Skip to main content

पाकीस्तानातील व्हॅलेंटाईन डे

लेखक माहितगार यांनी बुधवार, 11/02/2015 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
नित्या प्रमाणे व्हॅलेंटाईन डे आपला का बाहेरचा वगैरे चर्चा रंगतीलच, विरोध आणि विरोधाच्या काट्या मधूनही गुलाब लाल रंगाची उधळण होत राहील. भारतात तर भारतात पण पाकीस्तान सारख्या इस्लामी देशांमध्ये सर्व कडक कायदे आणि अतीरेकी हाताशी असूनही व्हॅलेंटाईन डे संस्कृतीने बर्‍या पैकी आव्हान उभ केल आहे. सनातनी लोक हिजाब डे अथवा मॉडेस्टी डे म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा करू पहात आहेत. तर कुणी केवळ गझलांच्या कार्यक्रमांवर भागवतात पण मोटरसायकला बांधून लाल हृदयी फुग्यांच्या विक्रीचे फोटोग्राफ काही पाकीस्तानच्या तरुणाईच वेगळ चित्र उभे करतात.

त्रिकूट - भाग १

लेखक हजारो ख्वाईशे ऐसी यांनी बुधवार, 11/02/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
"चिवचिव" "चिवचिव" तिची तंद्री अखेर मोडलीच त्या आवाजाने. मान वेळावून न पाहता तिने तो आवाज पुन्हा ऐकला. हं! आल्या चिमण्या. रोजच येतात म्हणा. आणि रोजच आपण त्यांना खायला टाकतो. आज फरक फक्त इतकाच आहे की रोज ऑफिसला धावतपळत जायची घाई असते. धावतपळत?! स्वतःशीच हसली ती. रावी. तिचं नाव. एक नावाजलेली उद्योजिका. ती इंजिनीअर झाली तेंव्हाच ठरवून मोकळी झाली होती की आयुष्यभर कोणाच्या हाताखाली नोकरी नाही करणार. सुरूवातीची काही स्ट्रगलची वर्षे सोडली की स्वतःची कंपनी सुरू करायची. तिच्या धडाडीने आणि गुणवत्तेने ते फारसं अवघडही नाही गेलं म्हणा तिला.

फायर ..एक करणे

लेखक अत्रन्गि पाउस यांनी मंगळवार, 10/02/2015 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
इंटर्विह्यू धाग्यावर फायर कारणे ह्या विषयी उल्लेख होता म्हणून हा धागा... एक अत्यंत अप्रिय असे हे कर्तव्य असते परंतु बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अतिशय कॉमन गोष्ट ... माझ्या आयुष्यातील ह्या बाबतीतील काही ठळक आठवणी ... १.

काही विस्कळीत प्रश्न

लेखक चिनार यांनी मंगळवार, 10/02/2015 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
काही विस्कळीत प्रश्न विषय - स्विस बँक १. स्विस बँकेतला सगळा पैसा काळाचं असतो का ? २. स्विस बँकवाले ," आमच्या येथे काळे पैसे स्वीकारले जातात" अशी जाहिरात करतात का ? ३. स्विस बँकेची भारतात शाखा आहे का ? ४. स्विस बँकेत खातं उघडायला कुठली कागदपत्र लागतात ? विषय - आंतरराष्ट्रीय बाजार १. आंतरराष्ट्रीय बाजार नक्की कुठे भरतो ? २. या बाजारात मोलभाव होतो का ? की "एकच भाव" अशी पाटी असते ? ३. अमेरिकेचा माल विकला गेला नाही म्हणजे 'आर्थिक मंदी ' असा नियम आहे का ? विषय - महागाई १.

पारंपारिक प्रतिस्पर्धी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 10/02/2015 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर अजुन बरोब्बर ५ दिवसांनी, रविवार, १५ फेब्रुवारी २०१५ रोजी, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासुन बघा, २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे.

५ साल केजरीवाल........ दिल्ली निवडणूक २०१५

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 10/02/2015 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
(खरे तर नविन धागा काढणार नव्हतो पण श्री गुरुजी यांच्या धाग्यावर फक्त भाजपच कशी बरोबर हेच त्यांनी जास्त बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा धागा विश्लेषण युक्त असल्याने त्यात जाहीर मुद्दे जास्त बोलता आली नाहीत, ह्या धाग्यावर रिप्लाय नसले तरी चालतील पण फक्त हाच पक्ष कसा महान असे काही मला म्हणायचे नाही किंवा भाजप, कॉन्ग्रेस ची कशी जिरली हे सुद्धा अधोरेखित करावयचे नाही. धागा हा फक्त पुढील मुद्देसुद अ‍ॅक्शन प्लॅन साठी आहेआणि तो ही मी थोडक्यात देणार आहे. कारण आपण न्युज चॅनेल वर फक्त विज .. पाणी येव्हडेच जास्त पाहिले आहे) प्रथम मुद्दे खुप होउ नयेत म्हणुन १५ -१५ मुद्दे एका रिप्लाय मध्ये देतो.

ये कहाणी थी दियेकी और तुफानकी

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 10/02/2015 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
जर तुम्हापैकी काही लोकांना आठवत असेल, कि ८ वी किंवा ९ वी मध्ये इंग्रजीच्या पुस्तकात बायबलमधील ऐक कथा धडा म्हणून होती, 'डेविड आणी गोलायथ' असा, अश्याच काहिश्या आधुनिक कथेचा मी आज इंटरनेटद्वारे अनुभव घेत आहे. अस म्हणतात, जेव्हा इस्रायेलचा राजा सॉल आणि फिलीस्तिनी सैन्य लढाईमधे एकमेका समोर उभे ठाकले होते, जेव्हा फिलीस्तिनी योद्धा गोलायथ, जो की जवळ जवळ ९ हात उंच, व बराच धिप्पाड, मजबूत चिलखताने मढलेला, मैदानात पाहून, इस्रायेली सैन्यातले बहुसंख्य भीतीने चळाचळा कापू लागले, त्यांची लढ्याची उर्मी कमी होऊ लागली. अश्या परिस्थितीत ऐक तरुण पुढे आला, तो होता डेविड.

केजरीवाल / राज ठाकरे

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 10/02/2015 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत केजरीवाळ यांच्या आम आदमी पक्षाला टोलेजंग बहुमत मिळाले आहे. त्यांची लढाई अक्षरशः दिया और तुफान की लडाई होती. तरीही त्यानी नेत्रदीपक यश मिळवले. कदाचित त्यांचेकडे नक्की काय करायचे आहे याचे प्लॅनिंग होते. भाजपचा पूर्ण नि:पात झाला. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सुद्धा निवडणूक हरला. याची कारणे काय याची चर्चा होईल. मात्र हा धागा काढलाय तो केजरीवालांच्या या विजयातुन महाराष्ट्रात मनसे या पक्षाला बरेच काही शिकण्यासारखे आहे. पुढेमागे राज ठाकरे बाउन्स ब्याक करुन भरघोस यश नक्की मिळवतील. पण सध्यातरी मनसे ची अवस्था फार काही बोलावे अशी नाही.

राँग नंबर - भाग ४

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 10/02/2015 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
रॉंग नंबर : मागील कथानक “हम्म….! पुढे मागे जर मा. राष्ट्रपतींनी परवानगी दिलीच तर मी तुला त्याअ शस्त्राबद्दल सांगेनही ब्रिगेडीयर. पण त्या आधी ती चिप परत मिळवणे किंवा नष्ट करणे हे आपले पहीले काम आहे. त्यासाठी तरी निदाम पख्तुनीपुढे गळाला लावलेले आमिश बनून उभे राहणे मला गरजेचे आहे मित्रा. आय एम सॉरी बट यु हॅव टू अरेंज दॅट समहाऊ.