Skip to main content

बावरे प्रेम हे - एक दिव्यपट

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 26/07/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची संध्याकाळ भंकस असते. एकदम टुकार! दुसऱ्या दिवशी सोमवार नावाचा अजगर जबडा उघडून बसलेला असतो. रविवारी संध्याकाळी कुठे बाहेर जाण्याचादेखील हुरूप नसतो. उगीच मॉलला वगैरे जाऊन फिरून येण्यावर माझा विश्वास नाही. का कुणास ठाऊक रविवारी संध्याकाळी चित्रपटगृहात किंवा नाट्यगृहात जाऊन चित्रपट किंवा नाटक बघायला मला आवडत नाही. घरी सोफा खालून टोचत असतो. सगळी रविवार संध्याकाळ कुत्र्याने दोन्ही पायात तोंड खुपसून निपचित पडून रहावं तशी अर्थहीन पसरलेली असते. शुक्रवारची उत्साहाने सळसळणारी संध्याकाळ आणि शनिवारची सुखावह निवांत संध्याकाळ आठवून रविवारच्या संध्याकाळी मन अधिकच खिन्न होतं.

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - दुसरा चरण

लेखक Anand More यांनी मंगळवार, 26/07/2016 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या भागात मी ऐतरेयोपनिषदातील विश्वोत्पत्ती चा सिद्धांत आणि सुनता है गुरु ग्यानी चा पहिला चरण यांचा संबंध आहे असा अर्थ लावला होता.

सोबतीण भाग - २

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 26/07/2016 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
सोबतीण - भाग १ क्षण दोन क्षण वाट बघून अपर्णाने तिला हलवले."पृथा काय झाल ग? बोल की." पृथाने गोंधळून अपर्णाकडे बघितल आणि म्हणाली,"अपर्णा आपण या बागेतून निघूया का?" आता फक्त सहा वाजले होते. आजूबाजूला आता मुलांची खूपच गर्दी झाली होती. ओरडा-आरडा चालू होता. कोणी पडून रडत होत... कोणी मोठ्याने हसत होत... कोलाहल होता बागेत. त्यामुळे अचानक पृथाला बागेतून निघायची घाई का झाली ते अपर्णाला कळेना. "का ग? काय झाल पृथा?" तिने गोंधळून पृथाला विचारल. "अपर्णा मलाना गावाहून आल्यापासून झाडांच्या बाजूला जावस पण वाटत नाही ग.

ब्रिटन युरोपपासून घटस्फोट घ्यायला निघालाय्-एक झलक

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 26/07/2016 06:18 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक/संकलक: सुधीर काळे (sbkay@hotmail.com) १९७३ पासून चार दशकांपेक्षा जास्त वर्षें ब्रिटन युरोपीय महासंघाच्या एका विशाल उपक्रमात ’नांदतोय्’ खरा, पण या नांदण्याला ’नांदा सौख्यभरे’ या प्रकारचे नांदणे म्हणता येणार नाहीं! कारण इटली (लिरा), फ्रान्स (फ्रँक), जर्मनी (मार्क) यासारख्या सशक्त अर्थव्यवस्था असलेल्या राष्ट्रांनीसुद्धा आपल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या चलनांना (currencies) डावलून ’यूरो’ हे नवीन सर्वमान्य चलन जसे स्वीकारले, तसे ब्रिटनने मात्र स्वीकारले नाहीं.

किशोर कुमार ची गाणी आणि शास्त्रीय संगीत

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 26/07/2016 02:09 या दिवशी प्रकाशित केले.
मला व्यक्तिशः रागदारीतलं काहीही कळत नाही. हे माझं दुर्दैव! इच्छा असूनही इतक्या वर्षांमध्ये वेळ काढू शकलो नाही ही एक खंत आहे, आणि उर्वरित आयुष्यात जमेल अशी शक्यता अति-धूसर आहे. पण तरीही जमेल तशी माहिती गोळा करीत रहातो, कधीतरी वाचेन या आशेवर! पूर्वी मिपावर संस्थापक तात्यांना विनंती केली होती की रागदारीवर आधारित हिंदी-मराठी चित्रपट संगीतावर एक लेखमाला लिहा, त्यांनी 'बघू' म्हणत टाळलं.

पुर्वांचल सफर.

लेखक योगेश आलेकरी यांनी सोमवार, 25/07/2016 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी मधील ३ राज्ये, जवळपास ५० किल्ले, ३५०० किमी ची कोस्टल राईड नंतर आता एक भन्नाट प्रवास..... "पूर्वांचल मैत्री अभियान" दुचाकिस्वारी नियोजन, व्यवस्थापन , पथदर्शन - डॉ.

वात्रटिका - आजचा कवी

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 25/07/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग लेखन सुरु करताना सुरवातीला लिहिलेली या कवितेची आठवण झाली. काही कवींसाठी कविता सुद्धा एक व्यवसाय आहे 'बाजारात कवितेला चांगला भाव मिळाला पाहिजे'. कोळया सारखे जाळे विणुनी करितो शब्दांची फेकाफेकी. गाफिल श्रोत्यांना त्यात बुडवुनी घेतो दाद मनाजोगति. कधी सांगतो सिने नट्यांच्या लफड्यांची स्टोरी. कधी रंगवितो वासनामयी. रंगील्या राती. कधी चालवितो व्यंगास्त्रांचे बाण राजनेत्यांवर्ती. कधी उडवितो रक्तांकित वीरश्रीची गाणी. उजवी डावी वेडी वाकडी नुसती शब्दांची खेळी. लक्ष्य त्याचे सदैव असते कोठी, गाडी आणि बिदागी.

बहुरूपी

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 25/07/2016 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
बहुरूपी ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून ऐतिहासिक संदर्भांशी आणि घटनांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. पहाट सरत आली होती. पुर्वेला झुंजूमुंजू झालं. दुरवर कुठेतरी टाळांच्या मंजुळ स्वरात वासुदेवाचं गाणं सुरू होतं. कोंबडं आरवलं तशी गोजाई आपल्या गोधडीत उठून बसली. रात्रभर आपल्या धन्याचा विचार करता करता झोप केव्हा लागली तिचं तिलाही कळालं नाही. मग स्वप्नात पण त्याचाच गुलजार मुखडा तिला दिसत राह्यला. तिचा धनी स्वराज्यात महाराजांच्या सेवेला होता. त्या राजावर आणि त्याच्या स्वराज्यावर अख्खा जीव ओवाळून टाकणारा होता. म्हातारं अजून अंथरूनातच होतं.

वयम् अपि कवय:॥

लेखक सूड यांनी सोमवार, 25/07/2016 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
मक्षिकेपरि चिवट। मनी मुळी बोथट॥ काव्य पाडुनि ओषट। संवेदना दाखवि॥१॥ मांडुनि भावनांचा बाजार। घेई फुकाचा कैवार॥ यासि शतोत्तरि चार। जोडे मोजुनि मारावे॥२॥ ऊर बडवि धडधडा। सदा फोडितसे हंबरडा॥ जणु एकटाचि बापुडा। सर्वांमाजि॥३॥ प्रसिद्धीची वखवख। मुखवटे घेई सुरेख॥ साहित्यशेतीचा काळोख। उजेड म्हणोनि दाखवि॥४॥ डास उडे पखियांपरि। काजवे तार्‍यांपरि॥ हा निव्वळ यमके करि। म्हणोनि कवि जाणावा॥५॥
काव्यरस

चोरी प्रकाशाची (१)

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 25/07/2016 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
...ती गेली की क्षण क्षण युगांसारखा होतो, ती आली की सळसळत चैतन्य येते, आनंद येतो, जीवनात जान येते ! , अशी ही ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून पहिलीच आहे नेहमी...! आणि ती आहे वीज ! -- आजच्या युगातली एक जीवनावश्यक बाब. जलसंपत्तीप्रमाणेच वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आता संपत्ती म्हटली की चोरीचा धोका आला ! आणि ही संपत्ती काही कडीकुलुपात ठेवता येत नाही. तेव्हा हिचे संरक्षण म्हणजे एक अवघड प्रकरण आहे. विजेची चोरी हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल फौजदारी केस आणि तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो. तरीही याबद्दल एक प्रकारची बेफिकिरी दिसून येते.