Skip to main content

मन हे माझे

लेखक सुचेता यांनी सोमवार, 02/02/2015 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
सभोवती आसपास कुठंच नसताना तू, माझं मन हे असं तुजभोवती रेखलेलं, उमजेल का कधितरी तुला माझं असं सतत तुझ्या सहवासासाठी घुटमळणं, एका शब्दासाठी, कटा़क्शासाठी तासन तास आसुसणं, परवाच चिडवत होत्या मैत्रिणी, आमच्या खळाळत्या धबधब्याला द्रुष्ट कुणाची लागली? काय त्यांना सांगू तुझं नाव?, छे ! छे !! काहीतरीच काय? स्वतःशीच बोलायच तर होतय बावरायला, खर सांगू ka ? आजकाल हसावसंसुध्दा नाही वाटत.कुणाशी बोलावसंच नाही वाटत, सतत असावं आपल तुझ्या चिंतनात , सुटतात मग आपोआप खोल नि:श्वास, वाटत कधी याबरोबरच जाईल श्वास, खुळी वाटतेय ना कल्पना? आहेच मी अशी वेडी खुळी , तुझ्या विशाल व्यक्तिमत्वापुढे अगदीच बावळी.

मनगटावर मोगर्‍याचे हार आले

लेखक चिमिचांगा यांनी सोमवार, 02/02/2015 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिसळपावावर वधूंच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे उपवर तरूणांची होणारी कुचंबणा, हा विषय चांगलाच गाजतो आहे. एवढा की या विषयावरच्या एका धाग्याने प्रतिक्रियांचा इतिहास रचला.

हाँटींग : मी रात टाकली....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 01/02/2015 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट.... नेहमीप्रमाणे हातातल्या रिमोटशी खेळत असताना झी मराठी चॅनेलवर क्षणभर थबकलो. प्रत्येक ब्रेकच्या आधी कार्य्क्रमाच्या ब्रेकनंतर येणार्‍या भागाची थोडीशी झलक दाखवायचे आजकाल फॅड आहे. तर मी झी मराठीपाशी थबकलो कारण सारेगमच्या सेलिब्रिटी पर्वाचे जुने भाग दाखवत होते. आणि गुप्त्यांच्या 'वंदनाताई' अमृता सुभाषला सांगत होत्या.... "तू गाणं छानच गायलंस. मुळातच हे गाणं अतिशय गोड आहे. खरेतर 'हाँटींग' आहे, त्यांनी अजुन एक दोन उदाहरणे दिली त्यात 'या डोळ्याची दोन पाखरे..." ही होतं.

मराठी दिनानिमित्त लघुकथा स्पर्धा

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 01/02/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख. ..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत. या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील. १. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात. २.

डेथ ऐप्लिकेशन

लेखक म्हया बिलंदर यांनी रविवार, 01/02/2015 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
सर - ह्यालो मी - हं सर बोलाना ? सर - आरं आईक की. . मी - हं सर - त्यो आपला ह्यो हाय का.. गणू ? मी - म्हणजे डॉ. गणेश ना? त्याचं काय? सर - हा त्योच, त्याचा बा म्येलाय तर त्यो गेलाय सुट्टीवर मी - अरेरे. . वाईट झालं. सर - तर त्याला लिहायचय डेथ ऐप्लिकेशन. मी - सर, लीव ऐप्लिकेशन सर - त्येच, मी सुरुवात करून दिलीये फुडच्या दोन ओळी जरा सांगचिल का ? मी - हो सर, काय लिहिलंत? सर - Dear Sir, आता सांग. मी - Dear Sir, I am sorry to inform… सर - Sorry? Sorry कशाला?

मटार - पनीर पुलाव

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 01/02/2015 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
pulao 1 साहित्यः १. मोकळा शीजवलेला भात २. उभे चीरलेले कांदे - २ ३. उभी चीरलेली सीमला मीरची - १ ४. वाफवलेले किंवा फ्रोझन मटार - १/२ वाटि ५. बारीक चीरलेले टोमॅटो - ३ ते ४ ६. पनीर क्युब्स - १ पाकिट ७. पेस्ट - २ चमचे (२ पाकळ्या लसूण, पेरभर आलं, २ हिरव्या मिरच्या, कोथींबीर) ८. बटर क्युब्स - ३ ९. तेल - २ चमचे (म्हणजे बटर जळणार नाहि) १०. गरम मसाला - १/२ चमचा ११. धणे पावडर - १.५ चमचा १२. लाल तिखट - १ चमचा १३.

वैद्यकिय हलगर्जी (मेडिकल नेग्लिजन्स)

लेखक मिश्रेया यांनी रविवार, 01/02/2015 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी माझ्या आयुष्यात आलेल्या वादळाची कहाणी येथे मांडणार आहे. 2010 साली मला मासिकपाळीचा त्रास होत होता,आमच्या फैमिली डॉ ना कन्सल्ट करुन त्यांनी मला माझ्या आग्रहा (Insist) मुळे महिला स्त्री रोग विशेषज्ञ चे नाव रेफर केले त्या मॅडम ने काही टेस्ट करुन मला 3-4 महीने ट्रिटमेंट दिली व दर महिन्याला मासिक पाळी च्या 3-4थ्या दिवशी भेटायला बोलवत असे. औषधोपचार काही लागू पडत नाही हे पाहून मॅडम ने सोनोग्राफी व काही चाचण्या केल्यावर त्या म्हणाल्या कि गर्भ पिशवी काढायला हवी नाहितर कैंसर् होइल.मला हा धक्का च होता,जेमतेम 35 क्रॉस केलेय आत्ताच, हे कसे शक्य आहे?माझा मुलगा 5 वित् व लेक 10वि ला.

मेक्सिको: भाग १ : प्रस्तावना

लेखक समर्पक यांनी रविवार, 01/02/2015 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखमालेत एका नव्या देशाविषयी. भारताशी खूप साधर्म्य असलेले काही देश आहेत त्यातील हा एक. सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय समृद्ध वारसा असलेला, भौगोलिक वैविध्य असलेला, चविने खाणा-यांचा, विविधरंगी देश! भारताप्रमाणे लोकसंख्या, प्रदूषण, गरिबी, बेकारी, अमली पदार्थांचा वाढता व्यापार इ. ला तोंड देत उदयाला येणारी एक महत्वाची बाजारपेठ! थोडा इतिहास भूगोल, अतिप्राचीन नागरी संस्कृती जन्माला घालणा-या मोजक्या प्रदेशांपैकी हा एक.

माझे "Marathi Dictionary For Learners" अ‍ॅंड्रॉईड अ‍ॅप

लेखक कौशिक लेले यांनी रविवार, 01/02/2015 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार "मिपा"करहो ! माझ्या ऑनलाईन मराठी शिकवण्याचा उपक्रम आणि "नवीन मराठी शब्द" या उपक्रमांना आपण मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिलात. म्हणूनच मराठी भाषेसाठीच्या माझ्या नव्या उपक्रमाबद्दल सांगण्यास मी खूप उत्सुक आहे. मी एक नवीन Android App बनवले आहे. "Marathi Dictionary For Learners" या नावाने. हे अ‍ॅप गूगल प्ले वर उपलब्ध आहे.