मन झिम्माड झिम्माड
आजच्या उन्हाच्या काहिलीने अस्वस्थ होत असतानाच मागच्या वर्षी केलेल्या एका अशाच अचानक केलेल्या भ्रमंतीची आठवण आली, आंदर मावळच्या फिरस्तीची.
मागच्या पावसात तसा दोनच ठिकाणी गेलो. एक माझ्या आवडत्या नाणेघाटात. जूनमध्ये जो पाऊस तुफ्फान बरसला नेमका त्याच वेळी मी नाणेघाटात होतो. त्यानंतर जो पाऊस गेला तो गेलाच. त्यानंतर मग ऑगस्ट मध्येच बाहेर पडलो ते मावळात जाण्यासाठी.
आंदर मावळ म्हणजे मावळातल्या आंद्रा नदीच्या खोर्याचा भाग. हा भाग वेढलेला आहे तो आंद्रा, शिरोटे, वडिवळे आणि ठोकळवाडी अशा धरणांनी आणि उंच उंच डोंगररांगांनी. ४/५ महिने सोडले तर हा भाग तसा रुक्ष, दुर्गम, राकट असा.
मिसळपाव