घरचा हेर
घरचा हेर
"किसना, किसना हे"
तिरिमिरीत चाललेल्या किसनानं आबांची हाक ऐकून मागं वळून पाह्यलं. पण गडी थांबला नाय. धुसफुसत तसाच चालत राह्यला.
वेग वाढवून आबांनी किसनला गाठलं.
"असं काय करता किसनराव? चला आता घरी. शांत व्हा."
"हं! ह्या!"
"किसनराव, चला म्हणतो ना. तथं सूनबाईच्या डोळ्यांचं पाणी राहीना किती वाडुळ. आन तुमी आसं ल्हान पोरावानी तरातरा उठून आलाय. आमी म्हातार्या माणसांनी आता तुमच्या मागं कुठंवर पळायचं... घ्या जरा शांततेत. संसार म्हणला की भांड्याला भांडं लागायचंच. "
"आबा, तुमी म्हणून म्या ह्या घरात थांबलोय. नायतर कवाच निगालू हुतो पंढरीला."
"आता कुठं जाताय आणि पंढरीला.
मिसळपाव