Skip to main content

मुंबई ग्राहक पंचायत - अल्प परिचय

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 02/05/2016 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
गुढी पाडवा हा पंचांगातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ! याच दिवशी १९७५ साली काही द्रष्ट्या विचारवंतानी एकत्र येऊन अन्नधान्यांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई ग्राहकांवर बाजारपेठेत होणारे अन्याय यातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणून ग्राहकांना संघटित करण्याचा निश्चय केला. त्यासाठी ग्राहक कुटुंबांचे संघ बनवून त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे रास्त दरात मासिक वाटप करणे हे उत्तम साधन होऊ शकेल असा विचार करून त्याची अंमलबजावणी दादरच्या वनिता समाजात श्रीफळाच्या वाटपाने त्यांनी या मुहूर्तावर केली. या मान्यवरांमध्ये सर्वश्री.

पोश्टरबॉइज -२

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 02/05/2016 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
जेवणंखाणं उरकून २ तास झाले. प्रेस बंद करायची वेळ आली तरी नेत्यांचा पत्ता नाही. कार्यकर्त्यांचे फोनवर फोन चालू होते. कंटाळून आता उरलेल्या कामाला उद्या या असे सांगून पीसी बंद केला आणि निघालो. दरवाजातच स्कॉर्पिओला अडलो. पांढर्‍या लिननच्या ताग्यात गुंडाळलेले आणि सोन्याने मढलेले एक वजनदार प्रकरण बॅकसीटवरुन उतरत होते. पांढर्‍याच लेदरच्या चपला आणि हातातले राडो. जडावलेले डोळे आणी इंग्लिश प्लस सेंटचा उग्र वास. गप्प गाडी परत लावली आणि येऊन पीसी चालू केला. झालेल्या कामाचा आढावा सरलोकांनी नेहमीच्या सफाइने दिला. "हे बग, नाळ मुंजाळे येयाचं जल्दी. नाईटला पोस्टर पायजे.

बेधुंद ( भाग ८ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी रविवार, 01/05/2016 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षाला काही सुचत नव्हतं ! दिवसभर फक्त शिवेका अन अमित चा विचार मनाला चटका लावत होते . एके रात्री नित्या च्या मोबाईल वर अमित चा फोन आला . अजूनही त्याने नित्याला काहीही सांगितलं नव्हतं . नित्या अक्षा च्या रूम वर आला . 'अक्षा , तुझ्यासाठी फोन आला होता रे, त्याला मी ५ मिनिटाने फोन करायला सांगितला आहे , राहू दे मोबाईल तुझ्याकडे' - नित्या मोबाईल अक्षाच्या बेड वर ठेवत बोलला . कुणाचा फोन ? अक्षाने विचारले . ' मला नाही माहित , नाव नाही सांगितले त्याने ' 'बर ' सगळ होस्टेल अक्षाला उदास वाटत होतं . काहीतरी कुठेतरी चुकल्यासारखं ! काय कराव काही कळत नव्हत ! कुठे जात आहे मी ?

कहे कबीरा (४) - निर्भय निर्गुन गुन रे गाऊँगा

लेखक मनमेघ यांनी रविवार, 01/05/2016 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
निर्भय निर्गुण गुण रे गाऊँगा । काव्य म्हणून पाहता पहिल्याच ओळीत 'निर्गुणाचे गुण गाणे' असा वरवर विरुद्ध वाटेल असा शब्दप्रयोग आहे. निर्गुण! ज्याला काहीच गुण नाहीत असा एक अर्थ आणि जे सत्व,रज, तम या गुणांच्या पलिकडचे आहे असे असा दुसरा अर्थ. दोन्ही अर्थ त्या निर्गुणाच्या बाबत योग्यच आहेत, पण मला दुसरा अर्थ जास्त चपखल वाटतो. गुण गाणे ही क्रियाही त्रिगुणांच्या प्रभावातली.हे म्हणजे 'तितिर्षुर्दुस्तरं मोहात् उडुपेनास्मि सागरम्' म्हणजे दुस्तर असा समुद्र छोट्या होडीने पार करण्याची इच्छा बाळगण्यासारखे आहे. पण हे काम मी 'निर्भय' होऊन करीन. भय ही एकूणच सर्वार्थाने मनुष्याला खाली खेचणारी भावना आहे.

HOW ARE YOU?

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 01/05/2016 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
हाय, कशी आहेस? नेहमीसारखी झोपाळू? तुझ्या जडावलेल्या पापण्यांतून ठिबकणारी लाल रक्तबुंदी यू नो व्हाट आय मीन जस्ट अ डोस फॉर यू.... सेकंड फ्लोअर आउटसाइड द बाथरुम हिअर आय एम वेटींग फॉर यू.... यू जस्ट कम धीस वे अलॉन्ग विथ योर स्कर्ट अँड शॅम्पेन हिअर आय टेकन अ नीडल फुल ऑफ कोकेन टू ब्रेकअप विथ यू वन्स अगेन.... हाउ आय फरगेट अॅज यू आर माय बेब यू मस्ट कम विथ हेवी ब्रिदींग अँड स्टेयर टू मी टिल इरेक्ट माय फिलींग्ज.... बट आय नो यू यू नेव्हर कम यू नेव्हर शेअर दॅट ब्लडी स्टफ विथ मी वन्स अगेन.... माय नाइटस आर बर्निंग द गन इनसाइड माय कपबर्ड वेटींग टू शूट द बबल्स आउटसाइड विंडो यू मस्ट कॅच देम नेकेड वन्स

ब्लॉग लिखाणाला चार वर्ष पूर्ण

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/05/2016 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बरोबर चार वर्षांपूर्वी दिनांक 29 एप्रिल 2012 पासून मी दर शनिवारी साप्ताहीक ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. 27 एप्रिल 2014 पर्यंत दोन वर्ष एकही शनिवार ब्लॉगशिवाय टळला नाही. म्हणजेच एकाही आठवड्याचा खंड पडू न देता आणि शनिवार सायंकाळ ही वेळही न टाळता नियमितपणे ब्लॉग लिहीत होतो. मात्र प्रत्येक आठ दिवसांनी ब्लॉग लेखनाने माझ्या अन्य लिखाणावर प्र‍तिकूल परिणाम होतो असे लक्षात आल्याने दोन वर्षापासून- एप्रिल 2014 पासून प्रत्येक महिण्याच्या 1 आणि 15 तारखेला ब्लॉग लिहीत असतो. प्रत्येक पंधरा दिवसाला एक ब्लॉग. या चार वर्षात एकही खंड जाऊ दिला नाही.

दस दस की मॅच - कथा ( काल्पनीक )

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 01/05/2016 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
दस दस की मॅच - कथा ( काल्पनीक ) शाळेसमोरच्या रस्त्यावर अलिकडेच एक नवीन दुकान सुरु झाले होते . या दुकानामध्ये अनेक प्रसिद्ध सिनेमा/टिव्ही कलाकार , खेळाडु यांचे छोटे मोठे फोटो विकायला ठेवलेले असत . मोकळ्या वेळेमध्ये आपल्या आवडत्या कलाकारांचे , खेळाडुंचे फोटो विकत घ्यायला मुलांची भरपुर गर्दी होत असे . शाळेतील शिक्षकमंडळी या गर्दीकडे नाराजीने बघत जात असत . शाळेतील हुशार मुले या गर्दीकडे बघुन नाक फेंदारत असत , तर हुशार मुली या गर्दीकडे बघुन न बघितल्याचा आव आणत . आज शाळेतील मधली सुट्टी संपत आली होती . मन्या आपल्या मित्रांबरोबर शाळेच्या गेटपाशी उभा राहुन गप्पा टाकत होता .

एक संघ मैदानातला - भाग ३

लेखक शि बि आय यांनी रविवार, 01/05/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ग्राउंडवर गेल्यावर समजले की दीप्तीचा खांदा बसवला आहे आणि ४ दिवस विश्रांती नंतर ती प्रँक्टिस करू शकेल. ऐकून बर वाटलं..... पण आमच्या मिशाळ गब्बरला ते पटलं नाही. आम्हीच तिला मोडलंय अस समजून आप्पांनी जे काही लेक्चर द्यायला सुरुवात केली. अखंड पाऊण तास बोलून झाल्यावर बहुतेक ते दमले... शेवटी आम्ही मांडवली करत स्किल प्रँक्टिस घ्या असं सांगितल्यावर ते गप्प बसले. नियमांच्या यादीत अजून एका नियमाचा समावेश झाला. व्यायाम करताना, स्किल प्रँक्टिस करताना कामाशिवाय बोलायचं नाही.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१७: रस्ता: निकाल

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 01/05/2016 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपणा सर्वांना ६७व्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! छायाचित्रणकला स्पर्धेच्या १७व्या भागाला मतदानाद्वारे दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. स्पर्धेचा निकाल जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.