Skip to main content

पावसामधल भंकस इंद्रधनुष्य

लेखक सुशेगाद यांनी सोमवार, 30/05/2016 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस पडत नसताना किंवा पाउस पडून गेल्यावर जेव्हा आकाशात इंद्रधनुष्य तयार होत असेल त्याच्या मधल्या कालावधीत सिटी बसने मी प्रवास करत असतो खिडकीतून बाहेर पाहत राहतो बाहेर ओली झालेली जमीन झाडांवरून ठिबकणार पाणी त्यांना आता खास पाणी घालायचं काही कारण नाही आं करून पाऊसपाणी पिल्यासारख ताज टवटवीत शहर शहराच्या कोपर्य कोपर्यात cartoonist ला श्रन्धाजली देणारी ग्राफिटी कुठल्यातरी stop वर बस चे automatic दरवाजे उघडतात ती बस मध्ये येते अप्रोन घालून माझ्या बाजूला बसते आम्ही एकमेकांना नाव न विचारता बोलायला सुरु करतो मानसाच डिसेक्शन करताना कस वाटत यावर बोलतो ती म्हणते मी इझिली फाडू शकते सगळा आतडी , फुफ्फुस आणखी

निशाण

लेखक म्हसोबा यांनी रविवार, 29/05/2016 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
तू मला हसायला शिकवलंस कधी धड रडलोही नव्हतो त्या आधी मी तू मला उभं राहायला शिकवलंस कधी धड पडलोही नव्हतो त्या आधी मी आठवांचा पूर येतो कधी या एव्हढ्याशा दोन डोळ्यात माझ्या कधी वाटते लोटली युगे आता कधी वाटतात त्याच आठवणी ताज्या तुझा हात सुटला तो क्षण कोरला आहे मनावर लेण्यातील शिलालेखासारखा त्याचीही पडझड होईल कधीतरी याच आशेवर जगतोय आता मी चातकासारखा मिटून जातील मग निशाण सारे तू तर नाहीसच आता इथे, मी ही नसेन तेव्हा काय होईल याची आता क्षिती कशाला काळ आपल्या फटकार्‍याने सारे मिटेन हे जेव्हा

ओळख

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 29/05/2016 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
ओळख तिला पिक्चर खुप आवडतात . विशेषकरुन जर प्रेमकथा असेल तर ती अगदी गुंग होउन जाते . हिरो हिरॉईनच्या सुखात हसते , त्यांच्यावर संकट आले तर तिच्या डोळ्यात पाणी येते . असे पिक्चर पार टायटलपासुन ते दि एंड पर्यंत बघायचेच असा तिचा नेम असतो . असे पिक्चर परत परत बघायलाही ती नेहमीच तयार असते . या रविवारचे प्लॅनिंग तिने आधीच मनाशी ठरवले होते . तो खास दिवस त्याच्याबरोबर पिक्चर पाहुन तिला सेलीब्रेट करायचा होता . त्यासाठी आमीरखानच्या "कयामतसे.."चे बुकिंग ती करणार होती . यामधली एकुण एक गाणी तिला पाठ होती . आमिरखान हा तिचा फेव्हरेट हिरो बनला होता . तो अगदी उलट आहे . तो पिक्चर फारसे बघत नाही .

तापोळा

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 29/05/2016 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
फुटलेल्या अंगठ्यावर तिनं चिरगुट बांधल. "ठणका मारतुय का?" "लय दुखतय" "आसूदी आता, घरी गेल्यावर हाळद लावू" "हू.." डबडबलेल्या डोळ्यांनी तो मागोमाग चालत राहिला. "आयं, सरकार लय मोटं आसतं का ग?" "हू.. लय मोटं आसतं" "मजी आपल्या रामनाना पेक्शाबी उच्ची?" "हू.. लय उच्ची आसतं, आता गप चाल" तांबूरस्त्यानं चालत गेल्यावर रुकड्यायचं बारकं देवाळ लागलं. त्याच्या जरासं म्होरं कटावर वाट बघत बसलेल्या बाया दिसल्या.

इंटरव्यू

लेखक अज्ञात यांनी रविवार, 29/05/2016 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
• कुठले आपण? / मी गुजरातचा, अहमदाबाद. मोदींच्या गावा जवळचा :) • कधी आलात दुबईत? / ४ महिने झाले साहेब. • कोणी केला वीसा? / माहीत नाही, मी डीपोझिट भरले आहे फक्त इतकच माहीत्ये. • बर बर, घरी कोण कोण असतं? / ३ मुली आहेत मला आणि बायको • बायको काम करते की घरीच असते? / तिला इथून समोरचा रस्ता क्रॉस करायचं म्हणालं तरी ठाकेल ती! • का बरं, काही प्रोब्लेम आहे का? / अपंग आहे, पाय नाहीत तिला दोन्ही… • लग्ना नंतर अपंग झाली की लहानपणी? / लहानपणी… काहीतरी औषधांचा डोस जास्त झाला औषधांचा आणि पाय गेले त्यात. • म्हणजे तुला माहीत होतं की ती अपंग आहे, तरी तू लग्न केलेस!? / अह्हो वडील म्हणतील ती पूर्वदीशा...

नटरंग ,माझे पण एक parikshan

लेखक वाल्मिक यांनी रविवार, 29/05/2016 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार तसा नटरंग खूप जुना आहे ,पण मी नुकताच बघितला मला आवर्जून खटकलेली गोष्ट ह्यात नायकाचे खरेच कलेवर प्रेम होते का ? आधी नाटक फक्त पैसे कमावण्यासाठीच केले जेवा फड कोसळला तेवा पण आधी घरची वाट पत्करली बायका पोरांनी बाहेर काढले तेव्हाच कलेची सेवा केली मग हा माणूस नटरंग कसा ?

आय टी आर .... एक प्रश्न

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 29/05/2016 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या दैनिक सकाळ मधे कोणी कोणता आय टी आर अर्थात आयकर रिटर्न फॉर्म भरावा या संबंधी मार्गदर्शन करणारा लेख आला आहे. त्यात आय टी आर १ हा पगारदार वा सेवा निवृत्त यांचे साठी प्रामुख्याने असल्याचे नमूद केले आहे. पण काही अधिक निकष लागू होत असतील तर आय टी आर १ हा पगारदार व सेवानिवृत्त यानाही भरता येणार नाही असे म्हटले आहे. त्यात एक अट अशी आहे की अल्प व दीर्घकालीन भांडवली नफा ( घराची खरेदी किंमत व विक्रि किमत यांचे इन्डेक्सेशन केल्यावर) असेल तर आय टी आर १ भरता येणार नाही.

मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग ३, Columbus Circle

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 29/05/2016 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुळात आपल्याकडे सशक्त कथा, त्या कथेला न्याय देणारे कलाकार आणि त्या कलाकारांकडून कथेला साजेल असा अभिनय करून घेणारे दिग्दर्शक फार कमी.त्यातूनही "नायिकाप्रधान" सिनेमे फारच कमी, कधी-कधी एखादा "कहानी" किंवा "निरजा" (हा मात्र मी टॉकीज मध्ये बघीतला आणि ते पण टिमार्णी नावच्या गावांत.आमच्यासाठी खास शो होता.कारण प्रेक्षक म्हणून फक्त मी, माझी बायको आणि माझी बहीण, असे ३च जण.असो....) नायिका प्रधान सिनेमे, नेहमीच वेग-वेगळ्या विषयांना हात घालतात.मग तो खामोशी असो किंवा मदर इंडिया किंवा मेमदिदी (https://www.youtube.com/watch?v=hVI7cLHX-Tk) आणि म्हणूनच

एक संघ मैदानातला - भाग १०

लेखक शि बि आय यांनी रविवार, 29/05/2016 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे येईपर्यंत आमच्या दुसर्या सीट रिकाम्या होत्या. अर्थात येउन-जाऊन लोकं त्यावर टेकत होतेच पण ठाण मांडून कोणीही बसलं नव्हत त्यामुळे आम्हीही बिनधास्त होतो. आता पुण्यानंतर झोपायचं त्याआधी एकमेकांवर एक तरी भेंडी चढवण्याच्या इराद्याने अखंड गाणी गायली जात होती. तेवढ्यात पुणे आलं, ठरल्याप्रमाणे ३ सिनियर आणि ३ ज्युनियर अशा बाजूच्या बर्थवर झोपायला जाणार होत्या पण भेंड्याना असा काही जोर चढला होता की आता पुण्याहून गाडी हलली की आपण आपापल्या जागी जाऊ असं ठरवलं. स्टेशनवर लोकांची चढ-उतार चालू असताना ६ गुजराथी बायका प्रचंड कलकलाट करत डब्यात शिरल्या.

मी, किशोर कुमार आणि कराओके……

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 28/05/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आणि इतर जगातही प्रथितयश, नामांकित गायक आतापर्यंत अनेक होऊन गेले… अजूनही आहेत….गाण्यात किंवा एकंदरीत सगळ्या प्रकारच्या संगीतातच मनाला उभारी देण्याची प्रचंड ताकद आहे.नैराश्यासारख्या मानसिक अवस्थेत संगीतच मनाला नवी संजीवनी देतं.अनेकांना अनेक प्रकारचे संगीत आवडतं.मला स्वतःला विशेष शास्त्रीय किंवा सुगम संगीत वगैरे प्रकार कळत नाहीत.माझ्या कानाचा ठाव घेणारा एकमेव आवाज म्हणजे किशोर कुमार….कॉलेजमध्ये असल्यापासून जर कोणाची गाणी आवडत असतील तर ती फक्त ह्याच मनुष्याची ….ती आवड अजूनही कायम आहे आणि आयुष्यभर राहील.