Skip to main content

वैराग्याकडे पाउले

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 16/09/2015 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
छंद लावला, जोपासला जोपासला वेल, बाग लावला, फुलवला, वाढवला पक्षी आले, आनंदले, वसले, वाढले सर्वां जसे नंदनवनच मिळाले पण आता … नद्या, तळी, निर्झर आटले, टिपूसभर पाणी मिळेनासे झाले आज जरी पक्षांना उडवून घालवले, अखेरचे बागेत पाणी शिंपले, तरी डोळा टिपूस न आले, हीच का वैराग्याकडे पाउले?
काव्यरस

कुमाऊं - पूर्वतयारी

लेखक के.के. यांनी मंगळवार, 15/09/2015 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्का मित्रहो, मिपावर (किंवा कुठेही) लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.

विक्री गीत

लेखक भिंगरी यांनी मंगळवार, 15/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
अंताक्षरी झाली खेळून. आता नविन काहीतरी करूया. बर्‍याच चित्रपटात एखाद्या वस्तुची विक्री गाणे म्हणत केली जाते.चला तर मग अशी गाणी शोधुया सुरुवात नारळाने करू...... लेलो रे लेलो बाबू पीलो नारीयल पानी इस गर्मी आ अपनी प्यास बुझालो लेलो रे लेलो बाबू पीलो नारीयल पानी
काव्यरस

दुःख

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 15/09/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
'देवा मी काही चुकलो असेल तर मला माफ कर,' असे राजू परमेश्वरा कडे रोज प्रार्थना करीत पण परमेश्वर काही त्याला  पावत नव्हता. आज त्याचे शिक्षण पुर्ण झाले असले तरी तो स्वतःच्या पायावर उभा नव्हता , राजू  लहान असतानाच त्याचे वडील मरण पावले ,मग त्याची आई बाहेर घरची कामे करून त्याला व दिपा ला लहानाचे मोठे केले व शाळा शिकवले. पण आता त्याची आई थकलेले होती , घर चालण्यास पुरेसे पैसे मिळत नव्हते , लवकरच दिपा च लग्न करायचे होते, आशा अनेक समस्यांशी तो लढत होता.पण त्याला जाॅब मिळत नव्हता , तो या अपयशाने  खचून जात होता, शेवटी तो परमेश्वरा ला दोष देत.

सफर आडवळणावरील खेड्यांची....!

लेखक मेघनाद यांनी मंगळवार, 15/09/2015 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
हि सफर विदेशाची नाही तर कोंकणातील खेड्यांची आहे, तेही फार प्रसिद्ध नसलेल्या खेड्यांची. हल्लीच जूलै महिन्यात कोकणात जाऊन आलो. तिकडच्या नातेवाईकांची भेट घ्यावी आणि कोकणातला पावसाळी ऋतू मनमुराद अनुभवावा एवढाच मानस होता. माझ्या ह्या खेपेला मी ३ गावी जाऊन आलो, टी पुढीलप्रमाणे - १.कोंड्ये, २.मीठगवाणे, गगनगड आणि गिर्ये. गुगल नकाश्यांचे दुवे: १. कोंड्ये २.

भाग २ गावातील गुढ(भयकथा)

लेखक दिनु गवळी यांनी मंगळवार, 15/09/2015 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
रवीचे लक्ष झाडावर गेले. पण रवीला तिथे काहीही दिसले नाही.तो पर्यंत ती असुरी शक्ती झाडाच्या पालवीत गुडूप(लपली) झाली होती. ******************"*********************************************** अचानक समोरच्या बोळातुन कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. रवी पळत पळत त्या बोळात आला पण तो येईपर्यंत तिथे त्या कुत्र्याचे मेलेल शरीरच त्याला दिसले.त्या कुत्र्याने काहीतरी भयानक पाहीले होते.हे मात्र नक्की... ! रवीने आजुबाजूला खुप शोध घेतला पण त्याला काहीच मिळालं नाही. ********** ********************************* १ वाजला होता . अजुनही रवी गावात इकडे तिकडे भटकत होता.

अन्नदाता सुखी भव भाग ३ - Waste not, want not !

लेखक शेखरमोघे यांनी मंगळवार, 15/09/2015 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन मी जर म्हटलं "मला काल पडलेल्या स्वप्नांत एक कोणी महापुरुष "मेरे प्यारे भाईयो और बहेनो" असे म्हणत म्हणत त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या खिशात रु. ५०० सारतो आहे" तर ऐकणारे जे काय बोलतील त्यांत "भांग, धत्तुरा/धोत्रा, ठाण्याहून पळालेला दिसतो आहे, मते मिळवायला कै पण करतात" असे (वेचक) शब्द पेरलेले असतील!

गावातील भय(गुढकथा)

लेखक दिनु गवळी यांनी सोमवार, 14/09/2015 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
गावात सगळीकडे निरव शांतता होती. रात्रीचे ११ वाजले होते. मागच्या दोन दिवसांपुर्वी गावात खुपच भयानक घटना घडली होती, गावातला नाना पिठे नावाचा पाटील गळफास घेऊन मेला होता.गावातले लोकं त्याला नफुंसक म्हणत म्हणुन वैतागुन त्याने आत्महत्या केली .पण आता गावात मात्र चित्रविचीत्र गोष्टी घडु लागल्या पहिल्याच रात्री गावातील वडाखाली सुन्याने पाटलाला बघितले तेव्हापासुन त्याची तब्येत बिघडली .तर दुसर्या रात्री गावात वेगवेगळे आवाज ऐकु येऊ लागले .. कुत्री तर खुपच भुंकायची मांजराचा सगळीकडे सुळसुळाट होतो.आज ही तिसरी रात्र होती, ११ वाजुन गेले होते ...

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

उऊऊऊऊउंच माझा झोका

लेखक सुधीर कांदळकर यांनी सोमवार, 14/09/2015 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या रविवारी एका चित्रवाणी कार्यक्रमात उंच माझा झोका हा कार्यक्रम चालू होता तेव्हा एक बातमी अचानक आठवली. ‘पीटर ड्रकर चॅलेन्ज’ नावाची एक दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर भरणारी निबंधस्पर्धा २०१५ या वर्षासाठी नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत दरवर्षी जागतिक स्तरावरून निबंध सादर केले जातात. या वर्षी ही स्पर्धा मुंबईच्या कु. नमिता नारकर या मराठी मुलीने प्रथम क्रमांक मिळवून जिंकलेली आहे. स्पर्धेचा विषय होता ‘ह्यूमन डिफरन्सेस’.