Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] थोडक्यात वाचलो!

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 07/08/2015 05:04 या दिवशी प्रकाशित केले.
'परत तेच! मुद्दाम करतेय का?' पुढच्याच टेबलवर पाठमोरं बसलेल्या तिने तीनदा वळून त्याच्याकडे, आणि नजरभेट होताच मागे विमानतळाकडे पाहिलं होतं, मग मान वळवून घेतली होती. तिशीच्या आसपासचा आकर्षक चेहेरा आणि बांधा. डोळ्यांत धास्ती होती का? 'विचारावं का मदत हवीय का म्हणून? नकोच, खरंच कुणाची वाट पहात असेल.’ पुन्हा लॅपटॉपकडे वळला. तेवढ्यात पुन्हा ती वळलेली जाणवली, पुन्हा त्याला अडखळून नजर पलिकडे मागे! आता मात्र लॅपटॉप बंद करून तो उठला.

सत्यकथा .. अध्याय - ३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 07/08/2015 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- सत्यकथा .. अध्याय १ आणि २ सूत म्हणतात, "या शतानंदाने आधी धर्मावर रुसून चिडून एक टप्पा पार केला...हे ही एक प्रकारचे सत्यच होते. पण त्याची दुसरी बाजू न पाहिली गेल्यामुळे ते सत्य लंगडे आणि अनुपयुक्त होते. जेंव्हा शतानंदाला या सत्याचा दुसरा स्वतःमधला भाग दिसला तेंव्हा ते परिपूर्ण झाले..आणि त्याच्या कामीहि आले.

[शतशब्दकथा स्पर्धा] जात

लेखक म्हया बिलंदर यांनी गुरुवार, 06/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारी साहेब हातात कागदपत्रांचा गठ्ठा सावरंत, जुनाट शाळेच्या अंधाऱ्या वर्गात शिरतात. छोटा साहेब तीथे बसलेल्या आठ दहा जनांना उद्देशुन बोलु लागतो "सरकारने नियम काढलाय की सगळ्यांना आपली जात म्हाईत पैजे आणि सगळ्यांना जातीचे दाखले भेटले पैजेत. म्हणुन सगळ्यांनी, साहेब विचारतील ती म्हाईती नीट द्या…" त्याला मधेच थांबवत मोठ्या साहेबाने समोर बसलेल्या एकाला ईशाऱ्यानेच बोलावलं आणी पान खात विचारलं "नाम?" "रामा" "बापाचा नाम?" "तुरबा" कागदावर काहीतरी लिहुन साहेब तो कागद रामा कडे देत सांगतो "सोमवारको तलाठी कडे जाउन हेचावर जात लिहुन घे आणी मंगलको तालुका हापीसला जा." रामा थोडावेळ तिथेच उभा "समजला नाही का?

आमची 'कर्म'फळे

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी गुरुवार, 06/08/2015 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
नुक्ताचं बुवांना भेटलो. त्याचा आफ्टरइफेक्ट =)) आमचा पेर्णास्त्रोत:माझी मुक्ताफळे मुळ कवितेचा आशय खरचं खुप सुंदर आहे. पण हाताची खाज अगदीच नं आवरली गेल्याने धागाकर्त्याची माफी मागुन.
काव्यरस

[शतशब्दकथा स्पर्धा] सोलमेट

लेखक नीलमोहर यांनी गुरुवार, 06/08/2015 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
लेक्चरला निघालेल्या अर्णवला थांबवून नेहाने विचारले, "आज संध्याकाळी पिक्चरला जाऊयात ? " "सॉरी आज मी देव सरांकडे नोट्स घेण्यासाठी जाणार आहे, चल बाय." हिरमुसल्या नेहाकडे न बघता तो पुढे निघाला. अतिशय हुशार आणि देखण्या अर्णवच्या मागे अनेक मुली होत्या पण तो सगळयांपासून लांबच रहायचा. मात्र गेल्या काही दिवसांपासून काहीतरी अनपेक्षितसं त्याच्यासोबत घडत होतं.. तुकडया- तुकडयांतील त्याचं आयुष्य, एका व्यक्तीने एखाद्या जिग्सॉ पझल प्रमाणे एकसंध जोडून त्याला परिपूर्ण केलं होतं. अर्णव प्रेमात पडला होता. पहिल्यांदाच.

माझी मुक्ताफळे

लेखक chetanlakhs यांनी गुरुवार, 06/08/2015 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
"यह प्यार किस चिड़िया का नाम है किस पेड़ पर रहती है आजकल जाने क्यों लोग हमारे अल्फाजों को प्यार समझ रहे है आजकल" "बेवफा न आप थे ना हम, बस वक्त का तकाजा था" "शब्द सरळच असतात..आपण त्यात अर्थ शोधतो" "दर्द हमेशा शायर के दिल का ही होता है" "दिल धड़क रहा है सांस फूल रही है दिल बीमार है उनका क्योंकि उसमे रूह नहीं है" "बड़ी शिद्दत से उन्हें मनाया था रूबरू हुए तो धड़कनो ने काम तमाम कर दिया उसकी दर पर आज फरियाद लेकर गए उसने दिल की धड़कनो की दुहाई दी" "अब मौत से खेल शुरू हुआ और जिंदगी लुटती चली गयी उनकी बंद आंखे देखकर नींद उड़ गयी प्यारी मुस्कान देखकर उनके दिल का हाल समझ आया" "नींद ने आज गुस्ताख़ी की है आ

विंडोज १०: एक धावता आढावा

लेखक कंजूस यांनी गुरुवार, 06/08/2015 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
विंडोज १०: एक धावता आढावा माइक्रोसोफ्ट कंपनीच्या या नव्या ओपरेटिंग प्रणालीची घडणीची सुरुवात मागच्या वर्षीच झाली होती आणि जानेवारी २०१५ नंतर ती काही लोकांना वापरण्यास देण्यात आली. आता २८/२९ जुलैला ती अधिकृतरित्या सर्वांसाठी प्रकाशित करण्यात आली.

[शतशब्दकथा स्पर्धा] देऊळ

लेखक लॉर्ड फॉकलन्ड यांनी गुरुवार, 06/08/2015 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
क्लबहाऊसमध्ये सोसायटीच्या आवारात कोणते देऊळ उभारायचे यासाठी सदस्यांची मीटिंग सुरू होती. "मारूतीचे देऊळ बांधूया" बिराजदार म्हणाले. "नको. मारूतीमंदीर म्हणजे खेड्यात असल्यासारखं वाटतं" जोशी म्हणाले. "दत्तमंदीरच पाहिजे" पराडकरांची सूचना. "दत्त, विठोबा असल्या देवांची देवळे म्हणजे एखाद्या जुन्या पेठेत राहिल्यासारखं वाटेल" इति गोखले. "रामाचे देऊळ बांधू." संघात जाणार्‍या देशपांंड्यांनी प्रस्ताव मांडला. "अजिबात नको. रामाच्या देवळामुळे देशात प्रॉब्लेम झालेत." त्वेषाने लिमये उद्गारले. "महालक्ष्मीचे देऊळ सगळ्यांना आवडेल" ही सौ. भोसल्यांची सूचना लगेच फेटाळली गेली.

घरांचे ढिगारे...

लेखक सुहास झेले यांनी गुरुवार, 06/08/2015 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
एक अभूतपूर्व स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई. दररोज आपल्या कामासाठी ह्या स्वप्ननगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाखो मुंबईकर घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. भले मग तो कुठल्या मोठ्या हायफाय एमएनसीमध्ये काम करणारा असो, किंवा साधे वेठबिगारी करून पोट भरणारा असो कोणी थांबत नाही. सगळे सतत धावत असतात.. कधी एकत्र ...कधी एकटे, तुम्ही थांबलात की संपलात.. बस्स !! प्रत्येकाची गरज वेगळी, आकांक्षा वेगळ्या, पण त्यात एक समान धागा म्हणजे "मुंबईत स्वतःचे हक्काचे घर"
मुंबईत तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही, पण तुम्हाला हक्काचे छप्पर सहजासहजी मिळेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही...

आत्मरंजन (मुढकथा)

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 06/08/2015 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
मला रोज हायवेच्या फाट्यापर्यंत चालत चक्कर टाकल्याशिवाय चैन पडतंच नाही आजकाल. थंडीचे दिवस, पाहुणेराउळे मंजुळेच्या लग्नानिमित्त वस्तीवर संध्याकाळी जमू लागले आहेत. आगत-स्वागतानंतर जेवण वगैरे आटोपून बायका मुलं दमल्यामुळे लवकरच झोपले. लांबचे नवीन पाहुणे अजून येतच आहेत. एकमेकांशी ओळखी-पाळखी करताकरता, त्यांना संध्याकाळचे बाहेर कधी चांगलेच अंधारून आलेलं कळलंच नाही. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे मीही संध्याकाळी निघालो. वस्तीकडे येतानाचा जो रस्ता होता, त्या रस्त्यानंच नेहमी जात असल्यानं मला तो रस्ता माहीत होता. विशेष म्हणजे त्या रस्त्यावर वाहनांची जास्त वर्दळही नव्हती.