Skip to main content

बँकॉक : धावती भेट: १ 'कला आणि संस्कृती केंद्र'

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 10/06/2016 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या भेट द्यायच्या यादीत ‘बँकॉक’ हे शहर खरं तर नव्हतं. पण एका कामासाठी अचानक इथं आले. मी पोचले ती गुरूवारी रात्री. थाई-लँडच्या बँकॉक विमानतळावर उतरले तेव्हा ‘सुवर्णभूमी’ हे विमानतळाचं नाव पाहून गंमत वाटली होती. बाहेर पडल्यावर दिसले ते रस्ते रूंद आणि चकाकक होते. माझ्या सुदैवाने वाहतूक कोंडी नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गगनचुंबी इमारती दिसत होत्या. हॉटेलमध्ये स्वागतकक्षात दोन्ही हात जोडून स्वागत झाल होतं. दुस-या दिवशी कळलं की असं स्वागत मी भारतीय असल्याने नाही तर स्थानिक पद्धत म्हणून होतं. शुक्रवारी इथलं काम आटोपून शनिवारी पुढच्या मुक्कामाला जायचं असा बेत होता.

ती आणि मी....

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 10/06/2016 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
ती तशी नेहमीच गराड्यात असते मी त्या गर्दीचा एक भाग असतो ती तशी सगळयांच्या जवळ असते मीच कधी तिच्या नजरेत नसतो ती नुसती येण्याची चाहुल देते तो मुक्त तिच्यावर बरसत जातो ती चिंब तारुण्य उधळून देते मी धुंद स्वत:ला हरवत जातो ती गुलाबी सांज लेवुन येते मी क्षितिजासवे तिच्यात रंगून जातो ती नशावते कातरवेळ तिच्याच अदांनी मी नकळत तिच्यात विरघळत जातो ती अलगद रात्री स्वप्नात येते सारा आसमंत तिनेच भारलेला असतो ती एकच वेळ अशी असते जिथे ती "फ़क्त" माझी अन मी तिचा असतो पण........ ती आता चंदेरी दुनियेतच रमते मी आजही तिला दुरूनच न्याहाळतो अन तिच्या आठ्वांची कोमजलेली फुले मी गुपचुप हृदयात जपत असतो.

आळस

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 10/06/2016 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी मन भरून येतं काठोकाठ जावंसं वाटतं दूर दऱ्या डोंगरात डुंबावं वाटतं भल्याथोरल्या समुद्रात पण अशावेळी मला आळसंच येतो मग झोप झोपतो मी गपगार पांघरुनात कधी वाटतं चमकाव्या विजा कडाडून आकाशात बरसाव्या धारा मुसळधार अंगणात पण रखरखीत उनंच पडतं दिवसभर मग बसावं लागतं सावलीत आडवं व्हावं लागतं काटकोनातलं जग दिसतं राहतं स्वप्नात आळसंच दाटलेला असतो म्हणा जगण्यात आळसाचे असतात प्रमुख तीन प्रकार ऑय य्यॉय याय ... उद्या सागेनॉय य्यॉय जरा आळसंच आलॉय य्यॉय यियॉय्य . . हम्म..

लंडन कट्टा - सालाबादप्रमाणे यंदाही होणार!

लेखक आदूबाळ यांनी शुक्रवार, 10/06/2016 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
गेली दोन वर्षं लंडनमध्ये मिपाकरांचा वासंतिक कट्टा होतो आहे, पण त्याचे वृत्तांत आणि फोटो कुठेही लीक होऊ न देण्याची पुरेपूर काळजी घेतली गेली. ;) पण यंदा न्यूयॉर्क आणि रत्नागिरी या जगातल्या आघाडीच्या शहरांमध्ये मिपाकट्टे करायचं घाटत असल्याने तमाम (ग्रेटर) लंडनवासी मिपाकरांच्या हृदयांत कालवाकालव झाली. तसंच ज्येष्ठ आणि तरूण मिपाकर विजुभाऊ यांचं नुकतंच राणीच्या देशात आगमन झालं असल्याने कट्टा करायच्या बेताला पाठबळ मिळालं.

डिअर डॅड....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 10/06/2016 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच गोष्टी या त्यांच्या साधेपणामुळेच आवडतात, मनाला भावतात. तो साधेपणा, ती सादगी मनाला कुठेतरी स्पर्श करते. चित्रपटांचही असच असतं. एकाच पठडीतल्या कथा, रंजकतेसाठी वापरलं जाणारं धक्कातंत्र, उगाचच घुसवलेली भडक द्रुश्य हे सगळ कितीही वेगळेपणानं मांडलं तरीही कंटाळा हा येतोच. या सगळ्यामधे एक साधी सरळ, अजिबात धक्का न देणारी कथा, शांत अभिनय असलेली आणि मुख्यातः गल्ला भरणे हाच मुद्दा नसलेली एक चित्रक्रुती जेव्हा समोर येते तेव्हा आपण पाहतोच. ती मनाला कुठेतरी अलवारपणे स्पर्श करते अगदी तो चित्रपट उत्तम वा उत्क्रुष्ट नसला तरीही...

स्पॉटलाईट

लेखक पिशी अबोली यांनी शुक्रवार, 10/06/2016 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट पटकन समजण्यात मी थोडी मंदच आहे. पिक्चर बघितल्या बघितल्या सिनेमेटोग्राफी, बॅकग्राऊंड म्यूझिक इत्यादी गोष्टींबद्दल चर्चा करणार्‍यांबद्दल भयंकर आदर आहे मला. मला तर चित्रपटभर फक्त आणि फक्त कथा दिसत राहते. अतिशय चांगला चित्रपट असेल, तर एकसंध अशा कथेतून बाहेरच्या जगात आलं की एकदम हरवायला, बिचकायला होतं. काही दिवस ती कथा मनाच्या मागे रेंगाळत राहते, आणि मग एकदम कधीतरी अनपेक्षितपणे ती पूर्णपणे जाणवते. स्पॉटलाईटबद्दल झालं असं, की ती खरीखुरी घडलेली गोष्ट आहे हे माहित होतं. इतकंच काय, त्या बॉस्टन ग्लोबच्या बातमीबद्दल पेपरात वाचलेलंही आठवत होतं.

बाइक्स घेताना - भाग ५ - बायकांच्या बैका

लेखक टवाळ कार्टा यांनी शुक्रवार, 10/06/2016 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
बाईक्स घेताना - भाग १ - बायकर्सचे प्रकार बाइक्स घेताना - भाग २ - १००-११० cc बाइक्स घेताना - भाग ३ - १२५ cc बाइक्स घेताना - भाग ४ - १३५ cc (पूर्वी...कोणे एके काळी) आधी जाहीर केल्याप्रमाणे हा भाग अनाहिता पेश्शल :) भारतात जश्या १९९० नंतर स्कूटरचा जमाना मागे पडून बाईक्स जास्त लोकप्रिय होऊ लागल्या अगदी तस्सेच्च २००५ नंतर हळूहळू ऑटोमॅटिक स्कूटरची लोकप्रियता वाढत आहे.

सांधण दरी - एक जबरदस्त अनुभव

लेखक अभिजीत अवलिया यांनी शुक्रवार, 10/06/2016 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
सांधण दरी - एक जबरदस्त अनुभव आयुष्यात ज्या ठिकाणी नक्की जायचे हे मनाशी पक्के होते त्यातले एक म्हणजे सांधण दरी. मिपा वरतीच बज्जु ह्यांनी ह्या ट्रेकचे वर्णन केले होते तेव्हापासून तर कधी एकदा ही दरी पार करतोय असे झाले होते. आणी अचानक ध्यानी मनी नसताना हा योग जुळून आला २३ मे ला. आम्हा दोघांशिवाय कधीही न राहणारा आमचा लहान मुलगा कधी न्हवे ते २२ मे ला त्याच्या आजीकडे गेला नी न रडता राहिला सुद्धा. त्यात भर म्हणून फोन केल्यावर तुम्ही येवू नका मी राहतो एकटा (आश्चर्यचकीत झालेली स्मायली) असे बोलल्याने आम्ही उभयतानी हा ट्रेक ह्या दोन दिवसातच करायचा असे ठरवले.