Skip to main content

" The Original Love Story" (Part 1)"

लेखक विनित राजाराम धनावडे. यांनी गुरुवार, 12/03/2015 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
" अरे .... विनू ?...... अजून घरी नाही गेलास ? ", " हो. निघतोच आहे सर आता.", " OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा.", "असं .. का सर ?", "अरे , बाहेर बघितलास का ? पाऊस सुरु होणार आहे म्हणून बोललो." "पाऊस ?.... आता ?" " कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहित नाही वाटते ?", " नाही सर . खरंच नाही माहित ", "अरे माणसा, आज ७ तारीख, ७ जून . आज पावसाची सुरवात होते , एवढं तरी माहित आहे ना ? " त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले ," चल निघ लवकर . पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरवात होईल . छत्री आहे ना?. " पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता.

रघूची गोष्ट

लेखक सौन्दर्य यांनी गुरुवार, 12/03/2015 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना, सहावी किंवा सातवीत, हिंदीच्या पुस्तकात आम्हाला एक धडा होता, 'जादुके सिक्के’. त्यात एका रघु नावाच्या १० वर्षाच्या मुलाची कथा होती. एक रघु नावाचा मुलगा असतो, तो फार परोपकारी आणि स्वभावाने चांगला असतो. तो दुसर्यांना मदत करायला नेहेमी तत्पर असायचा. ह्या रघुच्या शेजारी एक आजीबाई एकट्या राहत असतात. वयाप्रमाणे त्या थकल्या-भागल्या असतात त्यामुळे त्यांना दैनंदिन कामे करणे देखील कष्टाचे झाले होते, त्यात त्यांचे डोळेही अधू होत चालले होते. रघु ह्या आजींच्या घरी नेहेमी येत जात असे, आजींची झेपतील ती कामे तो करत असे, निघताना आजी रघुला काहीतरी खाऊ देत असत.

ऑनलाईन व्यवहार : पैसे परत मिळण्याबाबत माहिती हवी आहे

लेखक अस्वस्थामा यांनी बुधवार, 11/03/2015 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, थोड्या दिवसांपूर्वी (बहुतेक मोदक) यांनी बॅंक आणि इतर वित्तीस संस्था, आर्थिक फसवणूका अशा संदर्भात धागा काढला होता. सध्या मी पण अशीच एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. वित्तीय व्यवहारांची जास्त खोलात माहिती नसल्याने आणि सध्या स्वतः भारतात नसण्याने मर्यादा येत आहेत तेव्हा जाणकारांच्याकडून मदतीची अपेक्षा. तर घडले ते असे, 1.गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, माझ्या वडिलांनी विसासाठी युके विसा ऑफिसला अर्जासाठी केलेले transaction बरोबर होते (online bank transfer), आणि ते रद्द करून रिफंड मागितला. विसा ऑफिसनेही तो मान्य केला आणि रिफंड पाठवला आहे म्हणून मेल पाठवला.

पत्र

लेखक आतिवास यांनी बुधवार, 11/03/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
मीटिंग संपली. बाया लगबगीने घराकडे परतल्या. “माज्या घरी चल,” रखमामावशीने हुकूम सोडला. मला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी हवीच होती. गेले . चहा झाल्यावर ती म्हणाली, “येक पत्तुर लिवायचंय.

घनचक्कर घोरींचे घनघोर-चक्र

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 11/03/2015 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
‘सईमावशी, तू, आदिमामा, संतोषकाका आणि ती प्रतिगामी शिल्पा असे बूर्झ्वा लोक्स माझ्या डिसीजनला बिलकुल धक्का लावू शकत नाहीत !’ स्वराने त्वेषाने हातातला काटा समोरच्या प्लेटमधल्या इडलीत खुपसला आणि दुसऱ्या हातातल्या चमच्याने झटक्यासरशी तिचे दोन तुकडे केले ! इडलीच्या जागी तिला प्रतिगामी शिल्पा, तिची साक्षात जन्मदात्री दिसत असावी की काय अशी मला शंका आली. ‘अगं, आमची काय बिशाद तुला धक्का लावायची ! ..आय मीन, तुझ्या डिसीजनला..

घाटवाटांवरची सायकल राईड - (भाग १)

लेखक मोदक यांनी बुधवार, 11/03/2015 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
मार्चचा पहिला वीकांत अनेक कारणांनी सर्वांच्या निशाण्यावर होता. सलग ३ दिवस सुट्टी. त्यामुळे गाडीवरून एखादी ट्रीप करायची की एखादी मोठी सायकल राईड हा प्रश्न अनेक दिवस चर्चेमध्ये होता. कोणता रूट..? पुन्हा कोकणातच जायचे का..? पुन्हा ताम्हिणी घाटातूनच जायचे काय..? परत येताना तरी ताम्हिणी घाट नको. मांढरदेवीला जावूया.. BRM रूट करूया. मांढरदेवी BRM अनेक कारणांमुळे पूर्ण करता आली नसल्याने तो BRM चा रूट सुधाकर, केदार व राहुलला करायचा होता.

डाॅक्टरांची फी

लेखक स्वधर्म यांनी बुधवार, 11/03/2015 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो.

मि ही निळा रंग निळा,रंगांच्या बहुत कळा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 11/03/2015 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी ही निळा रंग निळा रंगांच्या जातं कुळा स्वयमेवा-रंग कधी खेळलो न मि ही खुळा स्वप्नांचा रंग नवा दिसवे तो बहु बरवा रंगुनीही जाइ त्यात दिसला तो आत्म खुळा रंगांचे देश नवे काय त्यात दिसत हवे? तो हिरवा हा पिवळा त्यातचि मी एक निळा रंगांनी काय दिले ? दालन ते बहुत खुले शिरूनी मग आत त्यात हो तू ही बहुत-बळा त्या गावी एकटाच नसतो कुणि सावळाच असला जरी कुणिही तसा तो असतो बहु विरळा रंगांची पंचमीच असते ती नित्य नवी त्यात दिवस-जोडताच असते ती बहुत हवी परी त्याच्या पाठून तू पाहि काहि दिव्य कळा धरिती कुणी एकट्यास लडबडती त्यास खास आवडते काही त्यास ?
काव्यरस

शाळा....!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी बुधवार, 11/03/2015 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी बाल्कनीमध्ये उभा होतो.सहज म्हणून समोरच्या देशपांडेंच्या घरात लक्ष्य गेल.आज त्याच्या घरात बरीच गडबड ऐकू येत होती. काय तर म्हणे छोट्या प्रथमेशचा आज शाळेचा पहिला दिवस होता. घरात त्याच्याच तयारीची लगबग चालु असताना प्रथमेश मात्र अगदी तयार होउन दारात उभा होता. त्या दोन -सव्वा दोन फ़ुटी देहाची भारी गंमत चाललेली दिसत होती.

दोन कंडक्टर्स

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 11/03/2015 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या आयुष्यात लोकल्स, बेस्टच्या बसेस, रिक्षा हा अविभाज्य घटक आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट इतका चांगला असल्यामुळेच मुंबईला दिवस रात्र काम करता येतं. कधी न झोपणारे शहर अशी बिरुदावली मिरवता येते. या सोयींच्या भरोशावरच मुंबई, ठाणे, रायगड अशा तीन जिल्ह्यांना व्यापणाऱ्या पट्ट्यात लोक घर आणि व्यवसाय निवडतात, रोज ये जा करतात. या सगळ्या सेवा पुरवणार्यांमध्ये सर्वात कठीण परिस्थिती असते ती बेस्टच्या कर्मचाऱ्यांची. कारण ट्राफिक जामचा सामना त्यांनाच रोज करावा लागतो. रिक्षावाल्यांना जसं हवं तेव्हा, हवं तेवढंच काम करण्याचं स्वातंत्र्य असतं, तसं त्यांना मिळत नाही.