हृदयांतर
हृदयांतर
खरं म्हणजे पावसाळ्यात डोंगरदर्यांच्यात भटकणे म्हणजे डोळ्यांना एक सुखद पर्वणीच असते. हिरवेकंच डोंगर, खळाळत्या नद्या, डवरलेली भातशेती, पांढरेशुभ्र धबधबे, सर्वत्र पसरलेले दाट धुके आणि या सर्वांतुन आपल्याला आपल्या लक्षापर्यंत घेवून जाणारी न चकवणारी पाऊलवाट.
हे सर्व अनुभवायला आम्ही अठराजण निघालो होतो.
काल मढे घाटात जाण्याचा योग आला. व मढे घाटाची लागलेली वाट पाहुन त्वरीत घरची वाट पकडली...
अंदाजे ७-८ वर्षापुर्वी पहिल्यांदा तिकडे गेलो असीन , तेव्हाचा मढे घाट व आत्ताचा यात जमीन आस्मानाचा फरक आहे. माहीती तंत्रज्ञान, सोशल मीडीया मुळे माहीती लवकर प्रसारीत होत आहे. त्या काळी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पर्यटक तिथे येत, सध्या वीकयेंड ला किमान ४०० मोटारगाड्या, ५०० ते ६०० मोटारसायकली येत आहेत. म्हणजे दिड ते दोन हजाराच्या आसपास पर्यटक येत आहेत.