गो बाय
(माझ्या ४ वर्षाच्या मुलीला लिहीलेल एक पत्र जे ती आणिक थोडी मोठी झाली की वाचेल आणिक मला येऊन घट्ट बिलगेल नेहेमी सारखी )
गो बाय तुला येऊन चार वर्ष झाली. तू आलीस म्हणून जगण्याला एक कारण मिळाल अगदी एकूलत एक. आई बापाच्या अकाली जाण्याने मोडून गेलेल्या एका माणसाला उमेद मिळाली.
गो बाय तूला आठवतय का. पोटात असताना तू गर्भ सन्स्काराची सी डी ऐकायचीस अगदी शान्तपणे. कधी कधी खूप मस्ती करायचीस आईला लाथा मारायचीस मग मी कसलस स्तोत्र म्हटल की शान्त व्हायचीस अगदी शहाण्या बाळा सारखी. मग ०५/०३/१२ ला तू आलीस अगदी तुझ्या मावशी आजीच्या तारखेला तू आलीस. लोक म्हणाले बहीणीच्या तारखेला तिची आजीच परत आली.
मिसळपाव
