अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला...
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.. असं गर्वगीत म्हणत म्हणत कोलंबसाने अमेरिका शोधली आणि तिथून युरोपात परत येताना आपल्या पोतडीत अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आणि वस्तू भरून घेऊन आला. फर्डिनांड महाराज आणि इझाबेला राणीसाहेबांना त्याने आपला हा जादूई नजराणा पेश केला. त्यातल्या साधारण बदामासारख्या दिसणार्या गर्द तपकिरी बियांकडे कोणाचं फारसं लक्षही गेलं नाही. आपल्या चौथ्या अमेरिका वारीत कोलंबसाला असं आढळलं की ह्या बियांचा चलन म्हणून वापर होतो आहे. त्याचं कुतुहल चाळवलं गेलं आणि तेथील लोक ह्या बियांपासून पेय बनवतात असं त्याच्या लक्षात आलं.
मिसळपाव
नमस्कार मंडळी!! झाले का जेवण? टाकलीत का सुपारी तोंडात?
मस्त सणावाराचे दिवस आहेत. काही ना काही निमित्ताने रोज गोडधोड खाल्ले जातंय. मग ते पचायला सुगंधी चविष्ट पान वा सुपारी हवीच की!
सुरेख पदार्थांनी भरलेल ताट त्याचा आस्वाद घेत घेत केलेले तुडुंब जेवण त्यावर तोंडात टाकायला तांबूल किंवा छानशी सुपारी, सूखच!
असे कितीहि छान जेवणानंतर पोट भरले तरी आठवण येते ती मुखवासाची. मुखवास म्हणजे जेवणानंतर पचनासाठी खाल्ली जाणारी सुपारी, तांबूल.
* छायाचित्र आंतरजालावरून साभार
आपल्याला जेव्हा पटकन होणारं आणि हलकं काहीतरी जेवणात हवं असतं तेव्हा "पटकन पिठलं भात किंवा कढी भात करूया" असं बहुतेकवेळा म्हटलं जातं. पिठल्याचे बरेच प्रकार असतात तसेच कढीचेही बरेच प्रकार आम्ही करतो. सार हा कढीचा सख्खा भाऊ म्हटलं तरी चालेल. कढीमधे उकळलेली आणि थंड कढी/सार असे दोन प्रकार असतात.
* छायाचित्र आंतरजालावरुन साभार
मग चला तर आज भेंडी पुराण मध्ये काही नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळे प्रकार बघुयात.
१.