Skip to main content

नारळीभात

लेखक सविता००१ यांनी सोमवार, 07/08/2017 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, आपला नारळीपौर्णिमेचा खास मेनू केला आज. त्यामुळे आता वाचा आणि पहाही तोच. तुमच्याही घरी तोच असेल म्हणा :) वाढणी: ४ व्यक्तींसाठी साहित्यः १ वाटी बासमती तांदूळ, १ वाटी खोवलेला नारळ, १.५ वाटी चिरलेला गूळ, ६-७ लवंगा, पाव वाटी बेदाणे, काजू, बदाम आवडीनुसार, वेलदोडा पूड १ टीस्पून, साजूक तूप एक टेबलस्पून, पाणी २-३ वाट्या (तांदळाच्या प्रतीनुसार कमी जास्त लागू शकते.), केशराच्या ८-१० काड्या आणि केशर भिजवायला पाव वाटी दूध. कृती: तांदूळ स्वच्छ धुवून एका रोवळीत १ तास उपसून ठेवावेत. केशर किंचित गरम करून (गरम तव्याचर गॅस बंद करून केशर तव्यावर घालून लगेच काढून कोमट दुधात किंचित चुरून घालायचे.