Skip to main content

..वॉन्टेड..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 04/05/2016 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
उगा हासरा तुझा चेहरा! भरपूर झाला इथे आसरा उजेडात आला जुना कोपरा पायात रडला पुन्हा उंबरा उत्क्रांत झाला किती वानरा !! झालास तू ही बैल वासरा !! वॉन्टेड आहे तू ही ईश्वरा! पत्ता तुझा दे एक अंबरा! दिसलाच अंती मूळ चेहरा! झाकुन घे तू डाग पांढरा तोडुन गेली गाय आसरा दुष्काळ आहे परत पाखरा फिरतोच आहे अजुन भोवरा उघडाच आहे सोड पिंजरा! अंधार गेला नीघ भास्करा! बोलुनि गेली काय मंथरा? वनवास आहे थांब उत्तरा! जवळुन गेला हाय मोगरा गाऊन जा तू फक्त अंतरा! मुलगाच आहे मार शंकरा! मृत्यु असावा खास सोयरा! - कानडाऊ योगेशु

महाभारत कथा ३ -धर्मयुद्ध

लेखक DEADPOOL यांनी बुधवार, 04/05/2016 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
"केशवा अन्याय झालाय माझ्यावर!" "आणि तु केलास तो न्याय होता दुर्योधना? भर सभेत तु मांडी उघडून दाखवलीस तो न्याय होता?" दुर्योधन विषण्णपणे हसला! "माझी अंधपुत्र म्हणून हेटाळणी झाली तो न्याय होता? प्रत्येक वेळी मी भीमाच्या बरोबरीचा असतांना फक्त पितृहीन म्हणून भीष्म, विदुर आणि द्रोण यांचा प्रेमाचा झरा त्याच्यासाठीच वाहणे हा न्याय होता?" "तू आपली बाजू निवडून घेतलीस दुर्योधना!" "नाही केशवा लादली गेली ती बाजू माझ्यावर. जेव्हा आपल्याच लोकांचा आधार संपतो, तेव्हा मनुष्य कुठलाही आधार शोधतो!" "तुझा अहंकार तुला आडवा आला." "मला अंधपुत्र म्हणताना अहंकार नव्हता?

एकट्याने रात हि पेलावी कशी

लेखक पथिक यांनी बुधवार, 04/05/2016 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी भारलेला अंधार रातराणीच्या गंधाने मंतरले मन एका विदेही स्पर्शाने क्षणांची माया हि तोडावी कशी एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी लागता लागेना काळजाचा ठाव दूर दूर कुठेतरी सखयाचा गाव धुक्यातली वाट हि चालावी कशी एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी उधाणली स्वप्ने भावनांना पूर दिसेना काठ कुठे डचमळे ऊर हृदयाची नाव पार लागावी कशी एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी

आज श्री. अरूण दाते ह्यांचा वाढदिवस....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 04/05/2016 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवसानिमित्ताने त्यांचे अभिष्ट-चिंतन. मला आवडलेली त्यांची गाणी.... १. ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे. https://www.youtube.com/watch?v=ky0osqfJPDE २. भेट तुझी माझी स्मरते https://www.youtube.com/watch?v=9NE4elqxG3Q ३. दिवस तुझे हे फुलायचे https://www.youtube.com/watch?v=T4t-Gc4YoBI ४.

पाचोळा -१

लेखक स्पा यांनी मंगळवार, 03/05/2016 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
देशमुखांसोबतची ती मुलाखत जरा विचित्रच झाली.आज मुलाखत आणी दुसर्या दिवशी पहाटे लगेच निघायचं इकडचे सगळे सोडून म्हणजे जरा विचित्रच, परत दोन वर्षाचा करार म्हणजे तोवर नोकरी सोडता येणार नाही.विचार करायलाही वेळ मिळाला नाही.देशमुखांनी हातात टिकिटाचे पॆसे टेकवले सुद्धा,माझा होकार समजून.

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - 4

लेखक मेघना मन्दार यांनी मंगळवार, 03/05/2016 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाग चौथा आज लंडन मधील तिसरा दिवस . आज सकाळी पुन्हा एकदा Hyde पार्क मध्ये गेले. आज परत त्या तलावाच्या इथेच गेले होते. तिथे आजूबाजूला फिरून मग तासाभरात परत घरी आले कारण आज मी संग्रहालये बघायला जाणार होते. Science Museum आणि Natural History Museum. इथे जाण्यासाठी आपल्याला South Kensington या स्टेशन वरून बाहेर पडल्यावर थोडं चालत जावं लागतं. Science Museum, Natural History Museum, Victoria & Albert Museum हि सगळी संग्रहालये जवळपास आहेत पण इतकी मोठी आहेत की एका दिवसात बघून होणं कठीण आहे.

येल्ला आणि तीच्या दासी

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 03/05/2016 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
असंख्य देव देवींच्या गजबजाटात आणखी एक नाव म्हणजे येल्लम्माचे, मुख्यत्वे दक्षिण भारतात प्रस्थ असलेली महाराष्ट्राच्या सीमेपार बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती येथे मुख्य ठाणे असलेली देवता. दक्षिणेतील मरीआई प्रमाणेच आजारातून बरे करणे, मुलगा होणे अशा प्रकारच्या काम्यव्रतांना पावणारी देवता म्हणून ह्या देवतेचे दक्षिणेत प्रस्थ मोठे आहे. वर्षाचे उत्पन्न ११ कोटी म्हणजे बर्‍यापैकी असावे.

अडगळ

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 03/05/2016 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
'मोहरा' पिच्चर आणला तवाची गोष्ट. मोकळं मैदान गाठून, शंकराच्या दगडी देवळाच्या बाजूला टेबल मांडून, त्यावर टिवी ठेऊन पिच्चर दाखवायची व्यवस्था केली ती दाद्यानं. हा दाद्या उधळ्या माणूस. एक म्हणता तीन तीन पिच्चर आणणारा. गणपतीची वर्गणी पुरली नाय तर स्वताचे शे-पाचशे घालून हौसमौज करणारा. तर त्या दिवशी त्यानं ग्यांगला सरप्राइज म्हणून एक दोन बीपी ची पण कॅसेटं आणलेली. रात्री ऐश करायची म्हणून गावठी दारुपण त्यानं तयार ठेवली होती. तर अशी सगळी व्यवस्था करुन दाद्या गुटख्याच्या पुड्या फोडत व्हीसीआर वर चित्र आणण्याची खटपट करणाऱ्या पोरांना उगाचच आयबहीनीवरनं शिव्या घालत होता.

'प्लॅटफॉर्म'

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 03/05/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
इसी 'प्लॅटफॉर्म' पे... अमीर देखें, देखे हमने गरीबभी. यहां देखी सुबह सुरजसे पेहले, यहां देखी रात चांदके साथ, यही रुकती थी जिंदगी हर तीन मिनट के बाद. यही दिखते थे लोग अंजाने, कोई घबराए, कोई मुस्कुराते, कोई मेरे जैसे, जाने अंजाने, इसी 'प्लॅटफॉर्म' पे... मस्त नाव आहे नई? मला तर जाम आवडतं, (प्लॅटफॉर्म म्हणजे... रेल्वे प्लॅटफॉर्म बद्दल बोलतोय, इतर ही प्लॅटफॉर्म असतात म्हणा पण मुंबईत राहिलेल्या माणसाला एकच प्लॅटफॉर्म माहीत असतो त्यातलाच मी एक, असो...) त्यावर सगळी मंडळी (वाट बघत) असतात!