महिला वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ?
स्त्री वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ?
मुलाखत आणि नोकरी वरून कमी करणे हे विषय आणि त्या वरील प्रतिक्रिया वाचून बरेच दिवस मनात रेगन्ळेल्या विषयाला हात घालू पाहतोय. ध्याग्याचा उद्देश एकांगी टीका करण्याचा नाही तर अनेक जुन्या आणि जाण्यात्या मित्रांशी चर्चा करताना हा विषय नेहमी चर्चेत येतो आणि उलट-सुलट वाद होतात , माझे अनुभव सांगतोय ह्या अनुषंगाने तुमचे अनुभव तुम्ही मांडू शकता.
१.
चॉकलेटचा बंगला ऽऽ
चॉकलेट चा बंगला अजून
आठवतो का हळूच मनात
खरं खरं सांगा बरं
गोष्ट राहील आपल्या आपल्यात...
लहानपण जर जपलं असेल
. बिस्किटांची गच्ची दिसेल
टॉफीच्या दारामधली
झुपकेवाली खार दिसेल ...
लेमनच्या खिडकीमधून
. उंच उंच झोका दिसेल
झोक्यावर बसलात तर
मैनेचा पिंजरा दिसेल
चॉकलेट डे च्या दिवशी आज
पुन्हा ऐकदा बंगला दिसला
तुझीच वाट पहात होतो
असं म्हणून हळूच हसला ...
चॉकलेट च्या या बंगल्यामध्ये
तुम्ही सुद्धा जाऊन या
बालपणीच्या आठवणी त
फेरफटका मारून या!
काव्यरस
एक परंपरा
एक परंपरा
शनीवार आमची शाळा अर्धा दिवस असायची. त्या दिवशी शनीवार होता. शाळेची वेळ ११.३०-२.३. पण त्या दिवशी शाळा दहाC मिनिटे लवकर सोडण्यात आली. कारण २.३० वाजता एक क्रिकेट सामना सुरु होणार होता. एखाद्या क्रिकेट सामन्यासाठी शाळेची वेळ अधिकृतरीत्या बदलणं हि काही साधीसुधी गोष्ट नव्हे, पण तसा निर्णय घेतला गेला कारण २.३० वाजता सुरु होणारा सामना साधासुधा नव्हता, तो होता विश्वकप १९९६ चा उपान्त्यपूर्व सामना. आणि प्रतिस्पर्धी होते भारत वि. पाकिस्तान!!!
आम्ही धावत घरी आलो. आपली पहिली ब्याटिंग होती. सचिन आणि सिद्धुनी सावध सुरुवात केली. त्यांचा जम बसला असा वाटताक्क्षणिच सचिन आउट झाला. छातीतली धडधड वाढली.
प्रिंटरवर छापलेल्या विमानातून प्रवास करायला तयार व्हा !
डोळे चोळू नका. तुमचे डोळे ठीक आहेत... आणि इथे टंकनचूकही झालेली नाही !
तंत्रज्ञांनी विमानाचे इंजिन "छापण्याचे" तंत्र विकसित केले आहे आणि जवळच्या भविष्यात तुम्ही त्या तंत्राने बनवलेले इंजिन आणि इतर भाग वापरून बनवलेल्या विमानातून प्रवास करू शकाल !
.
त्रिमिती छपाई (3D printing) अथवा संयोगी वस्तुनिर्माण (Additive Manufacturing, AM)
तसे बघितले तर 3D छपाई ही काही नवीनं गोष्ट नाही. हे तंत्र १९८० मध्ये नागोया मुनिसिपल इंडस्ट्रियल रिसर्च इंस्टिट्यूट (जपान) मधील हिदेओ कोदामा या तंत्रज्ञाने विकसित केले.बिरहा कि रात…
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेंव्हा खडकी स्टेशन वरून शनिवारी सक्काळी मुंबईसाठी ट्रेन पकडत असे. शक्यतो सकाळची सिंहगड ठरलेली असायची. शेवटचे दोन डबे आमच्यासारख्या ऐन वेळी आरक्षण नसलेल्यांसाठी ठेवलेले असायचे. आमची कोण पर्वा रेल्वे प्रशासनास. आमच्यासारखे जगात फारच असल्याने दोन डबे, खडकीला उघडत असून पुरेसे पडत नसत. त्यामुळे गाडी फलाटाला लागायच्या आधीच, तिकीट वगैरे काढून आत उडी मारण्याच्या तयारीत राहावे लागे. शनिवारी सकाळी हा व्याप करायला प्रचंड कंटाळा येत असे.
असाच एका शनिवारी मी खडकीला पोहोचलो. सकाळी लवकर म्हणजे ५.४५ झाले होते. फार गर्दी व्हायची होती. त्या दिवशी मे महिन्यातसुद्धा थोडसं गार वातावरण होतं. पूर्ण फलाटावर जाग आली नव्हती. एक कोपऱ्यात रेल आहार चालू झाला होता. सकाळच्या रम्य वेळी, गरम चहाचा सुगंध, थोडसं फटफटू लागलेलं, आणि कहर म्हणजे अतिशय सुंदर असं ‘बलमा जानो मोही प्रीत’ हे गाणं लागलं होतं, बेगम अख्तरांच्या ठेवणीतल्या आवाजात. त्यांचा आवाजही असा अगदी जुन्या ठेवणीतल्या पैठणीसारखा आहे. कधी जुन्या एखाद्या लाकडी कपाटात आत हात घालावा आणि कागदात छान बांधलेली जुनी आजीची पैठणी हळुवार काढावी, त्या तलम वस्त्रावरून हात फिरवताना मऊशार आणि उबदार जाणीवेबरोबर मनही कुठेतरी भूतकाळात हरवून जातं, तसा त्यांचा आवाज. त्या आवाजाला अजून साज चढावा तो जुन्या रेडीओमुळे. हे Bose आणि Sennheiser कालची गोष्ट. तांत्रिकदृष्ट्या उत्तम, पण रेडीओ वरच्या खरखरीची सर त्याला नाही. अशी बेगम अख्तरांच्या आवाजातील एखादी जुनी ग्रामोफोन ची तबकडी ऐकत राहावीशी वाटते.
'ति'ची गोष्ट
तो.....
शनिवार
नेहमीच्या सवईने घरी येताना बागेतल्या नेहमीच्या वळणावर उभा होतो. त्या वळणावरचा काळ माझ्यासाठी गेली कित्तेक वर्ष तसाच थांबला आहे. आणि त्याची आता सवयही झाली आहे. रोज जस गणपति-मारुती स्त्रोत्र म्हणतो; तस रोज त्या वळणावर मी काही क्षणांसाठी फ़क्त माझा उरतो.
पण आजचा दिवस वेगळा आहे. आज ती दिसली. तोच जुना वड... तेच जुन बाक... आणि ती देखिल तशीच! काळजाचा ठोका चुकला. गडबडलो... आणि तिच्याशी बोलायची उफाळून आलेली उर्मि दाबून घरी आलो.
ती
शनिवार
10 वर्ष पूर्ण झाली हे शहर सोडून. त्यानंतर कधी मागे वळून नाही पाहिल.
वासोटा - बामणोली ते चोरवणे
वासोटा- बामणोली ते चोरवणे
कामाच्या धबडग्यात आणि पोटापाणाच्या उद्योगात एव्हढा गुंतून गेलो होतो की मलापण गड किल्ल्यांचा विसर पडायला लागला होता. डोंबिवलीहून कल्याणला राहायला गेल्यामुळे तर मित्रपरिवाराचे दर्शनसुद्धा दुर्लभ झाले होते. अक्षरश ७ वर्षे सर्वांपासून दूर कुठेतरी राहायला गेल्यासारखं वाटत होत. रोजचा कल्याण ते अंधेरी प्रवास म्हणजे एक दिव्यचं. रात्री बारा-एक वाजायचे घरी यायला. पण मनात कुठेतरी डोंबिवलीप्रेम जागृत होत. परत सगळ्या मित्रांना भेटायला उत्सुक झालो होतो आणि त्यातच डोंबिवलीमध्ये परतण्याचे माझे प्रयत्न चालू होते आणि एक दिवस आपल्या घरट्यात परतलो.
मराठी कथा
नमस्कार मंडळी!
कादंबरी, आत्मचरित्र, विनोदी साहित्य, कविता असे विविध साहित्यप्रकार हाताळून आता तुमच्या साठी घेऊन येत आहोत एक नवा विषय - मराठी कथा.
आपल्या काही आवडत्या कथांविषयी ह्या धाग्यात बोलूया. जेणेकरुन मराठीतील काही उत्तमोत्तम कथांचा आढावाही घेता येईल.
चला तर मग आपल्या आवडत्या कथांविषयी लिहायला.
मिसळपाव