Skip to main content

स्क्रिन शॉट भाग - ३

लेखक राजू यांनी शुक्रवार, 25/09/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत .... १) त्याचे अकाउंट कोणीतरी हॅक केले होते.२)कोणालातरी त्याचा पासवर्ड माहीत झाला आणि त्याने हे केले आहे.३)कसलातरी वायरस आहे ज्याने असे मेसेज फॉरवर्ड झाले.४) किंवा असे काहितरी घडले आहे जे सध्या तरी आपल्या आकलना पलीकडे आहे.

अजून एक कॉफी...

लेखक हैयो हैयैयो यांनी शुक्रवार, 25/09/2015 20:15 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या पावसाळ्यात एक सकाळ... रिमझिमत होते. हातांत छत्री घेवून निघालों.

एरवी गांवांत सकाळला दूधवाला अन् पेपरवाला सोडले तर इतर कुणाचीच विशेष लगबग नसेल. दुकानेही अजून बंद. अजून कुठे आठच तर वाजत होते. रस्त्यांत अजून कुठे घोळका-गलबला नाही. गांव नेहमीच असे आळसावले असे. पुढे दिवसभरांत इतर अनेक कामे होती, तेमुळे ह्या भेटीकरिता सकाळच उत्तम म्हणत वेळ निवडलो होतो.

छोटे साहेब एका बसस्टॉपवर बैसले होते. मला बघतांच हात करत लक्ष वेधले. ‘हाय्’ म्हणून हस्तांदोलन केले. बोलतांना खांद्यावर हात ठेवले चक्क. (असो..!)

फेस बुक बरची भुताटकी..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 25/09/2015 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
फेस बुक बरची भुताटकी.. माधव चे फेसबुक वर अकाऊट होते... त्याला फेस बुका वरली माधवीची प्रोफाईल आवडली. दोघांची मैत्री झाली च्याटिंग सुरु झाले भेटी गाठी वाढल्या.. पण बेक अप झाले,,माधवीस हा धक्का सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली. माधवला पण याचे खुप वाईट वाटले पुढच्या च्या आमावस्येच्या दिवशी माधव फेस बुकावर गेला अन अचानक च्याट विंडो उघड्ली व अक्षरे आली ..."हाय".. माधवी च्याट करीत होती....पिंग पिंग पिगु लागली ... माधव घाबरला.

बाप्पाचा नैवेद्य : कणकेचा शिरा

लेखक मितान यांनी शुक्रवार, 25/09/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
कणकेचा शिरा साहित्य : कणीक १ वाटी तूप अर्धी वाटी गूळ पाऊण वाटी वेलचीपूड, जायफळपूड, सुकामेवा अावडीनुसार. कृती : चमचाभर तूप शिल्लक ठेवून बाकीचे कढईत गरम करावे. त्यात कणीक गुलाबी लाल होईपर्यंत भाजावी. लाडू करताना बेसन भाजतो तसे तुप्पट दिसले पाहिजे ;) एकीकडे पाणी उकळावे. आता आच कमी करून उकळते पाणी हळूहळू कणकेत घालावे. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कणकेचा छान गोळा व्हायला लागला की त्यात किसलेला गूळ घालावा. लगेचच वेलची जायफळ सुकामेवा घालून नीट मिसळावे. वरून चमचाभर तूप कडेने घालावे.

श्रीगणेश लेखमाला ८ : सोर्सिंग व प्रॉक्युरमेंट (खरेदी विभाग)

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 25/09/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
उत्पादन अभियांत्रिकीची पदवी घेऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडलो. शून्य अनुभव पण शिकण्याची व कष्टाची तयारी या जोरावर नक्कीच काहीतरी मिळवू हा विश्वास ठेवत इंटरव्ह्यू देत होतो. अखेर एके ठिकाणी हातात ऑफर लेटर पडले. पोस्ट - ग्रॅज्युएट ट्रेनी इंजीनिअर (मटेरिअल्स). लगोलग रुजू झालो. ट्रेनिंगच्या पहिल्या दहा दिवसात एकेका विभागाची ओळख करून देण्यात आली. कंपनी काय वस्तू पुरवते, कुणाला पुरवते इ. इ. बाबींची व्यवस्थित ओळख करून घेतली. उत्पादन विभागात असेंब्ली कशी होते, काय काय गोष्टी लागतात हे नीट समजून घेतले. कोणत्याही आस्थापनेस एखाद्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते.

एक गोष्ट........

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 24/09/2015 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक गोष्ट तुझी एक गोष्ट माझी आहे एक गोष्ट तुझ्यामाझ्या गोष्टीची एक प्रीत तुझी एक प्रीत माझी जुळली एक प्रीत तुझ्यामाझ्या मनीची एक आभाळ तुझे एक आभाळ माझे भेटले एक आभाळ तुझ्यामाझ्या प्रेमाचे एक रात्र तुझी एक रात्र माझी सजली एक रात्र तुझ्यामाझ्या स्वप्नांची एक चंद्र तुझा एक चंद्र माझा साक्षी एक चंद्र तुझ्यामाझ्या मीलनाचा एक साथ तुझी एक साथ माझी सुटली एक साथ तुझ्यामाझ्या सोबतीची एक कारण तुझे एक कारण माझे छोटेसे एक कारण तुझ्यामाझ्या दुराव्याचे एक हट्ट तुझा एक हट्ट माझा जिंकला एक हट्ट तुझ्यामाझ्या अबोल्याचा एक सांज तुझी एक सांज माझी उगवली एक सांज तुझ्यामाझ्या निरोपाची एक वाट तुझी एक वाट म