्षण घेतले,अ‍ॅनिमल सायन्समध्ये पीएचडी देखील केली. ऑटीस्टीक लोकांसाठी हग मशिन त्यांनी डिझाईन केले.

वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 15/01/2015 04:02 या दिवशी प्रकाशित केले.
....................................................................................................................................... खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात.